Skip to main content

नितीमत्ता

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार

लेखक मिल्टन यांनी मंगळवार, 24/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्‍याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो.