Skip to main content

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

मिपावर मी लेखन केले. त्याआधीही लेखन करतच होतो. पण मिपा, माबो, ऐसी सारखे फोरम असल्याने तेथे तेथे लिहीता  
आले. माझ्या लेखनाबाबत एक बाल सदस्य वृषभ खोंडे ज्या पद्धतीने वागला अन संपादक कोण आहे हे मिपावर कुणालाही  
माहीत नसतांना माझ्या धाग्यांची तक्रार संपादकांकडे करून ते धागे डीलीट. मला माझे म्हणणे काय किंवा मला तसे  
काहीच सांगण्यात आले नाही. इतर ठिकाणीही माझ्या प्रतिसादांवर त्याचे प्रतिसाद खोडसाळ होते. मला आता येथे  
थांबण्याची आवश्यकता वाटत नाही. 


धागे डिलीट केले त्याचे मला काही वाटत नाही. किंबहूना धागे डिलीट झाले हे मला उशीरा समजले. मला जर कुणी  
सांगितले असते की धागे डिलीट, तर मी केले असते. त्यात काही वाटायचे कारण नाही. अन मुख्य म्हणजे मी प्रतिसाद  
येण्यासाठी कधीही लेखन केले नाही. 


दुसरा आरोप त्या बाल सदस्याने केला की माझ्या लेखनाने इतरांचे "दर्जेदार" लेखन खाली जाते. याचे येथले लेखन किती,  
वाचन किती अन हा बोलतो काय? 


या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख मी इतर दुसर्‍या धाग्यात केला आहे. तो आपण (संपादकांनी) वाचावा.

https://www.misalpav.com/discuss/53809

 


दुसरे असे की मिपावर संपादक जाहीर नसतांना हा बाल सदस्य संपादकांशी कसा संपर्कात होता? 


मिपावर कोणतीही नियमावली जाहीर नाही. किती धागे, किती मोठे धागे, कोणी अन किती काढावे असा काही नियम नाही.  
कसलेही नियम नाहीत. संपर्क कुणाशी करावा याबाबत माहीती नाही. 


मी देखील फोरम्स डेव्हलप अन मेंटेन केले आहेत. केवळ द्रूपलच नाही तर इतर पद्धतीतही मी कामे केली आहेत. मला  
फोरम्स मध्ये काय काय सुविधा असतात, अपुरेपणा काय, त्या कशा, कुठे, कधी वापराव्या याचे व्यावसायीक ज्ञान आहे.  
तेव्हा मी येथल्या नियम अन सुविधांबद्दल चांगले जाणून आहे. 


असो. 


ज्या मिपावर प्रेम केले, माझे एक पुस्तक मिपाला डेडीकेट केले, येथे वावरलो तेथे आता राहणे नको. 


मला माझे खाते डिलीट करायचे आहे. ते कसे करायचे ते कृपया सांगावे ही माननिय संपादकांना विनंती आहे. 
 

शक्य झालेच तर माझे येथील सगळे लेखन डिलीट करावे/ अप्रकाशीत करावे. जसे काही मी या जगातून मेलोच आहे अशी  
कल्पना करून माझी येथली सगळी ओळख पुसून टाकावी ही विनंती. माझ्यासारख्या दर्जेदार नसलेल्याच्या जाण्याने मिपाला  
काय फरक पडणार आहे?  

 

या जगातून जायचे तर सगळ्यांनाच आहे. मलाही थोडी रूखरूख लागेल, पण जावे तर लागेलच. येथे असतांना जो आनंद  
मिळाला, दुनियादारी शिकायला मिळाली ती आठवणीत राहील.

 

मिपा चालक, मालक, संपादक अन सदस्यांचे आभार.  

