बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.
सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.
सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.
जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.
सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
पूर्वग्रहविरहित परिचय आवडला.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
सिनेमा उत्तरार्धात विस्कळीत आहे असे वाचले,
सोत्री, असं काही जाणवलं का ?
छान लिहिलं आहे, ज्यामुळे सिनेमा पाहायला प्रवृत्त होऊ शकेल. बाकी बॉयकॉट करणाऱ्यांनी करावे, ज्यांना पाहायचा आहे ते त्यातली सशक्त कथानक आणि अभिनय, दिग्दर्शन इत्यादी बद्दल ऐकून पहातीलच.
नाही, कथानक प्रवाही आहे,
In reply to परिचय आवडला. by चौथा कोनाडा
नाही, कथानक प्रवाही आहे, त्यामुळे विस्कळीतपणा कुठे असा जाणवत नाही.
आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं.
हा सिनेमा चुकवण्यात काहीच पॅाइंट नाही, नक्की बघाच!!
-(सिनेप्रेमी) सोकाजी
पूर्वग्रह विरहित परिचय
हा पूर्वग्रह विरहित परिचय आवडला. हल्लीच्या सोशल मिडियाच्या काळात काय खरे आणि काय खोटे ते समजत नाही. अशात असा परिचय आवडला.
परिचय आवडला
लोक काय म्हणतील ? किंवा बँन करून देशभक्ती दाखवायच्या जमान्यात असा रीह्यू टाकणे अभिनंदनीय आहे .
सोकाजी, उत्तम लिहीले आहेस या
सोकाजी, उत्तम लिहीले आहेस या सिनेमाबद्दल. अनेकदा सिनेमा न बघताच कॉन्ट्रोव्हर्सी बनवली जाते अशी शन्का आहे.
रिव्य आवडला. प्रतिसाद केवळ
रिव्य आवडला. प्रतिसाद केवळ सोत्रिंच्या लेखासाठी.
बाकी चित्रपट जेव्हा फुकटात उपल्ब्ध होईल तेव्हाच पाहिल्या जाईल.
छान.
सहजसोपा रिव्ह्यू.
छान
अभिनिवेश विरहित रिव्ह्यू आवडला, लालसिंग चढ्ढा नक्की पाहण्यात येईलच.
धन्यवाद... आजकाल न बघता
धन्यवाद... आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये शांत, पूर्वग्रह विरहित मत नक्कीच आनंददायी आहे..
सिनेमा आवडू वा ना आवडू हे व्यक्ती सापेक्ष असु शकते, परंतु प्रमाणिक मत महत्वाचे..
नक्की पाहण्याचा प्रयत्न करतो
आजकाल न बघता
In reply to धन्यवाद... आजकाल न बघता by गणेशा
आजकाल न बघता बाजारबुनग्यांच्या आरोळ्या मध्ये
हेच तत्व काश्मीर फाईल बघताना लागू होतं ....
तेवहा मात्र काही लोकांची हि टकळी चालू होती कि " काश्मीर फाईल म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा प्रचार
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी ... बाजीराव मस्तानी .. यावर पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या सर्वधर्मभावी लोकांनी न बघता बहिष्कार घातला होता ! ते चालत ?
सहमत
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
लाल सिंग चढ्ढा हा सेन्सॉर बोर्डाने पास केला वगैरे वाचनात येतं आहे पुरोगामी जनतेकडून, त्यांना माझे एकच म्हणणं आहे की सेन्सॉरने तर काश्मीर फाईल्स पण certify केला होता की ! तेव्हा सेन्सॉर बोर्ड मेंबर्स फारच उजवे सरकार प्रेमी अन् लाल सिंग चढ्ढा वेळी लिबरल होते असे होऊ शकत नाही.
प्रॉब्लेम हा आहे की भारतात धर्म जात प्रांत याच्या पलीकडे जाऊन लोक सोयीने लिबरल अन् सोयीने उजवे असतात आपापल्या सोयीनुसार.
