जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.
ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.
सध्या Citizen Vigilante या जर्मनी व ब्रिटनने अप्रत्यक्षरीत्या बंदी घातलेल्या सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सद्गुणविकृतीचा प्रादुर्भाव झालेल्या युरोपातील जनमानस या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसते.

| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
4206
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुन्हेगारी, बेरोजगारी आणि…
गुन्हेगारी, बेरोजगारी आणि सामाजिक अस्थिरता यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे खापर स्थलांतरितांवर फोडण्याची प्रवृत्ती या चित्रपटात ठळकपणे दिसून येते. समाजातील प्रत्येक समस्येचे कारण "बाहेरून आलेले लोक" असतात. चित्रपट चांगला आहे तरी एकतर्फी वाटतो . एकदा का इमिग्रंट वर संशय सुरु झाला कि मग सर्व इमिग्रण्टस सारखे दिसू लागतात . मग सर्व UP वाले भैये किंवा पाकिस्तानी मुसलमान होतात . मग सर्वच भारतीय घाणीत राहणारे होतात . (online comments bagha ). असल्या चित्रपटा मुळे सर्व नॉन-व्हाईट लोकांवर इम्पॅक्ट होतो.
केतन अग्रवाल हत्या प्रकरण ....
हत्येच्या पूर्वी काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो.
सिया गोयलने केतन अग्रवालकडे लग्नापूर्वीच एक कोटी रुपये ( व्यवसायासाठी वगैरे ) मागितले. ते त्याने दिले. ते पैसे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरीस दिले. त्याने त्याचं काय केलं कोणास ठाऊक.
जसजसं लग्नं जवळ येऊ लागलं, तसतसा सियाचा धीर सुटू लागला. तिने केतनपाशी पैसे हरवल्याची ( व्यवसायात खोट आल्याची वगैरे ) बतावणी केली. मी एव्हढे पैसे घालवल्याने आता हे लग्न करणं बरोबर नाही, असा काहीसा सूर लावला. त्यावर केतन म्हणाला की आता लग्नं मोडणं अशक्य आहे. मला माझ्या कुटुंबियांना पैशांचा हिशोब द्यावा लागेल. जरी लग्नं मोडलं तरी माझे कुटुंबीय तुला कुठूनही शोधून काढतील.
त्यावर तिने केतनला संपवायचा निर्णय घेतला. तो अर्थात चेतनशी सल्लामसलत करूनंच. हत्येपश्चात ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वत्र माहिती आहेत.
मला जे वाटलं ते लिहलं आहे. या तर्कविलासास या क्षणी कोणताही पुरावा नाही. भविष्यांत मिळू शकतो.
-गा.पै.
एक कोटीमुळेच सगळी भानगड…
In reply to केतन अग्रवाल हत्या प्रकरण .... by गामा पैलवान
एक कोटीमुळेच सगळी भानगड झालेली दिसते. नाहीतर ठरवून होणाऱ्या विवाहात एखाद्या मुलाला सांगितलं की माझा तुला नकार आहे तर कोणी कशाला इतकं कोणाच्या मागे लागेल.
महाराष्ट्राची खरी ओळख ?
"महाराष्ट्राची खरी ओळख संविधानात नव्हे, तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे." अश्या अर्थाचे विधान महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे.
वाट्सप युझरनेम
सुरू होणार आहे. आता एखादं आवडीचं नाव घेऊन ठेवायची सोय दिली आहे.
त्याचा उपयोग होईल असं वाटतंय. फोन नंबर न देता संपर्काचं साधन.
माझं नाव ....
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
माझं नाव घ्यायला गेलो तर आधीच आरक्षित झालं होतं. मग वडिलांचं आद्याक्षर मध्ये ठेवलं, तर नशिबाने मिळालं.
-गा.पै.
युजर नेम फीचर भारतात आणू नये…
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
युजर नेम फीचर भारतात आणू नये असं केंद्र सरकारने "मेटा"ला सांगितल्याची बातमी वाचली होती नुकतीच.
रिजर्व केलं.
In reply to युजर नेम फीचर भारतात आणू नये… by गवि
तिकडे प्रा.डॉ.ची फ्यासिलिटी नसल्याचा निषेध व्यक्त करुन इंग्रजी रिजर्व केले.
-दिलीप बिरुटे
भारत सरकारने व्हॉट्सऍप usernames program
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
तहकूब करायला सांगितला आहे मेटा कॉर्पोरेशनला
ह्याच्या अगोदर सरकारने मेटा कॉर्पोरेशनला भारतीय नंबर वरून WhatsApp वापरण्यासाठी SIM Binding सक्तीचे करण्यास सांगितले होते पण ते काही पुढे सरकले नाही/ सरकवले नाही.
केलेल आहे पण मिच मिचित पणे
In reply to भारत सरकारने व्हॉट्सऍप usernames program by वृषभ खोंडे
केलेल आहे पण मिच मिचित पणे
याआधी ट्विटर प्रकरणावरून या…
In reply to भारत सरकारने व्हॉट्सऍप usernames program by वृषभ खोंडे
याआधी ट्विटर प्रकरणावरून या मोदी सरकारची जी बेअब्रू झाली होती ते प्रकरण आठवले.
इतके कणाहीन सरकार बहुधा याआधी कधीही केंद्रात नव्हते.
वाट्सप युझरनेम दिलं तरी…
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
वाट्सप युझरनेम दिलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने फोन नंबर दिसत राहावा असे मला वाटते.
मी सुद्धा... माझ्याकडे…
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
मी सुद्धा... माझ्याकडे व्हॉट्सऍप प्लस सबस्क्रिप्शन चा पर्याय पण खुला झालाय... पण काय मजा नाही, टेलिग्राम ची नक्कल केलीय
खामेनीच्या अंत्यसंस्काराला…
खामेनीच्या अंत्यसंस्काराला विश्वघाबरू जाणार नाही.
पटलंय हे
In reply to खामेनीच्या अंत्यसंस्काराला… by आग्या१९९०
पटलंय हे
रामलल्लाच्या नावावर आयोध्या…
रामलल्लाच्या नावावर आयोध्या आयोध्या राम राम करुन सत्ता आणून देशाला लुटले आता, राम लल्लाचे सोने चांदी लुटले, देणग्यात अपहार केला, दर्शन रांगेत पण पैसे केले, या सगळ्यां फोकलीच्यांना राम नरकात घालणार शंभर %
तरी, पण तिकडे ते आवाज देणार मित्रो... अरे आवरा रे यांना. तिकडे तेल दराची एवढी घसरण झाली पण भारतीय तेल कंपन्या दर अजिबात कमी करायला तयार नाही. नायराच्या पंपावर दर कमी आहेत.
गोबरयुगात जी वाताहात व्हायची ती होणार आहेच मतदानाची सॉरी कर्मभोगाची फळं चाखावीच लागतील यात वाद नाही.
-दिलीप बिरुटे
गोबरयुगात जी वाताहात व्हायची…
In reply to रामलल्लाच्या नावावर आयोध्या… by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बकरीवाद्यांची तडफड पाहून जाम मजा येतेय!
गोबरवाद्यांना तीही सोय नाही…
In reply to गोबरयुगात जी वाताहात व्हायची… by कांदा लिंबू
गोबरवाद्यांना तीही सोय नाही. तोंडात गोबरची गुळणी धरून गप्प बसावे लागते . बिच्चारे!
त्या कवितेसारखं...
In reply to गोबरवाद्यांना तीही सोय नाही… by आग्या१९९०
कांबळेंच्या कवितेसारखे हे नुसतेच कण्हतात. अं. ;)
-दिलीप बिरुटे
चपखल
In reply to त्या कवितेसारखं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चपखल
रागा आजोबा!
In reply to त्या कवितेसारखं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही कितीही कण्हत राहा, कांबळेसारखे नाही अजून कुणासारखे; तुमचे रागा* काही पंप्र होणार नाहीत बहुतेक!
*(खरंतर रागा आजोबा. साठी उलटली, नाही का? आमच्यात ज्येष्ठांना आदरपूर्वक बोलतात हं!)
ह्यावर एक धागा लिहिला होता…
In reply to रामलल्लाच्या नावावर आयोध्या… by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्यावर एक धागा लिहिला होता परवाच... मिरच्या झोंबल्यात तथाकथित विद्वानांना
व्यवस्थेतील लोकांवर टीका...
सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे', असे सांगतानाच 'भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा ठरू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना ठणकावले.
हे काय चालले आहे ? जनतेला सरकारचे गुलाम बनवायचे आहे का ? ते निषेध करू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाहीत. हे सर्व काय आहे? आता तर अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. नागरिकांनी निषेध केला तर तुम्ही गुन्हे दाखल करता. हे काय आहे ? निषेध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने केवळ 'भाजप सरकार मुर्दाबाद', 'अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत ? अशा घोषणांसाठी हद्दपारीचे आदेश का ?' अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती जामदार यांनी केली.
पोलीस मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत. जनतेचे सेवक आहेत' असे न्यायालयाने सुनावले. ( लोकसत्ता बातमी )
अशा काही निकालांनी व्यवस्थेविरुद्ध लिहिणा-या बोलणा-यांचा आत्मविश्वास वाढतो. बळ मिळतं.
केतन अग्रवालच्या आजोबांचं निधन
केतनच्या हत्येमुळे दु:खी असलेल्या त्याच्या आजोबांचं देवीचंद अग्रवाल यांचं नुकतंच निधन झालं. सिया गोयलशी केतनचं लग्न जुळवल्याचा त्यांना अतिशय खेद झाला. त्यांना शांती व सद्गती लाभो.
-गा.पै.
