जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.
ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.
सध्या Citizen Vigilante या जर्मनी व ब्रिटनने अप्रत्यक्षरीत्या बंदी घातलेल्या सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सद्गुणविकृतीचा प्रादुर्भाव झालेल्या युरोपातील जनमानस या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसते.

वाचने
4049
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
FCRA बिल आणि तंगडी वर करण्याची अमेरिकन सवय
https://timesofindia.indiatimes.com/india/us-congressman-warns-fcra-bil…
भारताच्या संसदेत FCRA बिल कधीही टेबल होईल अशी परिस्थिती असताना रिली moore यांनी ह्या निमित्ताने भारतावर दुगाण्य झाडल्या आहेत. आधी जंतर मंतर येथील आंदोलनाला दाणागोटा पुरवून ह्या अधिवेशनात अडथळा येईल असा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकन सरकारची मळमळ वेगवेगळ्या माध्यमांतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया भारतात व्यक्त होत आहे.
या विधेयकास मोरेने अधिकृत…
In reply to FCRA बिल आणि तंगडी वर करण्याची अमेरिकन सवय by अप्पा जोगळेकर
या विधेयकास मोरेने अधिकृत विरोध करून भारतविरोधी पक्ष व संघटना यांना स्पष्ट आज्ञा केली आहे की त्यांनी या विधेयकास पूर्णपणे विरोध करून ते अस्तित्वात येऊ देऊ नका. अमेरिकेतून निधी घेणारे व देशविरोधी काम करणारे आपला विरोध अजून तीव्र करतील.
चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८
या धाग्यावर दीडशेच्या घरात प्रतिसाद झाल्याने चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८ हा नवीन धागा काढला आहे. नवीन बातम्या / मुद्दे / चर्चा तिथे लिहूया.