हो ना आणि आँधी वर बंदी आणली
In reply to सहमत by जेम्स वांड
हो ना आणि आँधी वर बंदी आणली होती तेव्हा किंवा किस्सा कुर्सी का यावरील बंदी आणली तेव्हा कुठे होते " लिबरल्स "
"सध्या हुकूमशाही चालू आहे भारतात " असे सतत गुणगुणणे या "टुल किट " मधील हे अजून एक टुल
असो आमीर खान ने मेहनत घेऊन चित्रपट बनवला असणारं यात शंका नाही आणि काम हि चांगले केले असणार
मुद्दा फक्त मूळ हेतूचा असतो .... तरी सुद्धा आधी बघून मग पुढेच बोलेन असे म्हणतो
पिके सुद्धा "मूळ हेतू अंधश्रदेला खत पाणी घालू नका" या संदेशामुळे आवडला पण तेव्हाच मनात हा हि विचार आला "अरे पण हा संदेश इस्लाम आणि ख्रस्ती धर्मावर पण तेवढ्याच जोराने त्या चित्रपटात दाखवलं असता तर "खर्या अर्थाने तो चित्रपट सर्वधर्म समभावी झाला असता "
किस्सा कुर्सी का
In reply to हो ना आणि आँधी वर बंदी आणली by चौकस२१२
किस्सा कुर्सी का
मला वाटते ७८ साली हा सीनेमा प्रदर्शित झाला होता. जोधपूर मधे असताना बघीतला.एकच शो झाला व बंद झाला. शबाना आझमी चे नाव जनता व ती गुंगी असते. शहरात प्लेग झाला म्हणून सरकार उंदीर मारण्याची योजना काढते. प्रती उंदीर काही मोबदला मीळायचा. जनता दहा उदिर मारून सरकारी कार्यालयात मोबदला मागायला येते. उंदीर तीनेच मारले हे तीला सिद्ध करावयास सांगतात.
मागून एक जण येतो पन्नास टक्के कमीशन देऊन उंदीर न मारता पैसे क्षणात घेऊन जातो.
एवढाच प्रसंग आठवतो.
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
बहिष्कार ? ह्या सिनेमावर सर्वधर्मभाव वाल्यांनी बहिष्कार घातलेला ?
हायला मला सांगितले पण नाही. मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
चुकून बघीतला ना ? मग तुम्हाला एक डाव माफी देऊन टाकू :)
जरा मिपावरचे जुने धागे वाचा
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
जरा मिपावरचे जुने धागे वाचा ..
ओळीने असे चित्रपट फक्त भाजप च्या काळात कसे निर्माण झाले असा सुर होता
काश्मीर फाईल ५०० करोड घेऊन गेला तेव्हा कितीजणा च्या नाकाला मिरच्या झोंबलया
लॉल
In reply to जरा मिपावरचे जुने धागे वाचा by चौकस२१२
बॉयकोट झालेला हे पटवण्यासाठी "मिपाचे धागे वाचा" असा सल्ला असेल तर त्या बॉयकॉटला कसला अर्थ?
इथे राहुल देशपांडेने सिनेमा बघितला तर त्याच्या वॉल वर जाऊन ओरडणे चालू आहे.
चौकस साहेब, हो सर्वच
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
चौकस साहेब, हो सर्वच कलाकृतीना माझे म्हणणे लागू आहे, त्यात "काही लोकांनी तेंव्हा " असे फलाना सांगण्याची काय गरज? मी स्वतः या काही लोकात येत नाही..
आणि मणिकर्णिका, तान्हाजी, बाजीराव मस्तानी हे चित्रपट मी सिनेमा गृहात जाऊन पाहिलेत.. कोण काय बहिष्कार घालत होते यावर मी विश्वास का ठेवावा?
आणि माझे बोलणे general एकच आहे, सर्वांना सेम, उगाच याला एक आणि दुसऱ्या वेळेस दुसरे असे नाही..
अवघड आहे..
म्हणजे मत मांडायचे का नाही...?
काश्मिर फाईल्स बद्दल न बघता मी बोललो होतो का? काही पण कुठे जोडता आहात..
बाकी त्यात मणिकर्णिका आणि तान्हाजी हे दोन्ही सिनेमे मला अजिबात आवडले नव्हते, बाजीराव मस्तानी भारी होता.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कारण मी ते पाहिलेले आहेत.
लाल सिंग चड्डा मात्र मी अजून पाहिला नाही.. वेळ नाहीये सध्या..
मग माझे म्हणणे हि जनरल आहे
In reply to चौकस साहेब, हो सर्वच by गणेशा
मग माझे म्हणणे हि जनरल आहे
तुम्हाला का झोंबतंय
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच शुल्लक कारणावरून त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची घाणेरडी प्रथा चालू झाली आहे. चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधन आहे आणि त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला हवं असं वाटतं.
