Skip to main content

चालू घडामोडी । जुलै २०२६ । आषाढ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी बुधवार, 01/07/2026 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.

ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.

सध्या Citizen Vigilante या जर्मनी व ब्रिटनने अप्रत्यक्षरीत्या बंदी घातलेल्या सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सद्गुणविकृतीचा प्रादुर्भाव झालेल्या युरोपातील जनमानस या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसते. 

 

Citizen Vigilante Poster

वाचने 3528
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

गुन्हेगारी, बेरोजगारी आणि सामाजिक अस्थिरता यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे खापर स्थलांतरितांवर फोडण्याची प्रवृत्ती या चित्रपटात ठळकपणे दिसून येते. समाजातील प्रत्येक समस्येचे कारण "बाहेरून आलेले लोक" असतात. चित्रपट चांगला आहे तरी एकतर्फी वाटतो . एकदा का इमिग्रंट वर संशय सुरु झाला कि मग सर्व इमिग्रण्टस सारखे दिसू लागतात . मग सर्व UP  वाले भैये किंवा पाकिस्तानी मुसलमान होतात . मग सर्वच भारतीय घाणीत राहणारे होतात . (online  comments bagha ). असल्या चित्रपटा मुळे सर्व नॉन-व्हाईट लोकांवर इम्पॅक्ट होतो.


हत्येच्या पूर्वी काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो.

 

सिया गोयलने केतन अग्रवालकडे लग्नापूर्वीच एक कोटी रुपये ( व्यवसायासाठी वगैरे ) मागितले. ते त्याने दिले. ते पैसे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरीस दिले. त्याने त्याचं काय केलं कोणास ठाऊक.

 

जसजसं लग्नं जवळ येऊ लागलं, तसतसा सियाचा धीर सुटू लागला. तिने केतनपाशी पैसे हरवल्याची ( व्यवसायात खोट आल्याची वगैरे ) बतावणी केली. मी एव्हढे पैसे घालवल्याने आता हे लग्न करणं बरोबर नाही, असा काहीसा सूर लावला. त्यावर केतन म्हणाला की आता लग्नं मोडणं अशक्य आहे. मला माझ्या कुटुंबियांना पैशांचा हिशोब द्यावा लागेल. जरी लग्नं मोडलं तरी माझे कुटुंबीय तुला कुठूनही शोधून काढतील.

 

त्यावर तिने केतनला संपवायचा निर्णय घेतला. तो अर्थात चेतनशी सल्लामसलत करूनंच. हत्येपश्चात ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वत्र माहिती आहेत.

 

मला जे वाटलं ते लिहलं आहे. या तर्कविलासास या क्षणी कोणताही पुरावा नाही. भविष्यांत मिळू शकतो.

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

एक कोटीमुळेच सगळी भानगड झालेली दिसते. नाहीतर ठरवून होणाऱ्या विवाहात एखाद्या मुलाला सांगितलं की माझा तुला नकार आहे तर कोणी कशाला इतकं कोणाच्या मागे लागेल.


 

"महाराष्ट्राची खरी ओळख संविधानात नव्हे, तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे." अश्या अर्थाचे विधान महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे.

 


सुरू होणार आहे. आता एखादं आवडीचं नाव घेऊन ठेवायची सोय दिली आहे.

त्याचा उपयोग होईल असं वाटतंय. फोन नंबर न देता संपर्काचं साधन.


In reply to by कंजूस

माझं नाव घ्यायला गेलो तर आधीच आरक्षित झालं होतं. मग वडिलांचं आद्याक्षर मध्ये ठेवलं, तर नशिबाने मिळालं.

-गा.पै.


In reply to by कंजूस

युजर नेम फीचर भारतात आणू नये असं केंद्र सरकारने "मेटा"ला सांगितल्याची बातमी वाचली होती नुकतीच.