ताजी बातमी
कुठलाही मागमूस न लागता दुबई, संयुक्त अरब अमिरात येथून उडालेले पाकिस्तानी मालवाहू विमान पाकिस्तानी वायुक्षेत्रात शिरल्या शिरल्या ५ कर्मचाऱ्यांसह गायब
ऐकावे ते नवलच !
In reply to ताजी बातमी by वृषभ खोंडे
ऐकावे ते नवलच !
जादूचे प्रयोग
In reply to ताजी बातमी by वृषभ खोंडे
जादूचे प्रयोग
रुहानी ताकदे 😄
In reply to जादूचे प्रयोग by अनिशासूत
रुहानी ताकदे 😄
ताजी बातमी
मुंबईतील सुप्रसिद्ध के रुस्तुम आईसक्रीम पार्लर आणि डेअरीला अन्न व औषधी प्रशासनाचा दणका, टाळे ठोकले
मुदतबाह्य फ्लेवर, डेअरी आणि आईसक्रीम प्रोडक्शन एरिया मध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्यामुळे झाली कारवाई, परवाना झाला रद्द. अतिशय मुजोर अशा ह्या पारशी बावाला जागा दाखविल्याबद्दल तुकाराम मुंडेंचे हार्दिक अभिनंदन.
बंदे में दम हैं 🤩
In reply to ताजी बातमी by वृषभ खोंडे
बंदे में दम हैं 🤩
अर्थातच !
In reply to बंदे में दम हैं 🤩 by अनिशासूत
पहिली गोष्ट म्हणजे ते पारशी विक्षिप्तपणाला गोडगोड मुलामा देऊन बावा बावा करण्याची मला विलक्षण झीट ! त्यात ह्यांचा माज ! इराण मधून आले त्यानंतर मुंबईत स्थिरावले अन् ब्रिटिशांना सेवा पुरवठादार/ कंत्राटदार म्हणून गब्बर झाले त्यातही अफूच्या व्यापारात पुढे, अर्थात ती तत्कालीन व्यवसाय रीत म्हणून इतिहास दिला सोडून, पण आजचे काय? युपीआय घेत नाही, कार्ड चालत नाही, चालले तर २% चार्ज ग्राहकाच्या बोडक्यावर ! अन् खायला घालणार काय ? तर पाव लोणी (ते पण लोणीच का मार्गारिन त्याचा पत्ता नाही) अन् शेपू घातलेला भयाण खीमा, पारशी हॉटेल मध्ये एकदा खाल्ल्यावर ब्रिटिश लोक किती पुळकवणी जेवत असतील ते कळते. त्यात जनतेला त्या पालोनजी सोडाची कोण खाज ! फुल साखर आणि रंग + कृत्रिम फ्लेवर मिसळून सोडा वॉटर मधे मिसळले की झाले लिजेंडरी पारशी ड्रिंक ! ह्यांना थोडे जमिनीवर आणणे गरजेचे आहे / होते हे माझे वैयक्तिक मत.
बरंच तथ्य आहे ....
In reply to अर्थातच ! by वृषभ खोंडे
या संदेशात बरंच तथ्य आहे. पण माझ्याकडे नेमकी माहिती नाही.
-गा.पै.
एक महिन्यापूर्वीच मुंबईतील खादाडी विडिओ पाहिला होता..
In reply to ताजी बातमी by वृषभ खोंडे
https://youtu.be/2bznPzpUWPg?si=qZ0zWUtuTZtxgdr3
१५:१५ ला पाहा.
विद्यार्थ्यांसाठी आंदोलन…
विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्याच्या नावाखाली जाळपोळ, मारहाण, नासधूस, नुकसान करणारे समाजकंटक व त्यांचे पाठीराखे यांना शासनाने चांगलेच फोडून काढायला हवे.
पण सध्याच्या सरकारमध्ये तेवढा दम नाही. सतत हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या मोदी सरकारकडून काही चांगले केले जाईल किंवा काही वाईट करणे टाळले जाईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
१२ वर्ष झाली तरी षंढांकडून…
In reply to विद्यार्थ्यांसाठी आंदोलन… by कांदा लिंबू
१२ वर्ष झाली तरी षंढांकडून अपेक्षा करता? सुधारा.
१२ वर्ष झाली तरी षंढांकडून…
In reply to १२ वर्ष झाली तरी षंढांकडून… by आग्या१९९०
१२ वर्ष झाली तरी षंढांकडून अपेक्षा करता?
वर मराठीत लिहिले आहे की मेंडरीनीत ?
सुधारा.
सुधारण्याची गरज तुमच्यासारख्या डाव्यांना आहे.
नक्की किती जाळपोळ झाली आहे ?…
In reply to विद्यार्थ्यांसाठी आंदोलन… by कांदा लिंबू
नक्की किती जाळपोळ झाली आहे ?
किती मारहाण आणि नासधूस झाली आहे ?
ज्यांना तुम्ही समाजकंटक म्हणून संबोधित करता ते नक्की कोण आणि तुम्ही कुठल्या आधारावर करत आहात ?
डावे कधी सुधारले का? …
डावे कधी सुधारले का? सगळ्या राज्यांतून गच्छंती झाली पण हे झापडबंद तसेच राहिले!
फारच अपेक्षा बुवा तुमच्या!
हे कोण सांगतय ? हिरवी टाळकी …
In reply to डावे कधी सुधारले का? … by सुबोध खरे
हे कोण सांगतय ? हिरवी टाळकी ?
हिरवी टाळकी चा इथे काय संबंध…
In reply to हे कोण सांगतय ? हिरवी टाळकी … by आग्या१९९०
हिरवी टाळकी चा इथे काय संबंध?
.तुम्ही कॉलेजला असताना पॉर्न…
.
तुम्ही कॉलेजला असताना
पॉर्न बघितले,
लफडी केली,
बिड्या मारल्या,
दारू ढोसली,
कॉप्या केल्या,
इन शॉर्ट सगळे किडे केले..
तुम्ही निष्पाप होता काय?
याचं स्पष्ट उत्तर #नाही असेच आहे!
तुम्ही - आम्ही, आपण काही निष्पाप नव्हतो. आजची मुले आपल्या पुढची केस आहेत, ही सुद्धा निष्पाप नाहीत.
कॉलेजवयीन मुलं-मुली निष्पाप अजिबात नसतात, ही काही बालवाडीतली मुले नाहीत. मोठमोठ्या राजकीय संघटना चालवतात, भाईगिरी करतात, निवडणुका लढवतात, राजकारण करतात, ही मुले निष्पाप नसतात. कॉलेजमधल्या शिक्षकांना विचारा काय त्रास असतो...
अर्थात, अपवाद असूच शकतात हं!
त्यामुळे विद्यार्थी = निष्पाप ही धारणा बाजूला ठेवून विचार करणे आवश्यक आहे.
पार्ट २
या देशात एका विशिष्ट #कव्हर खाली लपून राजकारण करण्याची एक घातक पद्धत निर्माण झाली आहे.
त्याचं एक उदाहरण म्हणजे
आदिवासींच्या प्रश्नांच्या आडून नक्षलवादाला खतपाणी घालणं. यात नक्षलवादी स्वतःचा अजेंडा पुढे रेटतात आणि अनेकदा निरपराध आदिवासीच त्याची किंमत मोजतात.
अशाच प्रकारची रणनीती अनेक आंदोलनांमध्ये दिसून येते. कम्युनिझम ही आपल्या व्यवस्थेला लागलेली एक गंभीर कीड आहे. जंगलातील नक्षलवादावर कारवाई करता येते;
पण शहरांमध्ये विचारसरणीच्या माध्यमातून रुजलेला शहरी नक्षलवाद ओळखणं, आपल्याच आजुबाजूला वावरणाऱ्या लोकांमधले अती डावे लोक ओळखणं आणि त्यांना रोखणं अधिक कठीण ठरतं.
ज्यांना विचारसरणीची गणिते समजतात,
डावे, उजवे, अतिडावे, अतिउजवे, तीव्र डावे, तीव्र उजवे, डावीकडे झुकलेले, उजवीकडे झुकलेले तसेच अनेक संधीसाधू पॉडकास्टर (कारण यांचा प्रेक्षक युथ आहे)
जे दोन्ही बाजूने बॅटिंग करतात, त्यांना अशी आंदोलने लगेच क्लिक होतात.
कोणतेही आंदोलन घ्या, तिथे सगळे असंतुष्ट गट एकत्र येतात. आता या आंदोलनात कलम ३७० मागे घ्या म्हणून मागणी होत आहे, तिकडे पंजाब मधून शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत, इथे कामरा आहे, स्वरा भास्कर आहे, सगळा मालमसाला खच्चून भरलेला आहे!
अशा परिस्थितीत "विद्यार्थी" हा आंदोलनासाठी एक प्रभावी कव्हर ठरतो. कारण विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई झाली, लाठीचार्ज झाला किंवा एखादा विद्यार्थी जखमी झाला, तर त्याचे भावनिक व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखवून मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण करता येते.
इथे नाव विद्यार्थ्यांचं पण काम होतंय संधीसाधूंचं आणि राजकीय असंतुष्टांचं! ज्याला हे समजलं तोच खरा हिंदुत्त्ववादी. नाहीतर या गर्दीत सामील होऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे आत्मघातकी काही कमी नाहीत.
बाकी या आंदोलनात मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंटचे विद्यार्थी किती आहेत याचे मला कुतूहल आहे 😄
कारण ज्यांच्या नावावर आंदोलन झाले त्यांनी री एक्झाम देऊन प्रवेशही घेतले...
https://www.facebook.com/share/p/1RrocuCakJ/
दिपके आप च्या आय टी सेल…
दिपके आप च्या आय टी सेल मध्ये काम करत असे. फेब्रुवारी मध्ये पंजाबच्या निवडणूका आहेत. केजरीवाल आणि कंपनी उतरलेली आहेच. तेंव्हा आता या आंदोलनात पंजाबचे शेतकरी राकेश टिकैत आणि कंपनी उतरले नाहीत तरच आश्चर्य वाटेल
मोदींची पोस्ट "चुकून" हटवली!
