लंडनमधील प्रथितयश स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ. महेश पटवर्धन यांना तेथील न्यायालयाने चार लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यात दोषी ठरवून आठ वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. हे गुन्हे त्यांनी 2008 ते 2012 या कालखंडात केल्याचे म्हटले जाते. वैद्यकीय तपासणीच्या वेळी या गृहस्थांनी आपल्याशी गैरप्रकार केले अशी तक्रार एकूण सहा स्त्रियांनी केली होती. पैकी चार गुन्हे सिद्ध झाल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
सदर डॉक्टरांचे स्वतःचे आंतरजालीय संकेतस्थळ आहे. त्यावरील माहितीनुसार हे साधेसुधे असामी नाहीत. मुंबईत जन्म, शिक्षण व उच्च शिक्षण झालेले हे डॉक्टर लंडनमधील अभिजनवर्तुळात वावरतात.