In reply to by गवि

तिकडे प्रा.डॉ.ची फ्यासिलिटी नसल्याचा निषेध व्यक्त करुन इंग्रजी रिजर्व केले.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by कंजूस

तहकूब करायला सांगितला आहे मेटा कॉर्पोरेशनला

 

 

ह्याच्या अगोदर सरकारने मेटा कॉर्पोरेशनला भारतीय नंबर वरून WhatsApp वापरण्यासाठी SIM Binding सक्तीचे करण्यास सांगितले होते पण ते काही पुढे सरकले नाही/ सरकवले नाही.


In reply to by वृषभ खोंडे

याआधी ट्विटर प्रकरणावरून या मोदी सरकारची जी बेअब्रू झाली होती ते प्रकरण आठवले. 


इतके कणाहीन सरकार बहुधा याआधी कधीही केंद्रात नव्हते.


In reply to by कंजूस

वाट्सप युझरनेम दिलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने फोन नंबर दिसत राहावा असे मला वाटते. 


In reply to by कंजूस

मी सुद्धा... माझ्याकडे व्हॉट्सऍप प्लस सबस्क्रिप्शन चा पर्याय पण खुला झालाय... पण काय मजा नाही, टेलिग्राम ची नक्कल केलीय


रामलल्लाच्या नावावर आयोध्या आयोध्या राम राम करुन सत्ता आणून देशाला लुटले आता, राम  लल्लाचे सोने चांदी लुटले, देणग्यात अपहार केला, दर्शन रांगेत पण पैसे केले,  या सगळ्यां फोकलीच्यांना  राम नरकात घालणार शंभर %

 

तरी, पण तिकडे ते आवाज देणार मित्रो... अरे आवरा रे यांना. तिकडे तेल दराची एवढी घसरण झाली पण भारतीय तेल कंपन्या दर अजिबात कमी करायला तयार नाही. नायराच्या पंपावर दर कमी आहेत.

 

गोबरयुगात जी वाताहात व्हायची ती होणार आहेच मतदानाची सॉरी कर्मभोगाची फळं चाखावीच लागतील यात वाद नाही.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयुगात जी वाताहात व्हायची ती होणार आहेच मतदानाची सॉरी कर्मभोगाची फळं चाखावीच लागतील यात वाद नाही.

बकरीवाद्यांची तडफड पाहून जाम मजा येतेय! 


 


In reply to by कांदा लिंबू

गोबरवाद्यांना तीही सोय नाही. तोंडात  गोबरची गुळणी धरून गप्प बसावे लागते . बिच्चारे!


In reply to by आग्या१९९०

कांबळेंच्या कवितेसारखे हे नुसतेच कण्हतात. अं. ;)

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही कितीही कण्हत राहा, कांबळेसारखे नाही अजून कुणासारखे; तुमचे रागा* काही पंप्र होणार नाहीत बहुतेक!

*(खरंतर रागा आजोबा. साठी उलटली, नाही का? आमच्यात ज्येष्ठांना आदरपूर्वक बोलतात हं!)

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यावर एक धागा लिहिला होता परवाच... मिरच्या झोंबल्यात तथाकथित विद्वानांना 


सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे', असे सांगतानाच 'भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा ठरू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना ठणकावले.

हे काय चालले आहे ? जनतेला सरकारचे गुलाम बनवायचे आहे का ? ते निषेध करू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाहीत. हे सर्व काय आहे? आता तर अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. नागरिकांनी निषेध केला तर तुम्ही गुन्हे दाखल करता. हे काय आहे ? निषेध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने केवळ 'भाजप सरकार मुर्दाबाद', 'अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत ? अशा घोषणांसाठी हद्दपारीचे आदेश का ?' अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती जामदार यांनी केली.

पोलीस मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत. जनतेचे सेवक आहेत' असे न्यायालयाने सुनावले. ( लोकसत्ता बातमी )

 

अशा काही निकालांनी व्यवस्थेविरुद्ध लिहिणा-या बोलणा-यांचा आत्मविश्वास वाढतो. बळ मिळतं.


केतनच्या हत्येमुळे दु:खी असलेल्या त्याच्या आजोबांचं देवीचंद अग्रवाल यांचं नुकतंच निधन झालं. सिया गोयलशी केतनचं लग्न जुळवल्याचा त्यांना अतिशय खेद झाला. त्यांना शांती व सद्गती लाभो. 