दीडशे कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे , भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोमि पोस्ट एका खाजगी कंपनीने चुकून हटवली! चुकून हं, मुद्दामून नाही!
IT ministry summons Meta after PM Modi's post on strict action over paper ‘leaks’ removed
ती त्या विविक्षित कंपनीने
In reply to मोदींची पोस्ट "चुकून" हटवली! by कांदा लिंबू
मॅन्युअली हटवली/ रिस्ट्रिक्ट केली असा तुमचा दावा आहे का ?
खाजगी कंपनीने हटवली ! काय…
In reply to मोदींची पोस्ट "चुकून" हटवली! by कांदा लिंबू
खाजगी कंपनीने हटवली ! काय गैर केलं ? मंकी बात आहेच कि !
गोबीच्या इन्स्टावर भयंकर ट्रॉलींग आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणून पाहते ! गोबींचे धाबे दणाणले आहे असे वाटते
दीडशे कोटी नागरिक असलेल्या…
In reply to मोदींची पोस्ट "चुकून" हटवली! by कांदा लिंबू
दीडशे कोटी नागरिक असलेल्या भारत सरकारची सोमिवर काय किंमत आहे हे मेटाने दाखवून दिले आहे.
मागे ट्विटर प्रकरणात (मला वाटतं, रवी शंकर प्रसारणमंत्री असताना) भारत सरकारने अशीच स्वतःची बेअब्रू करून घेतली होती.
संघ-भाजप-मोदी यांना स्वतःची आणि म्हणून अनेक वेळा भारता सरकारची/ भारताच्या नागरिकांची बेअब्रू करून घेण्याची सवयच आहे.
He is a former state…
अनैच्छिक ब्रह्मचारी संघाचे हे वैफल्यग्रस्त नेतृत्व !
रशियाकडून कच्चे तेल…
रशियाकडून कच्चे तेल घेण्यासाठी मी भारताला अजून एक महिन्यासाठी अनुमती दिली आहे, मीच भारत-पाकिस्तान युद्ध थाबविले, माझ्यामुळे एक कोटी लोकांचे प्राण वाचले, भारत-पाकिस्तान युद्धात १०-११ विमाने पडली (हा आकडा ४-५ वर सुरूवात होऊन नंतर वाढत वाढत १०-११ वर येऊन थांबलेला दिसतो) . . . या ट्रंपच्या फुशारकीयुक्त थापा २-३ महिन्यांपासून बंद झालेल्या दिसतात. इराण विरूध्दच्या युद्धात तोंड काळे करून घेतले हे यामागचे कारण असावे. भारताने सुरूवातीपासूनच ट्रंपच्या बरळीकडे ठरवून दुर्लक्ष केले होते कारण मुर्खाच्या तोंडी लागण्यात अर्थ नसतो हे भारत ओळखून आहे.
मीडिया जंतरमंतरचा उकिरडा…
मीडिया जंतरमंतरचा उकिरडा हुंगत असताना २३ जुलै रोजी भारतीय तंत्रज्ञानीं मिळवलेले हे यश काहीसे उपेक्षित राहिले.
On July 23, 2026, the Indian Ministry of Defence announced a major dual breakthrough in aerospace and defense: the maiden flight-test of the Project Kusha long-range surface-to-air missile (LRSAM) and the successful development of India’s first indigenous 350 kg thrust-class expendable turbojet engine.
छोटं जेट
In reply to मीडिया जंतरमंतरचा उकिरडा… by अप्पा जोगळेकर
माझ्या ( अल्पश्या ) आकलनानुसार इतक्या छोट्या क्षमतेचं जेट इंजिन बनवणं बरंच अवघड आहे. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन.
-गा.पै.
सहमत आहे जेट इंजिन बनवणं अवघड आहे
In reply to छोटं जेट by गामा पैलवान
तथापि गा.पै. साहेबांचा प्रतिसाद तोकडा वाटला आणि त्यांनी इंजिन बनवणं अवघड का आहे हे दिले नाही. म्हणून ही अल्पशी भर.
थ्रस्ट क्लास एक्स पेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार करणे हे केवळ 'कॉपी-पेस्ट' करण्यासारखे सोपे काम नाही. म्हनजे उगाच आन तिकडचे ईंजिन आणि कर रेव्हर्स इंजिनियरींग असे करू शकत नाही..
हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक एरो स्पेस अभियांत्रिकी कार्य आहे. टर्बोजेटचे मूळ सूत्र जुनेच आहे. पण मोठ्या विमानाचे इंजिन एका लहान बॅगेच्या आकारात आणणे हे प्रचंड गुंतागुंतीचे असावे.
क्षेपणास्त्राला पुरेसा वेग देण्यासाठी या लहान इंजिनला प्रति मिनिट ३०,००० ते ६०,००० पेक्षा जास्त आर पि एम ने फिरावे लागते. निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेने इंजिनचे सुटे भाग वितळण्याचा किंवा तुटण्याचा मोठा धोका असतो. सर्वात मोठी कसोटी म्हणजे, हे इंजिन एकदाच वापरले जाणार असल्याने यात विमानासारखे अतिमहागडे धातू वापरणे परवडत नाही! त्यामुळे ३D प्रिंटिंग आणि स्वस्त धातू वापरूनही ते तितकेच मजबूत बनवणे हे मुख्य आव्हान असते.
शिवाय, महत्त्वाचे आव्हान मला वातते की ही इंजिने तशी कोणतीही देखभाल न करता १० ते १५ वर्षे गोदामात पडून राहूनही, युद्धाच्या वेळी हवेत डागल्यावर एका सेकंदात अचूक सुरू व्हावी लागतात. हा समतोल साधणे केवळ काही मोजक्याच देशांना जमले आहे... म्हणून हे कार्य अवघड आणि मोठे आहे!
मी एरो स्पेस अभियांत्रिकी किंवा संरक्षण किंवा मिसाईल्स यातला एक्सपर्ट नाही. त्यामुळे या तपशिलात काही चूक असेल तर जरूर दुरुस्त करावी!
टर्बोजेटचे मूळ सूत्र जुनेच…
In reply to सहमत आहे जेट इंजिन बनवणं अवघड आहे by निनाद
माझ्या माहिती प्रमाणे turbo जेट प्रकार इथे वापरण्यात आला नाही. ड्युअल पल्स सॉलिड प्रॉपेलंट रॉकेट मोटर वापरण्यात आला आहे म्हणजे प्राणवायू आणि इंधन दोन्ही ह्यांत असते. पाहिजे तर हे स्पेस मध्ये सुद्धा काम करू शकते. turbo जेट चे तत्व पूर्णतः वेगळे आहे.
दोन्ही चे तत्व वेगळे असले तरी तंत्रज्ञान दृष्टिकोनातून दोन्ही प्रचंड अवघड आहेत.
अवकाशात जाईल काय ....
In reply to टर्बोजेटचे मूळ सूत्र जुनेच… by साहना
साहना,
३५० किलो इतक्या चिमुकल्या ढकलजोरावर हे अवकाशापर्यंत ( ~ शंभरेक किमी उंच ) जाणे अवघड वाटते. मात्र तुमचं निरीक्षण सैद्धांतिक दृष्ट्या ( = थियरॉटिकली ) योग्य असावं.
आ.न.,
-गा.पै.
turbo जेट्स स्पेस मध्ये काम…
In reply to अवकाशात जाईल काय .... by गामा पैलवान
turbo जेट्स स्पेस मध्ये काम करू शकत नाहीत कारण ह्यांचे प्रमुख इंधन "हवा" (आणि जेट इंधन) असते त्याशिवाय हवेतील प्राणवायू सुद्धा ज्वलनासाठी आवश्यक असतो. सामान्य हवा कॉम्प्रेस करायची आणि त्यांत स्फोट घडवून आणायचा आणि त्या प्रसरणातून अग्रेषित बल निर्माण करायचे असा सिंद्धांत आहे. सॉलिड इंधन मध्ये प्राणवायू आणि इंधन दोन्ही सोबत असल्याने बाहेरील हवेची गरज नसते. त्यादृष्टीकोनातून हे इंजिन स्पेस मध्ये चालू शकते. कुश चे इंजिन छोटे आहे त्यामुळे कदाचित गुरुत्वाकर्षण भेदून जाऊ शकणार नाही पण निव्वळ सैद्धांतील दृष्टिकोनातून हे स्पेस मध्ये चालू शकते.
GE चे CEO म्हणतात कि तुम्हाला जर आमच्याशी स्पर्धा करायची असेल तर तुम्ही ३० वर्षे मागे सुरुवात केली पाहिजे होती. थोडक्यांत turbo जेट इंजिन बनवणे हे खर्चिक काम आहे आणि दशकों त्यावर विविध क्षेत्रांतून अभ्यास केला पाहिजे. विशेषतः मटिरिअल सायन्स. ह्या विविध क्षेत्रांत ३०-४० वर्षे मागे फक्त सरकारी संस्था होत्या. आता खाजगी संस्था आणि खाजगी विद्यापीठे सुद्धा त्यांत हिरीरीने भाग घेत आहेत.
Skyroot Aerospace ह्या भारतीय कंपनीने विक्रम-१ हे पहिले भारतीय खाजगी रॉकेट काही दिवस मागे लॉन्च केले. हि खूप मोठी बातमी आहे. इस्रोतील अनेक वैज्ञानिकांनी सरकारी नोकरी सोडून ह्यांत नोकरी धरली आहे.
एकूणच भारतीय खाजगी कंपन्या आता deep tech मध्ये आपले पाय ओले करत आहेत हि खूप प्रशंसनीय बाब आहे. भारतीय बाबू मंडळींची कुदृष्टी ह्यांच्यावर न पडो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
भारतीय तंत्रज्ञांचे हार्दिक…
In reply to मीडिया जंतरमंतरचा उकिरडा… by अप्पा जोगळेकर
भारतीय तंत्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. ज्याचे कौतुक व्हायला हवे ते मागे पडतेय.
आयला चांगली बातमी द्यायची तर द्या की
In reply to मीडिया जंतरमंतरचा उकिरडा… by अप्पा जोगळेकर
त्याची किंमत वाढवायला चांदीचा वर्ख लावल्यासारखे जंतरमंतर आंदोलनाला नाक मुरडावेच लागत असेल तर उकिरडा नेमका कुठे आहे हे सुज्ञ लोकांना कळेलच ! ह्याला काय अर्थ आहे !
बाकी (आरक्षण घेऊन भरती करणाऱ्या) DRDO आणि इतर सरकारी संशोधनशाला आणि संशोधकांचे हार्दिक अभिनंदन, भारत असाच बलशाली होवो आणि शत्रूच्या आघातांना परतवून लावू देत हीच प्रार्थना, जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय
राहुल पत्रकार परिषदेत…
राहुल पत्रकार परिषदेत अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब फोडणार होता ते बॉम्ब फुटले का?
खरे का खोटे माहिती नाही,…
खरे का खोटे माहिती नाही, बचकभर मिठासोबत घेतलेले बरे.
ए.आय. ला गमतीने विचारले
In reply to खरे का खोटे माहिती नाही,… by वृषभ खोंडे
Make me an infographic of all the controversial statements made by Chandrakant dada patil
हे मिळाले.
बेक्कार
In reply to ए.आय. ला गमतीने विचारले by वृषभ खोंडे
मला तर दादा कोंडकेचा तो वापरलेल्या दगडांचा सीन आठवला.
बेक्कार तीज्यायला....
ह्यांची हुंगायची सवय जाणार…
In reply to बेक्कार by अभ्या..
ह्यांची हुंगायची सवय जाणार नाही.
आणि ह्या सर्वाना कठोर शिक्षा…
In reply to खरे का खोटे माहिती नाही,… by वृषभ खोंडे
आणि ह्या सर्वाना कठोर शिक्षा देण्यासाठी SBI मध्ये खाते उघडायला लावले जाईल आणि दर महिन्यात एकदा KYC करावे लागेल.
https://www.espn.in…
https://www.espn.in/commonwealth-games/story/_/id/49436676/commonwealth…
Indian judoka Asmita Dey…
👌👍👏
In reply to Indian judoka Asmita Dey… by अप्पा जोगळेकर
👌👍👏
https://www.facebook.com…
https://www.facebook.com/groups/modern.india/posts/28784984677758892/
I dedicate this Gold Medal…
I dedicate this Gold Medal to my Guru and PM Modi.” — Dilip Gavit 🥇 Despite losing an arm in childhood, Dilip Gavit never gave up. With a record-breaking 10.71 seconds in the Men's 100m T47 event at the Commonwealth Games, he created history and won Gold
👌👏👍
In reply to I dedicate this Gold Medal… by अप्पा जोगळेकर
👌👏👍
10 सुवर्ण पदकांसह भारत आता 5…
10 सुवर्ण पदकांसह भारत आता 5 क्रमांकवर आहे. ह्यावेळी cost cutting मुळे कुस्ती, बॅडमिंटन, होकी, क्रिकेट हे हमखास मेडल मिळवून देणारे खेळ नसतानादेखील बॉक्सिंग, ज्युडो, ट्रॅक अँड फील्ड च्या जोरावर भारताने मेडल tally मधे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
भारतीय तरुणांची अकारण डागाळलेली प्रतिमा पुनर्स्थापित
In reply to 10 सुवर्ण पदकांसह भारत आता 5… by अप्पा जोगळेकर
Maths ऑलिम्पियाड मधल्या गोल्ड मेडल पाठोपाठ राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातल्या तरुण आणि तरुणींनी मिळवलेल्या ह्या यशामुळे जंतरमांतर येथल्या रिकामटेकडे आंदोलनाचे डाग धुवून निघण्यास मदत झाली आहे
सहमत आहे. कन्हैया कुमार, उमर…
In reply to भारतीय तरुणांची अकारण डागाळलेली प्रतिमा पुनर्स्थापित by अप्पा जोगळेकर
सहमत आहे. कन्हैया कुमार, उमर खालिद, शर्जिल इमाम, दिपके . . . एकापेक्षा एक.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या…
In reply to भारतीय तरुणांची अकारण डागाळलेली प्रतिमा पुनर्स्थापित by अप्पा जोगळेकर
राष्ट्रकुल स्पर्धेच्या रेस्टोरंट च्या बाहेरून आंतील पदार्थ पाहून तोंडाला चव काढत तुम्हाला हळूच मागच्या गल्लींत जाऊन जंतर मंतर च्या आंदोलनाच्या कथित कचराकुंडीत पाहावे लागत आहे ह्यावरून दांभिकता, वैफल्य, बुद्धिभ्रम आणि वैचारिक दिवाळखोरी दिसून येत आहे.
जो बूंद से गयी वो हौद से नाही आती !
बदनाम गल्लीतून घरी येऊन जानवे बदलले म्हणून पापक्षालन होत नाही, आणि कुणा सरकारी नोकराने आपल्या मायबापची स्तुती केली आणि श्रेय दिले म्हणून भ्रष्टाचाऱ्याच्या दलदलीचे रुंपांतर लोण्यात होत नाही.
क्या बात है
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेच्या… by साहना
साहना,
अगदी मनातलं बोललांत पहा. पूर्वी कशी पदकंच मिळायची नाहीत. त्यामुळे असली समस्याच उद्भवायची नाही. हल्ली सुवर्ण काय रौप्य काय ही ढीगभर पदकं मिळायला लागल्यापासनं हे असले दावे सुरू झालेत. मोदी आल्यावरंच ही थेरं सुरू झाली.
आ.न.,
-गा.पै.
https://www.youtube.com…
In reply to क्या बात है by गामा पैलवान
https://www.youtube.com/shorts/0EmgeO4CCuk
आपका व्हिजन है सर .... (ह्यांच व्यक्तीचे भारतातील दूरचे भाऊ)
शिळ्या कढीस ऊत
In reply to https://www.youtube.com… by साहना
०९ ऑगस्ट २०२४ चं जुनं चलचित्रं असल्याने शिळ्या कढीस ऊत आणलेला वाटतो ( वैम ).
-गा.पै.
२०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन…
In reply to शिळ्या कढीस ऊत by गामा पैलवान
२०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन राहिलेल्यांसाठी २०२४ म्हणजे फ्रेश माल आहे.
चूर्णप्रभाव
In reply to २०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन… by साहना
२०१४ च्या चूर्णप्रभावे तर इतकी रासभर पदकं मिळताहेत. २०२४ चा माल त्यामानाने निकस, नीरस व शिळसट वाटतो.
-गा.पै.
भारताचा सर्वोत्तम CWG पदक…
In reply to चूर्णप्रभाव by गामा पैलवान
भारताचा सर्वोत्तम CWG पदक तक्ता २०१० साली होता. तेंव्हा भारताला १०१ पदके मिळून भारत द्वितीय स्थानी होता.
सुरेश भाऊ कलमाडी यांचे सुवर्ण पदक
In reply to भारताचा सर्वोत्तम CWG पदक… by साहना
2010च्या cwg स्पर्धा भारतीय भूमीवर भरवल्या गेल्या होत्या आणि ढिसाळ नियोजन, सुरेश कलमाडी यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे ही स्पर्धा क्रीडाबाह्य कारणांसाठीच जास्त गाजली. मायभूमीत भरवली गेलेल्या ह्या स्पर्धेत घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उठवत क्रीडापटूनी अगदी सरस कामगिरी केली होती.अर्थात त्यावेळी शूटिंग, कुस्ती, बॅडमिंटन, होकी हे भारताचे हमखास यश मिळवून देणारे खेळ सोबतीला होते. ह्यावेळी हे खेळ नसून देखील ग्लासगो च्या परकीय भूमीत मिळवलेले यश आण चौथा क्रमांक दिसत असल्यामुळे क्रीडा जगतात आश्चर्य, कौतुक आणि समाधान व्यक्त होत आहे.
क्रीडा जगतात आश्चर्य, कौतुक…
In reply to सुरेश भाऊ कलमाडी यांचे सुवर्ण पदक by अप्पा जोगळेकर
शाखेवर खेळणाऱ्या मध्यमवयीन रिकामटेकड्याना "क्रीडा जगत" म्हणून संबोधित करणे थोडे जास्त नाही का झाले ?
आयला !
पदक राजकारण्यांना समर्पित केलं म्हणून कौतुक ! मुद्दलात मेडल मिळाले ह्याचे तरी कौतुक आहे का नाही कळायला मार्ग नाही. असो !
पदक प्राप्त करणाऱ्या भारताच्या जेन झी क्रीडापटूंचे हार्दिक अभिनंदन ! आणि सरकार हे जनतेने निवडलेले असते अन् प्रसंगी जनता त्यास झुकवू शकते *, ही लोकशाहीवादी जाणीव आणीबाणी नंतर पुन्हा एकदा कैक दशकांनी जागृत करणाऱ्या जेन झी पोरांचे सुद्धा अभिनंदन !
* आणीबाणी काळात इंदिरा गांधीने जेलात टाकलेल्या आमच्या आळीतल्या एका काकांचे प्रांजळ मत
बाकी आमच्या आप्पांचा आवेश जगावेगळा असतो एकदम बटाट्याची चाळ मधला बंडू नाडकर्णी आठवतो. नैष्ठिक, व्रतस्थ, चाळीच्या गॅलरी मध्ये परवचा खडाखडा म्हणणारा, रतन समेळ आणि मधु गुप्तेचे प्रेमपत्र त्याच निष्ठेने घडाघडा तोंडपाठ बोलून पूर्ण चाळीला समजवून सांगणारा !