तुमचा पूर्वग्रह विरहित रिव्ह्यू आवडला..
चित्रपट संथ वाटला
मी हि कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा चित्रपट पाहिला. आमिर खान आणि मोना सिंगचा अभिनय आवडला. आमिर खान ने पंजाबी लहेजा अतिशय सहजतेने आत्मसात केला आहे.
पण चित्रपट अतिशय संथ वाटला. काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते.
युद्धात त्याने केलेली घोडचूक कशी काय खपून जाते हे अजून एक कोडं. कदाचित यामुळेच कोणीतरी या चित्रपटावर केस दाखल केली असे ऐकले. भारतीय सैन्याबाबत अशा गोष्टी दाखवताना आमिर खान आणि टीम ने अजून थोडा अभ्यास करायला हवा होता असे वाटून गेले. असो.
काही गोष्टी पटल्या नाहीत -
काही गोष्टी पटल्या नाहीत - जसं कि एवढ्या low IQ वाल्या निरागस, इमोशनल (थोडयाश्या वेडसर) अशा माणसाला भारतीय सैन्यांत कसे काय घेतले जाते आणि कारगिल सारख्या युद्धात एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली जाते.
या बाबत हि प्रतिक्रिय हि बघवि
https://www.youtube.com/watch?v=aVscKmEtDUQ
@ चौकस२१२
In reply to काही गोष्टी पटल्या नाहीत - by चौकस२१२
@ चौकस२१२
लिंक बद्धल धन्यवाद. चड्डी सिंग च्या वादात अतुल कुलकर्णी चे नाव काही दिवसां पासुन येत आहे. व्हिडियोत [ तुम्ही दिलेल्या ] अतुलचे काही जुने ट्विट्स आहेत. काही काळा पूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंट मध्ये त्यांनी एक छोटा बदल केलेला काही लोकांच्या लक्षात आला [ तो मी खाली देत आहे. ] या सर्व घटनाक्रमांमुळे अतुल कुलकर्णी ची "दुसरी बाजु " माझ्या आणि अनेक इतर जणांच्या लक्षात आली हे मात्र नक्की !
@ सोत्रि
तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली.
मी चित्रपट पाहिला नाही आणि पाहणार नाही. [ अगदी फुकट उपलब्ध झाला तरी ] परंतु जालावरचे अनेक रिव्हूज वाचुन गेल्या २-४ दिवसात या चित्रपटा बद्धल बरीच माहिती समोर आली आहे आणि अजुनही येत आहे. तुमची वरती एक प्रतिक्रिया वाचली ती अशी :-
आज फॅारेस्ट गंप पाहिला आणि त्याचं भारतियकरण, लाल सिंग चढ्ढात कसलं चपखलं केलंय हे पदोपदी जाणवत गेलं.
कारगिल युद्धातील अतिरेक्याला वाचवुन त्याच्याशी व्यवसाय करणार्या व्यक्तिरेखेला तुम्ही चपखलं भारतियकरण समजत आहात हे जाणवतं. ज्या पकिस्तानने त्यांच्या अतिरेकी आणि सौनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला ! कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्यांना अमानविय यातना देऊन ठार केले. अश्याच एका पाकिस्तानी अतिरेकी व्यक्तीरेखेला या चित्रपटात नायक ? वाचवतो ? हे कुठल्या विचारसरणीचे भारतियकरण करणे आहे ? जरा सांगा ना प्लीज ! बर मूळ चित्रपट मी पाहिला आहे, त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
जाता जाता :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच
In reply to @ चौकस२१२ by मदनबाण
त्यात फॉरेस्ट स्वतःच्याच सैन्यातील लोकांना वाचवतो, मग हे चपखल पद्धतीने दाखवायला पाहिजे होते ना ? हा सीन अश्या पद्धतीने चित्रित करुन त्यांनी कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सौनिकांचा अपमान केला आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
हे असे असेल तर आमिर कितीही चांगला कलाकार असला तरी त्याचा आणि लेखकाचा धिक्कार
हिंदी चित्रपटात सृष्टीत ओढून ताणून "सरहद के ऊस पार से प्यार जताना" असल्या आत्मघातकी विचारसरणीचा हा अजून एक भाग..
हिंमत असेल तर अमीर ने मराठीतील "हलाला " चा रिमेक करावा आणि एर्दोगन मॅडम ना पहिल्या प्रीमियर ला बोलवावे
सहमत.