-गा.पै.


मुंबईतील सुप्रसिद्ध के रुस्तुम आईसक्रीम पार्लर आणि डेअरीला अन्न व औषधी प्रशासनाचा दणका, टाळे ठोकले

 

 

मुदतबाह्य फ्लेवर, डेअरी आणि आईसक्रीम प्रोडक्शन एरिया मध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्यामुळे झाली कारवाई, परवाना झाला रद्द. अतिशय मुजोर अशा ह्या पारशी बावाला जागा दाखविल्याबद्दल तुकाराम मुंडेंचे हार्दिक अभिनंदन.


In reply to by अनिशासूत

पहिली गोष्ट म्हणजे ते पारशी विक्षिप्तपणाला गोडगोड मुलामा देऊन बावा बावा करण्याची मला विलक्षण झीट ! त्यात ह्यांचा माज ! इराण मधून आले त्यानंतर मुंबईत स्थिरावले अन् ब्रिटिशांना सेवा पुरवठादार/ कंत्राटदार म्हणून गब्बर झाले त्यातही अफूच्या व्यापारात पुढे, अर्थात ती तत्कालीन व्यवसाय रीत म्हणून इतिहास दिला सोडून, पण आजचे काय? युपीआय घेत नाही, कार्ड चालत नाही, चालले तर २% चार्ज ग्राहकाच्या बोडक्यावर ! अन् खायला घालणार काय ? तर पाव लोणी (ते पण लोणीच का मार्गारिन त्याचा पत्ता नाही) अन् शेपू घातलेला भयाण खीमा, पारशी हॉटेल मध्ये एकदा खाल्ल्यावर ब्रिटिश लोक किती पुळकवणी जेवत असतील ते कळते. त्यात जनतेला त्या पालोनजी सोडाची कोण खाज ! फुल साखर आणि रंग + कृत्रिम फ्लेवर मिसळून सोडा वॉटर मधे मिसळले की झाले लिजेंडरी पारशी ड्रिंक ! ह्यांना थोडे जमिनीवर आणणे गरजेचे आहे / होते हे माझे वैयक्तिक मत.


विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्याच्या नावाखाली जाळपोळ, मारहाण, नासधूस, नुकसान करणारे समाजकंटक व त्यांचे पाठीराखे यांना शासनाने चांगलेच फोडून काढायला हवे.‌ 

 

पण सध्याच्या सरकारमध्ये तेवढा दम नाही. सतत हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या मोदी सरकारकडून काही चांगले केले जाईल किंवा काही वाईट करणे टाळले जाईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.‌


In reply to by कांदा लिंबू

१२ वर्ष झाली तरी षंढांकडून अपेक्षा करता? सुधारा. 


In reply to by आग्या१९९०

१२ वर्ष झाली तरी षंढांकडून अपेक्षा करता?  

वर मराठीत लिहिले आहे की मेंडरीनीत ? 

 

सुधारा.

सुधारण्याची गरज तुमच्यासारख्या डाव्यांना आहे. 

 

 


In reply to by कांदा लिंबू

नक्की किती जाळपोळ झाली आहे ? 
किती मारहाण आणि नासधूस झाली आहे ?

ज्यांना तुम्ही समाजकंटक म्हणून संबोधित करता ते नक्की कोण आणि तुम्ही कुठल्या आधारावर करत आहात ? 


डावे  कधी  सुधारले  का?  सगळ्या राज्यांतून  गच्छंती झाली  पण हे झापडबंद  तसेच  राहिले! 

फारच अपेक्षा  बुवा  तुमच्या! 


.

तुम्ही कॉलेजला असताना 

पॉर्न बघितले, 

लफडी केली, 

बिड्या मारल्या, 

दारू ढोसली,

कॉप्या केल्या,

इन शॉर्ट सगळे किडे केले..

तुम्ही निष्पाप होता काय?

याचं स्पष्ट उत्तर #नाही असेच आहे! 

तुम्ही - आम्ही, आपण काही निष्पाप नव्हतो. आजची मुले आपल्या पुढची केस आहेत, ही सुद्धा निष्पाप नाहीत.