चालक मालकांना विनंती की पाककृती, काथ्याकूट, कथा आणि ललित, काव्य ह्या सारखाच "आप्पांच्या गप्पा" नावाचा एक नवा लेखन विषयच सुरू केला तर खूप उपकार होतील !.
(गरगर फिरणारा पंखा) खोंडे
तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा…
In reply to आयला ! by वृषभ खोंडे
तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा वाटतोय
नाही
In reply to तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा… by अप्पा जोगळेकर
लग्न झालं आहे माझं, माफक पोरं पण आहेत (सरकारला चालतील इतकी), अन् आई स्वतः कॅलेंडर बघते एकादशी कधी आहे ते पाहते, मला फोर स्क्वेअर काय मार्लबरो पण परवडते अन् मी कॅप्स्टनच्या नादी लागत नाही, इतके असूनही. कॉलेजातील परब , दाराशा अन् कंपनीला वन साईड दोन सेट लागोपाठ हाग्या मार पण दिला आहे बॅडमिंटन मधेच !
नुकतेच बारावे सुवर्ण पदक…
नुकतेच बारावे सुवर्ण पदक मिळवून भारत क्रमांक 4 वर पोचला आहे.
वाहवा
In reply to नुकतेच बारावे सुवर्ण पदक… by अप्पा जोगळेकर
❤️❤️❤️ अगदीच छान बातमी !
सफरचंदे आणि संत्री तुलना करू नये इतकी बेसिक हॉर्सपॉवर बाकी असलेला (नॉन पंजाबी) शेतकरी
- (नाना) खोंडे
Rishikanta सिंगच्या स्तुतीमुळे मोदींचे टीकाकार चवताळले
Indian weightlifter Rishikanta Singh Chanambam dedicated his historic silver medal in the men's 60kg event at the 2026 Commonwealth Games in Glasgow to Prime Minister Narendra Modi. He credited the Prime Minister and the government for strengthening the country's sports ecosystem and providing vital support to athletes.
ब्रिजभूषणाला समर्पित केले तर…
In reply to Rishikanta सिंगच्या स्तुतीमुळे मोदींचे टीकाकार चवताळले by अप्पा जोगळेकर
ब्रिजभूषणाला समर्पित केले तर जास्त आनंद होईल
संघाच्या बाळासाहेब देवरसांनी
आणीबाणीच्या वेळी जेल मधून (येरवडा मध्यवर्ती कारागृह) आणि हॉस्पिटल प्रिजन वॉर्ड मुंबई मधून इंदिरा गांधींना (भालमाण करणारी)
दोन पत्रे लिहिली होती असे कळते आहे. तसेच एक पत्र आचार्य विनोबा भावेंना लिहून इंदिरा गांधींपाशी संघाची रदबदली करून संघावर त्यांनी लादलेली बंदी उठवण्याची विनंती करण्याच्या बाबत पण पत्र आहे असे दिसते.
Ramesh has submitted three letters by Deoras—two to then Prime Minister Indira Gandhi and one to Acharya Vinoba Bhave. Deoras had appealed to Gandhi to lift the ban on RSS. He had also congratulated Gandhi after the Supreme Court had upheld the validity of her 1971 election, writing: “Let me congratulate you as five judges of the Supreme Court have declared the validity of your election.” The letters indicate that the tone and tenor of the correspondence was accommodative towards the government. Deoras had repeatedly appealed for the ban on RSS to be lifted, for its jailed volunteers to be released, and for the organisation to be allowed to contribute to government programmes.
असे म्हणणे आहे एकंद्ररीत खरे खोटे देव, संघोटे अन् खांग्रेसी जाणोत
साधारण अशी गोष्ट पूर्वीही घडली आहे
In reply to संघाच्या बाळासाहेब देवरसांनी by वृषभ खोंडे
गांधीहत्येपश्चात संघावर बंदी घातल्यावर गोळवलकरांनी नेहरूंना पत्र लिहून बंदी उठवण्याची विनंती केली होती. गंमत म्हणजे या बंदीचा गांधींच्या हत्येशी कसलाही थेट संबंध नव्हता.
-गा.पै.
गांधी हत्या
In reply to साधारण अशी गोष्ट पूर्वीही घडली आहे by गामा पैलवान
आणि आणीबाणी दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत.
एक वेगळीच कथा
एका पुनर्मिलनाची गोष्ट
प्रकाश नावाचा तमिळनाडू मधील मुलगा २००३ साली १६ वर्षाचा असताना लहान भावासोबत काहीतरी घरगुती भांडणाचे कारण होऊन घर सोडून जातो. चार महिन्यांनी फोन करून घरी सांगतो की मी चेन्नई मध्ये आहे पण नंतर टोटल गायब. २०२६ मध्ये तो पंजाब मध्ये एका डेअरी फार्म वर वेठबिगार मजूर म्हणून रेस्क्यु होतो आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत री युनाईट होतो.
ट्रंपची केविलवाणी व…
ट्रंपची केविलवाणी व हास्यास्पद अवस्था पाहवत नाही. एखाद्या महासाम्राज्याला अत्यंत नाकर्ता व बुद्धिहीन वारस मिळाल्यानंतर महासाम्राज्य लयाला जाते, तसेच सध्या अमेरिकेत होत आहे. भारतातही एका राजकीय महापक्षाच्या कर्तृत्वहीन व बुद्धिहीन वारसामुळे तो महापक्ष आता गलितगात्र अवस्थेत आहे. काही प्रादेशिक पक्ष सुद्धा नाकर्त्या व बुद्धिहीन वारसामुळे मरणोन्मुख अवस्थेत आहेत.
सुदैवाने अमेरिकेत कायमस्वरूपी वारस नसल्याने अमेरिकेची घसरण २० जानेवारी २०२९ पर्यंतच होत राहील, पण भारतातला राजकीय पक्ष तसे सुदैवी नाहीत.
काल ट्रंप व इस्राएल एकत्रित येऊन इराणवर प्रचंड मोठा हल्ला करणार व इराणची उर्जाकेंद्रे नष्ट करणार अशी ट्रंपने (नेहमीप्रमाणेच पोकळ) धमकी दिली होती. त्यावर इराणनेही धमकी दिली की ते कुवेत, बॅहरिन, सौदी अरेबिया, कतार यांच्यावर जोरदार हल्ला करून त्यांची उर्जाकेंद्रे नष्ट करतील.
आज ट्रंपने जाहीर केले की इराणने वाटाघाटींची तयारी दर्शविल्याने आम्ही हल्ला करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. प्रत्यक्षात असे वृत्त आहे की इराणच्या धमकीमुळे सौदी अरेबिया घाबरला असून त्यांच्या प्रमुखाने ट्रंपशी बोलून हल्ला न करता वाटाघाटी करण्यास सांगितले. इतर अरब देश सुद्धा घाबरले आहेत.
इराण बहुतेक अणुबॉम्ब निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला असावा असे वाटते.
हो ना
In reply to ट्रंपची केविलवाणी व… by श्रीगुरुजी
अहमदाबादेत जगातील सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियम भरून जनता गोळा करून माय फ्रेंड डोलांड पण करून झाले ह्याच्यासाठी पण तात्या काही सुधारण्याचे नाव घेत नाही.
एका मातेची कृतज्ञता - …
एका मातेची कृतज्ञता -
मोदींच्या महानतेमुळे माझ्या कन्येला नवीन आयुष्य मिळाले.
कालाय तस्मै नमः |
गंमतच आहे
In reply to एका मातेची कृतज्ञता - … by श्रीगुरुजी
मोदींनी लाथाबुक्क्या घालून तुडवले नाही. असो, हीच का ती ? १५ ची आहे पण व्यक्तिमत्व पाहून २५ची वाटलेली तुम्हाला ? असो असो !
माझ्या मुलीला दत्तक घेऊन…
माझ्या मुलीला दत्तक घेऊन तिचे आयुष्य घडवा अशी विनंती मुलीची आई करतीये.
हे जरा अति होतंय.
हम्म
In reply to माझ्या मुलीला दत्तक घेऊन… by श्रीगुरुजी
का करवलं जातंय ?
जलमार्गाने जर एखादा घुसखोर…
जलमार्गाने जर एखादा घुसखोर स्पेनमध्ये घुसला तर त्याची नीट चौकशी व्हावी, कोर्टात सुनावणी व्हावी आणि तोपर्यंत त्याला assylum द्यावे याउलट जमिनीमार्गेएखादा घुसखोर आला तर त्याला लगेच हाकलून द्यावे असा अजब निकाल स्पेनच्या न्यायालयाने 16 जुलै रोजी दिला त्यानंतर लगेचच 15 दिवसात मोरोक्कन लोकांनी त्यांचे रंग दाखवले. ही याचिका स्पेनमधल्या amnesty इंटरनॅशनल ने दाखल केली होती असे तपशील समोर येत आहेत
Ceuta ची लोकसंख्या 85000 आहे आणि 60000 घुसखोर सगळे पुरुष वीस ते तीस गटातले आहेत. Ceuta मधल्या स्पॅनिश बायकांचे काही खरे नाही.
तो स्युटा प्रांत उत्तर…
In reply to जलमार्गाने जर एखादा घुसखोर… by अप्पा जोगळेकर
तो स्युटा प्रांत उत्तर आफ्रिकेत आहे. स्पेनशी भौगोलिक संलग्नता नाही. तरीही स्पेनने त्यावर आपले स्वामित्व कायम ठेवले आहे. पोर्चुगीजांनी गोव्यावर याच पद्धतीने स्वामित्व कायम ठेवले होते. अर्ज, विनंती, अहिंसक आंदोलन, सत्याग्रह या मार्गाने गोवा स्वतंत्र होईल या अहिंसक भ्रमात नेहरू १४ वर्षे होते. शेवटी सैन्य कारवाईतूनच गोवा स्वतंत्र झाला.
स्पेनने अश्या भागावरील आपले स्वामित्व सोडायला हवे. अन्यथा ही समस्या वारंवार उद्भवेल.
जगभरात लुटालुट, रक्तपात करून…
जगभरात लुटालुट, रक्तपात करून झाल्यावर मग जगाला मानवतेचे धडे देणाऱ्या शेंगेन व्हिसावाल्या युरोपियन देशांमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र एका अर्थाने काव्यगत न्यायाचे चक्र पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया भारतात व्यक्त होत आहे.
भारतात ? (वाचकांचा पत्रव्यवहार)
In reply to जगभरात लुटालुट, रक्तपात करून… by अप्पा जोगळेकर
भारतात तर (१५ पण व्यक्तिमत्वाने २५) रुचिका सिंहची माफी, तिच्या आईने मानलेले मोदींचे आभार, माझी पोरगी दत्तक घ्या म्हणून फोडलेला टाहो इत्यादी सुरू होते ना ? एकदम स्पेनला असे बोलण्यात अर्थ नाही (उपासाला बटाटा खाऊन अन तिखटाची सोय म्हणून मिरच्या खाऊन) काव्यगत न्याय इत्यादी कादंबऱ्या मध्ये बरे असते बोलायला. काय आप्पा खाली डीप स्टेट मध्ये शिरले अन् इथे थेट कुमार गटात ?
डीप स्टेटच्या विळख्यात सापडलेला आणखीन एक देश
अमेरिकन डीप स्टेटबरोबर जुळवून न घेतल्यामुळे फटका खाल्लेल्या देशांच्या यादीत बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यांच्या पाठोपाठ स्पेनचाही नंबर लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आप्पांच्या गप्पा - विदेशनीती (aka अँडरसनच्या परिकथा)
In reply to डीप स्टेटच्या विळख्यात सापडलेला आणखीन एक देश by अप्पा जोगळेकर
वाचकांचा पत्रव्यवहार -
डीप स्टेट वगैरे काही नसते हो आप्पा राज्यकर्ते म्हणले की सिक्रेट येतात, सिक्रेट म्हणली का तू बऱ्याचवेळा डर्टी सुद्धा असतात. ती वाचण्यासाठी जी धडपड होते ती डीप स्टेट. रिपब्लिकन पार्टीची आपली आहे, डेमोक्रॅटची आपली, प्रत्येक देशाची आपापली, पंधरा वर्षात भाजपची पण तयार झाली असू शकते.
डीपस्टेट म्हणजे काहीतरी लैच सीक्रेट, पाताळयंत्री इत्यादी इत्यादी नाही तुम्ही हॉलिवूड सिनेमे पाहणे बंद करा बुआ आप्पा, गेलाबाजार त्या यूट्यूब वरील रोथ्सचाईल्ड फॅमिली कंट्रोल डी वर्ल्ड इत्यादी शॉर्ट्स पाहणे बंद करा ! There are temporary interests and permanent greed ! विषय समाप्त. (विदेशनितीकार) खोंड्या
राष्ट्रकुल स्पर्धेत १३…
राष्ट्रकुल स्पर्धेत १३ सुवर्णपदकांसहित एकूण ३९ पदकांसह भारताने पदकांच्या क्रमवारीत चौथा क्रमांक मिळवून स्पर्धेची सांगता केली.
सर्व भारतीय पदकविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
👌👏👍💐🌹🎉🎊
गुरुजी
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेत १३… by श्रीगुरुजी
पदक मोदींना योगींना डेडिकेट करणाऱ्यांना काही खास नाही ? हेचि का फळ मम तपाला ?
😭😭
खेळाडुंचे अभिनंदन.
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेत १३… by श्रीगुरुजी
राष्ट्रकुल स्पर्धा नुकतीच संपली. ऑगस्ट महिन्यात भारत श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने असून १९ सप्टेंबर पासून जपानमध्ये एशियन गेम्स ना सुरुवात होत आहे. त्यामुळे राजकारणाच्या दलदलीला आणि आयपीएल नावाच्या तमाशाला कंटाळलेल्या लोकांसाठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने दिलासादायक ठरत आहेत.
माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर
जंतर मंतर येथील रिकाम्या लोकांचे आंदोलन संपले तसे आंदोलकांच्या नेत्यांनी आंदोलकांना वाऱ्यावर सोडून दिले असून त्यामुळे
रुचिका सिंग यांच्यापाठोपाठ माफीनामे देण्याची अहमहमिकाच आंदोलकांमध्ये सुरु झाली असून आंदोलकांच्या पालकांना अक्षरश: तोंड लपवून फिरावे लागत आहे. शिवीगाळ आंदोलन करत असताना काही लोकांनी स्वतः:ची तुलना थेट भगतसिंग यांच्यासारख्या महान प्रभृतींशी केली आणि आता चार दिवसांतच नाक घासून हातापाया पडण्याची वेळ आल्यामुळे हा लोकांच्या टिंगलटवाळीचा विषय झाला आहे.
दिल को बेहलाने के लिये गालिब…
In reply to माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर by अप्पा जोगळेकर
दिल को बेहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है , एक ब्रह्मन् ने कहा है ये साल अच्छा है ।
ह्या बातम्या पांचजन्य मध्ये छापून येत आहेत कि सनातन प्रभात मध्ये ?
+१खऱ्या बातम्या तर वेगळ्याच…
In reply to दिल को बेहलाने के लिये गालिब… by साहना
+१
खऱ्या बातम्या तर वेगळ्याच येताहेत.
पैसा वसूल
In reply to माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर by अप्पा जोगळेकर
आप्पांच्या गप्पा पुष्प (कितवे ?) :
आप्पांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांचे पालक आता चेहरे लपवून फिरतात, त्यामुळे त्यांना मजा येत असावी. लवकरच पोलिसांतर्फे झालेल्या लाठीचार्ज वर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पण आप्पांच्या गप्पांमध्ये तो विषय त्याज्य असल्यामुळे असले फाऊल करणाऱ्यांचे देशद्रोह क्रेडिट एकदम १० पॉइंट्सने वाढू शकते असे सुतोवाच आप्पांनी केले आहे.
(वृत्त निवेदक) खोंड्या
राष्ट्रकुल स्पर्धा
सर्व भारतीय पदकविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
👌👏👍💐🌹🎉🎊
भाजपच्या अध्यक्षपदी निवड…
भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नबिन यांनी आपल्या बिहार विधानसभेतील सदस्यत्वाचा त्याग केला होता. त्या बांकिपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
या जागेवर १९९५ पासून सलग ८ निवडणुकीत भाजपचा उमेदवार जिंकत होता. परंतु या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर जवळपास ९,००० मतांनी पुढे आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. असं वाटतंय की नितीशकुमारना मुख्यमंत्रीपद सोडून भाजपला द्यावे लागल्याने त्यांच्या संजदचे समर्थक उमेदवार नाराज असून आपली नाराजी त्यांनी प्रशांत किशोरांना मत देऊन व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर जवळपास १९ हजार…
प्रशांत किशोर जवळपास १९ हजार मतांनी जिंकले. भविष्यात कदाचित प्रशांत किशोर व नितीशकुमार एकत्र येऊ शकतात.
नितीन नबीनच्या जागेवरून भाजप…
नितीन नबीनच्या जागेवरून भाजप हरली, आत्मपरीक्षणाची सक्त गरज आहे. २००६ मधे ते पटना (पश्चिम) मतदारसंघातून पहिल्यांदा पोटनिवडणूक जिंकले आणि आमदार झाले. त्याच्यानंतर मतदारसंघ परिसिमन झाल्यावर स्थापित बांकीपुर मतदारसंघातून ते कायम जिंकत आले आहेत. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ सालच्या निवडणुका ते असेच सलग जिंकले होते. त्यातून ते भाजपचे जुने नेते नबीन किशोर प्रसाद सिन्हा ह्यांचे चिरंजीव होते (परिवारवाद ? असो). इतके सगळे असताना आणि शक्यतो प्रतिष्ठेच्या असल्यामुळे पोटनिवडणुकी कुठलीही पार्टी आपल्याला अतिशय जास्त झुकते मत असणारा मतदारसंघ घेऊनच लढते. अशा कंडीशन मधे पण जर नितीन ह्यांनी मोकळी केलेली सीट भाजप retain करू शकली नसेल तर अवघड आहे. फॅमिली सीट, लेगसी सीट, पोटनिवडणुकीत भावनिक आंदोलनावर पहिला विजय, त्यानंतर सतत ४ टर्म तो टेम्पो मेन्टेन ठेवणे हा नितीन नबीन ह्यांची कार्यक्षमतेचा द्योतक मुद्दा आहे. पण ती सीट त्यांनी सोडल्या सोडल्या जात असेल आणि जनसुराज्य सारख्या हल्लीच्या विधानसभा निवडणुकीत deposit जप्त झालेल्या पार्टीच्या संस्थापकाने हरवले असेल तर भाजपने क्लिअर रायटिंग ऑन द वॉल वाचणे गरजेचे आहे असे वाटते. 🚨🚨🚨🚨
अभिनंदन व सहानुभूती
मला वाटतं, प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत; त्यांचे हार्दिक अभिनंदन.
राज्यात सत्ताधारी असलेला पक्ष बहुतांश वेळा विधानसभा पोटनिवडणुकीत हरतो असा इतिहास आहे. तथापि आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर नवव्यांदा हरली म्हणून भाजपशी सहानुभूती.