 

कळावे,
एकेकाळचा मिपाकर,


पाषाणभेद
16/07/2026


वाचने 137
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

त्यामुळे मी प्रतिसादाचा हक्क तर बजावणारच. माझी मिपावर ती कमेंट खरडफळ्यावर होती, आणि ती स्पष्ट होती. कोबीची भाजी अन् तिचा रंग हे उगाच वेळकाढू फालतू लेखन आहे(च) इतकी मिर्ची लागण्याचे कारण नाही काही ! एरवी तुमच्या मानसिकतेवर बोललो नसतो. 

 

मिपावर आयडी वय अन् केलेले लेखन काही क्वालिफाइंग गोल्ड स्टँडर्ड नाही लेखन वाचून त्यावर कॉमेंट करायला. सगळेच लिहायला लागले तर वाचक कोण ? तुम्ही मिपा सोडण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, मिपावर १७ वर्षे ८ महिने काढून तुम्हाला मिपा वाटेल तसे वागण्याचा अन् खवट बोलण्याचा मंच वाटू लागला आहे असे दिसते. त्या हिशोबाने महिनाभरात मी मिपा हा उपक्रम का चालतो हे समजून त्याचा आदर करायला जास्त शिकलो म्हणावे लागेल. 

 

जरा डिजिटल detox घ्या स्वास्थ्यलाभ घ्या कुठेतरी छान फिरून या. बाकी काय बोलणार ? 

 

टाटा ! 

 

टीप - १७ वर्षे ८ महिन्यात संपादकांशी संपर्क करायची सोय जर आपण explore केली नसेल तर आपला मिपावर किती सकारात्मक सहभाग होता ह्यावर प्रश्नचिन्ह लागते, किती उपक्रमात तुम्ही झडझडून लिहिते झालात, किती विशेषांकात लिहिलेत ? ते पण कळते. असो. तुम्हाला लवकर आराम पडावा ही परमेश्वराकडे प्रार्थना. मला दहा शिव्या घालून तुम्हाला मानसिक शांती लाभत असेल तर खुशाल घाला एकेरी संबोधनावर थांबू नका. 

 

 


इतके टोकाला कशाला जाताय पाभे काका. पब्लिक फोरम आहे. तुम्ही दुखावले गेलेले आहात. याचा अर्थ निर्वाणीची भाषा आणि कायमचे सोडून जाणे असे करू नका. माझं ऐका. थांबा. फारच गृहितके धरून उगीच सोडून जाऊ नका. बाकी काय बोलावे.


कोणत्याही मिपाकराने असे जाण्याबद्दल बोलणे नक्कीच वाईट वाटते.

झालं गेलं ते सोडा!एक उहापोह करा... स्वतःशी... परत आवडत्या विषयावर लिहा.


पाभे,

 

तुम्ही नशीबवान आहात कारण की तुमचे केवळ धागेच उडालेत. माझं तर आख्खं सदस्यत्वच उडालं होतं. मी कमालीचा लोचट असल्याने कसाबसा का होईना परत आलो ( रीतसर माफी मागून ).

 

धागा उडण्याबद्दल म्हणाल तर, 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' असं शीर्षक असलेला धागा मी काढला होता. पण काही मिपाबाह्य अपरिहार्य कारणांमुळे तो उडाला, किंवा उडवावा लागला. त्याचं मला कणभरही वैषम्य नाही. केवळ मिपाच नव्हे तर अवघं आंतरजाल एका घणाघाती लेखास मुकलं. टिळकांच्या नंतर अशी गर्जना करणारा मीच असूनही केवळ मिपाबाह्य शक्तींच्या घाबरटपणापायी हे जगास विदित झाले नाही. पण मला काय पडलीये त्याची पर्वा !

 

तर सांगायचा मुद्दा काये की कोण कसा आहे त्याच्याची आपल्याला काय करायचंय. आपण आपल्याच मस्तीत चालावं. 

 

बाकी, आपण घ्याल त्या निर्णयास माझ्याकडनं शुभेच्छा.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

नाही

तुम्ही तिसरे

एक मुलगी होती तिचा लेख २००६ मधे म टा मधे  आला होता