कॉलेजवयीन मुलं-मुली निष्पाप अजिबात नसतात, ही काही बालवाडीतली मुले नाहीत. मोठमोठ्या राजकीय संघटना चालवतात, भाईगिरी करतात, निवडणुका लढवतात, राजकारण करतात, ही मुले निष्पाप नसतात. कॉलेजमधल्या शिक्षकांना विचारा काय त्रास असतो...

अर्थात, अपवाद असूच शकतात हं!

त्यामुळे विद्यार्थी = निष्पाप ही धारणा बाजूला ठेवून विचार करणे आवश्यक आहे.

पार्ट २

या देशात एका विशिष्ट #कव्हर खाली लपून राजकारण करण्याची एक घातक पद्धत निर्माण झाली आहे.

त्याचं एक उदाहरण म्हणजे

आदिवासींच्या प्रश्नांच्या आडून नक्षलवादाला खतपाणी घालणं. यात नक्षलवादी स्वतःचा अजेंडा पुढे रेटतात आणि अनेकदा निरपराध आदिवासीच त्याची किंमत मोजतात.

अशाच प्रकारची रणनीती अनेक आंदोलनांमध्ये दिसून येते. कम्युनिझम ही आपल्या व्यवस्थेला लागलेली एक गंभीर कीड आहे. जंगलातील नक्षलवादावर कारवाई करता येते; 

पण शहरांमध्ये विचारसरणीच्या माध्यमातून रुजलेला शहरी नक्षलवाद ओळखणं, आपल्याच आजुबाजूला वावरणाऱ्या लोकांमधले अती डावे लोक ओळखणं आणि त्यांना रोखणं अधिक कठीण ठरतं.

ज्यांना विचारसरणीची गणिते समजतात,

डावे, उजवे, अतिडावे, अतिउजवे, तीव्र डावे, तीव्र उजवे, डावीकडे झुकलेले, उजवीकडे झुकलेले तसेच अनेक संधीसाधू पॉडकास्टर (कारण यांचा प्रेक्षक युथ आहे)

जे दोन्ही बाजूने बॅटिंग करतात, त्यांना अशी आंदोलने लगेच क्लिक होतात.

कोणतेही आंदोलन घ्या, तिथे सगळे असंतुष्ट गट एकत्र येतात. आता या आंदोलनात कलम ३७० मागे घ्या म्हणून मागणी होत आहे, तिकडे पंजाब मधून शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत, इथे कामरा आहे, स्वरा भास्कर आहे, सगळा मालमसाला खच्चून भरलेला आहे! 

अशा परिस्थितीत "विद्यार्थी" हा आंदोलनासाठी एक प्रभावी कव्हर ठरतो. कारण विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई झाली, लाठीचार्ज झाला किंवा एखादा विद्यार्थी जखमी झाला, तर त्याचे भावनिक व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखवून मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण करता येते. 

इथे नाव विद्यार्थ्यांचं पण काम होतंय संधीसाधूंचं आणि राजकीय असंतुष्टांचं! ज्याला हे समजलं तोच खरा हिंदुत्त्ववादी. नाहीतर या गर्दीत सामील होऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे आत्मघातकी काही कमी नाहीत.

बाकी या आंदोलनात मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंटचे विद्यार्थी किती आहेत याचे मला कुतूहल आहे 😄

कारण ज्यांच्या नावावर आंदोलन झाले त्यांनी री एक्झाम देऊन प्रवेशही घेतले... 

https://www.facebook.com/share/p/1RrocuCakJ/

 


दिपके आप च्या आय टी सेल मध्ये काम करत असे. फेब्रुवारी मध्ये पंजाबच्या निवडणूका आहेत. केजरीवाल आणि कंपनी उतरलेली आहेच. तेंव्हा आता या आंदोलनात पंजाबचे शेतकरी राकेश टिकैत आणि कंपनी उतरले नाहीत तरच आश्चर्य वाटेल


दीडशे कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे , भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोमि पोस्ट एका खाजगी कंपनीने चुकून हटवली! चुकून हं, मुद्दामून नाही! 