राज्यात सत्ताधारी असलेला…
In reply to अभिनंदन व सहानुभूती by कांदा लिंबू
राज्यात सत्ताधारी असलेला पक्ष बहुतांश वेळा विधानसभा पोटनिवडणुकीत हरतो असा इतिहास आहे.
ह्याला आपण काय आधार घेतला आहे ? ते जाणून घ्यायला आवडेल. सहसा ह्याच्या उलट असते असा माझा समज, पण तूर्तास विदा हाताशी नाही त्यामुळे तुमच्या विधानाला पूरक काय डेटा तुम्ही देऊ शकाल हे पाहण्याची उत्सुकता.
कळावे
(रणनितीकार) खोंड्या
Calling @CSK
In reply to राज्यात सत्ताधारी असलेला… by वृषभ खोंडे
Calling @CSK
तुम्ही
In reply to राज्यात सत्ताधारी असलेला… by वृषभ खोंडे
सरकारी नोकरीत किंवा स्टेट बँकेत किंवा एखाद राष्ट्रीयीकृत बँकेत आहे का हो नोकरीला ? सरळ पुढच्या विंडोला/ काउंटरला जा म्हणता आहात ! कॉर्पोरेट मध्ये नाही चालत राजे हे ! तुम्ही बोलला तुम्हीच बोला, दावे करताना विदा द्यावा लागतो ह्याचे भान हवेच.
एकटे चंद्रसूर्यकुमार कुठं कुठं पुरणार ?
सेऊटा!
स्पेनच्या सेउटा (हा उच्चार योग्य आहे का?) शहरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदा स्थलांतराच्या घटनेने पुन्हा एकदा सीमा सुरक्षा आणि निर्वासित धोरणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोशल मीडिया व मुख्य माध्यमांतील बातम्यानुसार, एकाच दिवशी पन्नास हजाराहून अधिक मोरो्को नागरिकांनी समुद्रमार्गे किंवा थेट कुंपण ओलांडून सेउटा हद्दीमध्ये थेट घुसखोरी केली. अनेकांनी सीमेवरील तारांचे कुंपण तोडून प्रवेश केला, तर या प्रयत्नांत काही जणांचा मृत्यूही झाला.
या घुसखोरांना परत पाठविण्याचे पोलीस व सैन्याने प्रयत्न केले त्यातही काही घुसखोरांचा मृत्यू झाला.
या घटनेमागे स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला जात आहे. त्या निर्णयानुसार, समुद्रमार्गे आलेल्या व्यक्तींना तात्काळ परत पाठवण्याऐवजी त्यांना कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर मोरोक्कोमधून घुसखोरीचा ओघ वाढल्याचा बातम्या येत आहेत.
ही घटना केवळ स्पेनपुरती मर्यादित नाही. सीमा सुरक्षा, मानवी हक्क आणि राष्ट्रीय हित यांच्यात समतोल कसा साधायचा, हा प्रश्न अनेक देशांसमोर उभा आहे. भारतातही बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदा घुसखोरीच्या संदर्भात अशाच प्रकारच्या कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींबाबत वेळोवेळी चर्चा होत असते.
कोणत्याही देशाने मानवी मूल्यांचे संरक्षण करतानाच आपल्या सीमांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय हित यांचाही तितकाच विचार करणे आवश्यक आहे. या विषयावर भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा तथ्यांवर आधारित, संतुलित आणि दूरदृष्टी ठेवून चर्चा होणे अधिक महत्त्वाचे आहे.
मी याआधीही लिहिलंय. जो…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
मी याआधीही लिहिलंय. जो प्रदेश भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या संलग्न नाही, त्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड असते. पाकिस्तान व बांगलादेश हे जुने उदाहरण.
स्पेनने हा भाग स्वतंत्र करून टाकावा.
सेऊताचा स्पेनच्या जवळंच
In reply to मी याआधीही लिहिलंय. जो… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
सेऊताचा धोंडा मूळ स्पेन देशापासून अवघ्या पंचवीसेक किमीवर समुद्रापार आहे. हे अंतर फारसं नाही. पाकिस्तान ते बांगलादेश हे अंतर अफाट आहे. त्यामुळे सेऊता जरी मोरोक्कोस संलग्न असलं तरी स्पेनला ताब्यात ठेवायला अडचण नाही. शिवाय, आजची घुसखोरी मोरोक्कोच्या अधिकृत सरकारने केलेली नाही. ते ही तिच्या विरोधात आहेत, निदान वरवर तरी दाखवताहेत.
आजूनेक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर स्पेनने सेऊता मोरोक्कोत सामील होऊन दिलं गेलं, तर जिब्राल्टरविषयी असेच प्रश्न उपस्थित होतील. जिब्राल्टर आज जरी स्पेनच्या भूमीशी संलग्न असलं तरी त्याचा ताबा ब्रिटीशांकडे आहे. संलग्नभूमीच्या मुद्द्यावर स्पेनने सेऊता मोरोक्कोत सामील होऊन देणे याचाच अर्थ त्याच मुद्द्याच्या आधारे जिब्राल्टरवर हक्क सांगणे, असा लंडनमध्ये लावला जाईल. ब्रिटन हे कदापिही होऊ देणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
अशा बाबतीत भारतीय किंवा…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
अशा बाबतीत भारतीय किंवा वसाहतवादाची शिकार झालेल्या कोणत्याही देशातल्या माणसांनी संतुलित प्रतिक्रिया देणे हेच असंतुलन ठरेल. एखादा बलाढ्य माणूस आपल्याला वारंवार धोपटून काढत असेल आणि अचानक त्याच्या चड्डीत लाल मुंग्या घुसल्या तर मार खाणाऱ्या माणसाला आनंद होईल तसेच हे आहे.
आप्पांच्या गप्पा (सात्विक संताप व्हर्जन)
In reply to अशा बाबतीत भारतीय किंवा… by अप्पा जोगळेकर
मग हा विषय पेंडिंग ठेवा येत्या शिमग्याला होळी पेटली का स्पेनच्या नावानं घाऊक बोंब मारू हां बॉ बॉ बॉ बॉ करत !
पहिले तर स्पेनची कधीच भारतावर अर्थाअर्थी वसाहत नव्हती. पोर्तुगाल, डच, इंग्रज अन् फ्रेंच हेच त्यातल्या त्यात.
त्यातही तैनाती सेना वगैरे प्रकार करून फ्रेंच आणि इंग्रजच आपापसात भिडले होते इथे. आता हा झाला इतिहास......
पण त्याच फ्रेंचांनी भारताला राफेल विमाने दिलीत अन् त्याच विमानांनी ऑपरेशन सिन्दुर मध्ये पाकिस्तानचे धिरडे भाजले आहे ना ? इतके काव्यगत होऊन राफेल पण त्यांचेच घ्यायचे अन् अल्जीरियन मुसलमान त्यांच्या छातीवर नाचले (तुमच्या भाषेत चड्डीत लाल मुंग्या शिरल्या) म्हणून आपण टाळ्या पिटायच्या ? इतिहास शिकून परत फ्रेंच छातीवर बसू नये म्हणून तयारी करावी पण म्हणून त्यांच्याशी व्यापार अन् इतर संबंध सोडू नयेत
आणि म्हणूनच, संतुलित प्रतिक्रिया देणे फायद्याचे असते ! अतिरेक करून बोंबलायला लागले की जीवाचा ईरान होतो, इस्लाम होतो अन् तावडे लागतात !
(प्रोफेश्वर) खोंडे
ता. क. - २०२४ मध्ये स्पॅनिश राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते, त्याच वेळी वडोदरा ह्या गावात जॉइंट विमान निर्मिती इत्यादी करारमदार तर झालेच पण २०२६ हे भारत - स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुध्दिमत्ता वर्ष म्हणून नामनिर्देशित करण्याचे पण ठरले, काव्यगत न्यायची ऐशी तैशी केली आप्पा तुमच्या
कोणी एकेकाळी स्पेन आणि इतर…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
कोणी एकेकाळी स्पेन आणि इतर युरोपियन देशांनी जगभर वसाहतवाद केला म्हणून आज घडीला तेथील सामान्य ख्रिश्चन स्त्रिया जिहादी अत्याचाराला बळी पडाव्यात याचे समर्थन कोणताही सच्चा हिंदू करणार नाही. सनातन हिंदू धर्माला हे मान्य नाही.
Russia has proposed settling…
Russia has proposed settling bilateral trade and debt payments with Bangladesh using the Indian rupee to bypass Western financial sanctions. The proposal is under review by Bangladeshi officials and aims to solve stalled project payments, though nothing has been finalized
इराण युद्धाच्या बाबतीत धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत अशी स्थिती असताना रशिया बांगलादेश यांच्यातला व्यापार रुपयामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे अमेरिका चवताळून उठेल अशी शक्यता आहे.
बांगलादेश सारख्या आर्थिक…
In reply to Russia has proposed settling… by अप्पा जोगळेकर
बांगलादेश सारख्या आर्थिक सुपरपावरने विश्वघाबरू चे चलन वापरायला सुरु केल्याने कदाचित जगांत लुंगी च्या किमती गगनाला भिडणार आहेत आणि ट्रम्प तात्या चवताळून उठणार आहे. गोबींची हि कदाचित लुंगी डिप्लोमसी असावी.
ट्रम्पतात्यांच्या नावाने नाचणार्या संघ परिवाराला कदाचित आता मॉस्को मध्ये पाऊस पडल्यावर इथे पुण्याचं छत्री उघडण्याची गरज भासू लागतेय असे वाटते.