 

IT ministry summons Meta after PM Modi's post on strict action over paper ‘leaks’ removed 

 

 


In reply to by कांदा लिंबू

मॅन्युअली हटवली/ रिस्ट्रिक्ट केली असा तुमचा दावा आहे का ?


In reply to by कांदा लिंबू

खाजगी कंपनीने हटवली ! काय गैर केलं ? मंकी बात आहेच कि !

गोबीच्या इन्स्टावर भयंकर ट्रॉलींग आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणून पाहते  ! गोबींचे धाबे दणाणले आहे असे वाटते 


In reply to by कांदा लिंबू

दीडशे कोटी नागरिक असलेल्या भारत सरकारची सोमिवर काय किंमत आहे हे मेटाने दाखवून दिले आहे. 
मागे ट्विटर प्रकरणात (मला वाटतं, रवी शंकर प्रसारणमंत्री असताना) भारत सरकारने अशीच स्वतःची बेअब्रू करून घेतली होती.  


संघ-भाजप-मोदी यांना स्वतःची आणि म्हणून अनेक वेळा भारता सरकारची/ भारताच्या नागरिकांची बेअब्रू करून घेण्याची सवयच आहे. 
 


He is a former state convenor of the BJP's Intellectual Cell and a former office-bearer of the Bharatheeya Vichara Kendram, which has close links to the RSS. M Ganeshan, senior Pracharak of the RSS in Kerala, clarified that he is not associated with the organisation in any capacity.

"I would impose curfew in a four-square-kilometre area around Jantar Mantar. I would ask the crowd three times to disperse. Then I would shoot. Some will die, some will survive, some will be mutilated. The situation would be brought under control in four hours. The bodies would be collected and taken to the hospital," he said in the video.

अनैच्छिक ब्रह्मचारी संघाचे हे वैफल्यग्रस्त नेतृत्व ! 
 


रशियाकडून कच्चे तेल घेण्यासाठी मी भारताला अजून एक महिन्यासाठी अनुमती दिली आहे, मीच भारत-पाकिस्तान युद्ध थाबविले, माझ्यामुळे एक कोटी लोकांचे प्राण वाचले, भारत-पाकिस्तान युद्धात १०-११ विमाने पडली (हा आकडा ४-५ वर सुरूवात होऊन नंतर वाढत वाढत १०-११ वर येऊन थांबलेला दिसतो)  .  .  .  या ट्रंपच्या फुशारकीयुक्त थापा २-३ महिन्यांपासून बंद झालेल्या दिसतात. इराण विरूध्दच्या युद्धात तोंड काळे करून घेतले हे यामागचे कारण असावे. भारताने सुरूवातीपासूनच ट्रंपच्या बरळीकडे ठरवून दुर्लक्ष केले होते कारण मुर्खाच्या तोंडी लागण्यात अर्थ नसतो हे भारत ओळखून आहे.‌


मीडिया जंतरमंतरचा उकिरडा हुंगत असताना २३ जुलै रोजी भारतीय तंत्रज्ञानीं मिळवलेले हे यश काहीसे उपेक्षित राहिले.

On July 23, 2026, the Indian Ministry of Defence announced a major dual breakthrough in aerospace and defense: the maiden flight-test of the Project Kusha long-range surface-to-air missile (LRSAM) and the successful development of India’s first indigenous 350 kg thrust-class expendable turbojet engine.


In reply to by अप्पा जोगळेकर

माझ्या ( अल्पश्या ) आकलनानुसार इतक्या छोट्या क्षमतेचं जेट इंजिन बनवणं बरंच अवघड आहे. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन.

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

तथापि गा.पै. साहेबांचा प्रतिसाद तोकडा वाटला आणि त्यांनी इंजिन बनवणं अवघड का आहे हे दिले नाही. म्हणून ही अल्पशी भर.

थ्रस्ट क्लास एक्स पेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार करणे हे केवळ 'कॉपी-पेस्ट' करण्यासारखे सोपे काम नाही. म्हनजे उगाच आन तिकडचे ईंजिन आणि कर रेव्हर्स इंजिनियरींग असे करू शकत नाही..

हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक एरो स्पेस अभियांत्रिकी कार्य आहे. टर्बोजेटचे मूळ सूत्र जुनेच आहे.  पण मोठ्या विमानाचे इंजिन एका लहान बॅगेच्या आकारात आणणे हे  प्रचंड गुंतागुंतीचे असावे. 

क्षेपणास्त्राला पुरेसा वेग देण्यासाठी या लहान इंजिनला प्रति मिनिट ३०,००० ते ६०,००० पेक्षा जास्त आर पि एम ने फिरावे लागते. निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेने इंजिनचे सुटे भाग वितळण्याचा किंवा तुटण्याचा मोठा धोका असतो. सर्वात मोठी कसोटी म्हणजे, हे इंजिन एकदाच वापरले जाणार असल्याने यात विमानासारखे अतिमहागडे धातू वापरणे परवडत नाही! त्यामुळे ३D प्रिंटिंग आणि स्वस्त धातू वापरूनही ते तितकेच मजबूत बनवणे हे मुख्य आव्हान असते. 

शिवाय, महत्त्वाचे आव्हान मला वातते की ही इंजिने तशी कोणतीही देखभाल न करता १० ते १५ वर्षे गोदामात पडून राहूनही, युद्धाच्या वेळी हवेत डागल्यावर एका सेकंदात अचूक सुरू व्हावी लागतात. हा समतोल साधणे केवळ काही मोजक्याच देशांना जमले आहे... म्हणून हे कार्य अवघड आणि मोठे आहे!

मी एरो स्पेस अभियांत्रिकी किंवा संरक्षण किंवा मिसाईल्स यातला एक्सपर्ट नाही. त्यामुळे या तपशिलात काही चूक असेल तर जरूर दुरुस्त करावी! 


In reply to by निनाद

टर्बोजेटचे मूळ सूत्र जुनेच आहे.  पण मोठ्या विमानाचे इंजिन एका लहान बॅगेच्या आकारात आणणे हे  प्रचंड गुंतागुंतीचे असावे. 

 

माझ्या माहिती प्रमाणे turbo जेट प्रकार इथे वापरण्यात आला नाही. ड्युअल पल्स सॉलिड प्रॉपेलंट रॉकेट मोटर वापरण्यात आला आहे म्हणजे प्राणवायू आणि इंधन दोन्ही  ह्यांत असते. पाहिजे तर हे स्पेस मध्ये सुद्धा काम करू शकते. turbo जेट चे तत्व पूर्णतः वेगळे आहे.

दोन्ही चे तत्व वेगळे असले तरी तंत्रज्ञान दृष्टिकोनातून दोन्ही प्रचंड अवघड आहेत. 


In reply to by साहना

साहना,

 

पाहिजे तर हे स्पेस मध्ये सुद्धा काम करू शकते.

३५० किलो इतक्या चिमुकल्या ढकलजोरावर हे अवकाशापर्यंत ( ~ शंभरेक किमी उंच ) जाणे अवघड वाटते. मात्र तुमचं निरीक्षण सैद्धांतिक दृष्ट्या ( = थियरॉटिकली ) योग्य असावं.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

turbo जेट्स स्पेस मध्ये काम करू शकत नाहीत कारण ह्यांचे प्रमुख इंधन "हवा" (आणि जेट इंधन) असते त्याशिवाय हवेतील प्राणवायू सुद्धा ज्वलनासाठी आवश्यक असतो. सामान्य हवा कॉम्प्रेस करायची आणि त्यांत स्फोट घडवून आणायचा आणि त्या प्रसरणातून अग्रेषित बल निर्माण करायचे असा सिंद्धांत आहे. सॉलिड इंधन मध्ये प्राणवायू आणि इंधन दोन्ही सोबत असल्याने बाहेरील हवेची गरज नसते. त्यादृष्टीकोनातून हे इंजिन स्पेस मध्ये चालू शकते. कुश चे इंजिन छोटे आहे त्यामुळे कदाचित गुरुत्वाकर्षण भेदून जाऊ शकणार नाही पण निव्वळ सैद्धांतील दृष्टिकोनातून हे स्पेस मध्ये चालू शकते.

GE चे CEO म्हणतात कि तुम्हाला जर आमच्याशी स्पर्धा करायची असेल तर तुम्ही ३० वर्षे मागे सुरुवात केली पाहिजे होती. थोडक्यांत turbo जेट इंजिन बनवणे हे खर्चिक काम आहे आणि दशकों त्यावर विविध क्षेत्रांतून अभ्यास केला पाहिजे. विशेषतः मटिरिअल सायन्स. ह्या विविध क्षेत्रांत ३०-४० वर्षे मागे फक्त सरकारी संस्था होत्या. आता खाजगी संस्था आणि खाजगी विद्यापीठे सुद्धा त्यांत हिरीरीने भाग घेत आहेत.

Skyroot Aerospace ह्या भारतीय कंपनीने विक्रम-१ हे पहिले भारतीय खाजगी रॉकेट काही दिवस मागे लॉन्च केले. हि खूप मोठी बातमी आहे. इस्रोतील अनेक वैज्ञानिकांनी सरकारी नोकरी सोडून ह्यांत नोकरी धरली आहे.

एकूणच भारतीय खाजगी कंपन्या आता deep tech मध्ये आपले पाय ओले करत आहेत हि खूप प्रशंसनीय बाब आहे. भारतीय बाबू मंडळींची कुदृष्टी ह्यांच्यावर न पडो हि ईश्वरचरणी प्रार्थना. 


In reply to by अप्पा जोगळेकर

भारतीय तंत्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. ज्याचे कौतुक व्हायला हवे ते मागे पडतेय.


In reply to by अप्पा जोगळेकर

त्याची किंमत वाढवायला चांदीचा वर्ख लावल्यासारखे जंतरमंतर आंदोलनाला नाक मुरडावेच लागत असेल तर उकिरडा नेमका कुठे आहे हे सुज्ञ लोकांना कळेलच ! ह्याला काय अर्थ आहे ! 

 

बाकी (आरक्षण घेऊन भरती करणाऱ्या) DRDO आणि इतर सरकारी संशोधनशाला आणि संशोधकांचे हार्दिक अभिनंदन, भारत असाच बलशाली होवो आणि शत्रूच्या आघातांना परतवून लावू देत हीच प्रार्थना, जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय


In reply to by वृषभ खोंडे

मला तर दादा कोंडकेचा तो वापरलेल्या दगडांचा सीन आठवला.

बेक्कार तीज्यायला....


In reply to by वृषभ खोंडे

आणि ह्या सर्वाना कठोर शिक्षा देण्यासाठी SBI मध्ये खाते उघडायला लावले जाईल आणि दर महिन्यात एकदा KYC करावे लागेल.  


Indian judoka Asmita Dey dedicated her historic women's 48kg gold medal at the Commonwealth Games 2026 to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath. She credited her success to the financial stability and support she received after being appointed as a sub-inspector in the UP Police. 

I dedicate this Gold Medal to my Guru and PM Modi.” — Dilip Gavit 🥇 Despite losing an arm in childhood, Dilip Gavit never gave up. With a record-breaking 10.71 seconds in the Men's 100m T47 event at the Commonwealth Games, he created history and won Gold


10 सुवर्ण पदकांसह भारत आता 5 क्रमांकवर आहे. ह्यावेळी cost cutting मुळे कुस्ती, बॅडमिंटन, होकी, क्रिकेट हे हमखास मेडल मिळवून देणारे खेळ नसतानादेखील बॉक्सिंग, ज्युडो, ट्रॅक अँड फील्ड च्या जोरावर भारताने मेडल tally मधे उल्लेखनीय यश मिळवले आहे. 


In reply to by अप्पा जोगळेकर

Maths ऑलिम्पियाड मधल्या गोल्ड मेडल पाठोपाठ राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातल्या तरुण आणि तरुणींनी मिळवलेल्या ह्या यशामुळे जंतरमांतर येथल्या रिकामटेकडे आंदोलनाचे डाग धुवून निघण्यास मदत झाली आहे