मॅडम
In reply to बांगलादेश सारख्या आर्थिक… by साहना
आप्पांनी आपल्या प्रश्नावर सध्या नो कॉमेंट्स म्हणले आहे. तूर्तास राजकीय धकाधकीतून आलेल्या थकव्यामुळे ते आपल्या फार्महाऊस वर विश्रांतीला जाणार आहेत. तुम्ही उपस्थित केलेल्या टीकेवर लवकरच "१५ ते २५ व्यक्तिमत्व पक्षाची" राष्ट्रीय कार्यकारिणी तसे मार्गदर्शक मंडळ पत्रक जारी करणार आहे तरी आपण थोडी सबुरी ठेवावी अशी विनंती आपल्याला आप्पांच्या वतीने करण्यात येत आहे.
वृषभ खोंडे (स्वीय सहाय्यक)
माननीय आप्पासाहेब जोगळेकर,
मंत्री, महिला व बालकल्याण विभाग
मिसळपाव सरकार.
चप्पल प्रमुखांचे पद सर्वांत…
In reply to मॅडम by वृषभ खोंडे
चप्पल प्रमुखांचे पद सर्वांत महत्वाचे आहे.
समाजकंटकांवरील FIR
सरकारने आता सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, NEET आंदोलनाशी संबंधित आणि गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २,७३८ व्यक्तींवरील कोणतेही खटले मागे घेतले जाणार नाहीत; मात्र, अशी पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले जाऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी, CJP चे नेते असा दावा करत होते की आंदोलनादरम्यान हिंसाचार करणारे लोक हे RSS चे सदस्य होते. त्यामुळे, आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असल्याने CJP च्या नेत्यांना आनंदच व्हायला हवा. RSS चा खरा चेहरा उघड करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
सरकारने
In reply to समाजकंटकांवरील FIR by कांदा लिंबू
हे कोर्टाला नाही तुम्हाला सांगितले आहे 😂
आता हळूच केस पुकारली जाणार अन् सगळ्या लोकांना (हिस्ट्री शीटर सुद्धा) नीट क्लास सी समरी करून सोडले जाणार !
लक्षात घ्या, हिस्ट्री शीटर असले तरी "बाहेर" होते सगळे, पक्षी हल्लीचा गुन्हा नव्हता काही किंवा हजर दाखल गुन्ह्यात बेल वर होते.
हिस्ट्री शीट काय असते, कशी मेन्टेन होते, कुठे मेन्टेन होते ह्यासंबंधी अभ्यास वाढवण्याची गरज आहे.
(न्यायदर्दी) वृषभ खोंडे
खोंडे साहेब तुम्ही तर पार…
In reply to सरकारने by वृषभ खोंडे
खोंडे साहेब तुम्ही तर पार पिसेच काढताहात! तुम्हाला प्रत्युत्तर द्यायची अनेकांची हिंमत होत नाहीये! कुठे होतात इतके दिवस? 😁
ट्रेनिंग घेत होतो
In reply to खोंडे साहेब तुम्ही तर पार… by अमरेंद्र बाहुबली
पिसे काढण्याचं 😂😂🙏🏾🙏🏾
मिसळपाव वर यायचे तर व्यवस्थित अभ्यास करूनच यायचे हे fix होते, त्यासाठी कैक वर्षे वाचनमात्र नामक हिमालयात तपश्चर्या केली. लोकांच्या लकबी, लेखन अभ्यासले, आपण स्वतः "कोण लिहितो ह्यापेक्षा काय लिहितो" बघायचे असे स्वतःला बजावले आणि आयडी बनवला.
विनोद हा जीवनाचा जीव का प्राण असावा म्हणजे जीवन लांब होते. त्याचे पालन करतो, सोसेल तितका सोशल मीडिया हे पाळतो, आनंदी राहतो आनंद देतो.
बोला चांगभले
(दार्शनिक तत्ववेत्ता सॉक्रेटिस) नाना साहेब खोंडे 🙏🏾😇😂
डॉ डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्रात "शिक्षणसम्राट" म्हणून ओळखले जाणारे डॉ डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी आज कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मागच्या काही काळापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती.
पाटील हे मूळचे कोल्हापूरचे. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. सुरुवातीला काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी राजकारणात काळ काम केले नंतर त्यांनी शिक्षणक्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी काही काळ बिहारचे राज्यपालपदही भूषवले होते.
१९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
डॉ डी वाय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.
श्रद्धांजली. (डीवाय…
In reply to डॉ डी. वाय. पाटील यांचे निधन by कांदा लिंबू
श्रद्धांजली.
(डीवाय इंजिनियरीग पेपर आदल्या रात्री हमखास मिळण्याची सोय असल्याचे ठिकाण होते. मात्र या पेपरफुटीबद्दल आंदोलन करुन प्रसिद्धी मिळवावी असे कधी वाटले नाही. ज्याला फोडलेला पेपर मिळवून सोडवायचा असेल तो सोडवेल.. आपण मात्र अभ्यास करुन पास होऊ असा आशावाद बाळगून रात्र जागायचो. असो.)
स्टॅलिन, जोसेफ व त्रिशा!
तामिळनाडूत डीएमके नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद उभा राहिला आहे.
कावेरी पाणीप्रश्नावरून झालेल्या एका शेतकरी आंदोलनात तंजावूर इथं काल एका सभेत स्टॅलिन यांचे भाषण सुरू असताना गर्दीतून त्रिशा, त्रिशा असा घोष सुरू झाला. त्यावर क्षणभर थांबून स्टॅलिन यांनी एक द्विअर्थी वक्तव्य केलं. नंतर मात्र त्यांनी स्पष्टीकरण देत आपण कावेरी नदीबद्दलच बोलत असल्याचं सांगितलं.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ हे (पूर्वीचे) सिनेअभिनेते आहेत. स्टॅलिन यांचे हे वक्तव्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यातील तथाकथित वैयक्तिक संबंधांबद्धल असल्याचा आरोप होतो आहे. भाजप आणि टीव्हीके या दोन्ही पक्षांनी हे वक्तव्य अश्लील असल्याची कडाडून टीका केली आहे. डीएमकेनं मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
आज स्टॅलिन यांना या प्रकरणातून अटक झाली आहे.
महाराष्ट्राचे एक दिवंगत उपमुख्यमंत्री यांचीही काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती.
आपल्या सहअभिनेत्री…
In reply to स्टॅलिन, जोसेफ व त्रिशा! by कांदा लिंबू
आपल्या सहअभिनेत्री त्रिशाबद्धल अप्रत्यक्षपणे अश्लील वक्तव्य केले म्हणून तामिळनाडू मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी विरोधी पक्ष नेते स्टालिन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करविली.
आपले एक नेते मात्र त्यांच्या लग्नाच्या बायकोबद्धल अश्लील वक्तव्य केले तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष करून हसतमुखाने राजकारण करत राहतात!
जो नेता स्वतःच्या लग्नाच्या पत्नीच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही तो त्यांच्या मतदारांचे काय रक्षण करू शकणार?
पिसाळलेले नेतृत्व आणि अमेरिकेची हतवीर्य अर्थव्यवस्था
U.S. economic growth slowed to an annualized rate of 1.5% in the second quarter of 2026, dropping from 2.1% in the first quarter. According to the U.S. Bureau of Economic Analysis, this deceleration was driven by surging imports and a drop in government spending
इराणबरोबर सुरु असलेल्या युद्धात वारंवार मुखभंग होऊनसुद्धा निव्वळ निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने अमेरिकन नेतृत्वाने युद्धखोरी सुरूच ठेवली असून त्याचा परिणाम गेल्या तिमाहीतील घसरलेल्या जीडीपी ग्रोथच्या रूपात दिसून आला. आपण निवडलेले नेतृत्व माथेफिरू ठरल्यामुळे पश्चात्तापाची जनभावना अमेरिकेत आकारास येत आहे.
या धाग्याचे शीर्षक जुलै -…
या धाग्याचे शीर्षक जुलै - ऑगस्ट २०२६ असे बदलता येईल का?
हम्म
अय संपादक,
इधर मे फडका मारो जलद. क्या हवे नको ते देखो साहेब कु. पाणी के गल्लास में बोट बुडवके मत लाव. मिसळपाव तिखट वाटेंगा तो दही वाटी नाहीतर एक गुलाबजामन पण देव साहेब को.
अहो गुरुजी
शुक शुक अहो गुरुजी, ऐका ना ऑगस्ट ताज्या घडामोडी धागा ऑलरेडी काढला आहे ! लाभ घ्यावा ही नम्र विनंती !.
FCRA बिल आणि तंगडी वर करण्याची अमेरिकन सवय
https://timesofindia.indiatimes.com/india/us-congressman-warns-fcra-bil…
भारताच्या संसदेत FCRA बिल कधीही टेबल होईल अशी परिस्थिती असताना रिली moore यांनी ह्या निमित्ताने भारतावर दुगाण्य झाडल्या आहेत. आधी जंतर मंतर येथील आंदोलनाला दाणागोटा पुरवून ह्या अधिवेशनात अडथळा येईल असा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकन सरकारची मळमळ वेगवेगळ्या माध्यमांतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया भारतात व्यक्त होत आहे.
या विधेयकास मोरेने अधिकृत…
In reply to FCRA बिल आणि तंगडी वर करण्याची अमेरिकन सवय by अप्पा जोगळेकर
या विधेयकास मोरेने अधिकृत विरोध करून भारतविरोधी पक्ष व संघटना यांना स्पष्ट आज्ञा केली आहे की त्यांनी या विधेयकास पूर्णपणे विरोध करून ते अस्तित्वात येऊ देऊ नका. अमेरिकेतून निधी घेणारे व देशविरोधी काम करणारे आपला विरोध अजून तीव्र करतील.
चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८
या धाग्यावर दीडशेच्या घरात प्रतिसाद झाल्याने चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८ हा नवीन धागा काढला आहे. नवीन बातम्या / मुद्दे / चर्चा तिथे लिहूया.