In reply to @ चौकस२१२ by मदनबाण
सहमत.
ढिसाळ कथानक आहे. सुरुवातीला थोडा बरा वाटला पण नंतर पाकिस्तानी सैनिकाला वाचवून त्याचा भारतीय लष्कराला पत्ता पण नाही. वरून त्याला बिजनेस पार्टनर करणे. अर्धवट असून करोडोंचा धंदा उभा करणे. पाहिजे तेव्हा करीना किंवा अमीर एकमेकांसमोर हजर होणे मग ते मुंबई, दिल्ली, पंजाब काहीही असो. यामुळे नंतर इंटरेस्ट संपला.
मायबोलीवरून
In reply to सहमत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मायबोलीवर अमितव ह्यांनी दिलेल्या प्रतिसादातून-
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे
In reply to मायबोलीवरून by कॉमी
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे सांगतो. तो भारतीय आर्मी मधला मेजर न दाखवता शत्रूचा मेजर दाखवणे हे फारच स्मार्ट आणि फॉ.ग. पेक्षा वेगळं आणि वरचढ आहे. त्या कॅरेक्टरचा ग्राफ काहीच प्रसंगातून इतका सुरेख आला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तो मेजर पाकिस्तानात जाऊन त्यांची मदरसा शिक्षण पद्धती सुधारुन त्यांना खरं जग कसं आहे ते दाखवतो. कूप मंडूकांना बाहेर काढतो असं ही आहे.
हे तत्वज्ञान / उपरती इडियन आर्मीने पाय छाटल्या नंतर आली का ? एव्हढ होत तर कारगिल युद्धात काय लपाछुपी किंवा पकडापकडी खेळाला आला होता काय ?
इंडियन आर्मी ही जगात शौर्य, पराक्रम,साहस यासाठी जगविख्यात आहेत, ते अतिरेक्यांना ७२ हुरांकडे डायरेक्टच पाठवतात. बरं मूळ कथानकात असे काही नसताना हे मुद्दामुन केले गेले आहे यात तीळमात्र शंका नाही.
जाता जाता:- इंडियन आर्मीवरील माझे आवडते कोट्स देऊन जातो.
१] “May God have mercy on our enemies, because we won't.”
२] “It is God's duty to forgive the enemies, but it's our duty to convene a meeting between the two."
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द
In reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद.
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द
In reply to तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द by कॉमी
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द टॉप प्रतिसाद दिल्याने दुर्लक्षणीय प्रतिसाद.
तुमची कल्पनाशक्ती दाणगी दिसतेय ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक
In reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या. त्यात पाकिस्तानी सैनिक घेऊन काहीही चुकीचा संदेश दिलेला नाहीये, उलट चांगलाच संदेश आहे.
मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते. नवी गोष्ट लिहायलाच हवी.
मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे- गंप सरकारविरोधी अँटी वॉर प्रोटेस्ट मध्ये गेला असतो, आणि तिथे चक्क एक सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जातो. मूळ सिनेमात काही फक्त आर्मीचा उदोउदो नाहीये.
आणि मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते.
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक
In reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by कॉमी
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक गोष्ट सांगतो आहे हे लक्षात घ्या.
काय सांगता ? काल्पनिक गोष्टीत देखील काहीतरी लॉजिक असले पाहिजे ना ? अतिरेक्या बरोबर बिझनेस करणे हा देशद्रोह आहे ही साधी गोष्ट जर कोणाला माहित नसेल / समजत नसेल किंवा तसा मुद्दामुन आव आणत असेल, तोच व्यक्ती असा काल्पनिक वायझेड पणा करु शकतो आणि त्याचे समर्थन करु शकतो.
मूळ सिनेमाचे आहे तसे कॉपी पेस्ट करणे मूर्खपणाचे झाले असते.
अतिरेक्या बरोबर मैत्री करुन, व्यवसाय करुन करोडो छापणे हे तुमच्या मते बद्धिमानपणाचे लक्षण असावे ! :)))
मूळ फॉरेस्ट गंप मध्ये सुद्धा त्याचे स्पिरिट आहे-
मी देखील हेच म्हणतो... सैन्याचा अधिकारी येऊन त्याच्या भाषणाच्या वेळेस वायरी उचकटून जात असला तरी ज्या देशाशी युद्ध चालले आहे त्यांच्याच सैनिका बरोबर बिझनेस करण्याचा वायझेडपणा त्यांनी अजिबात केलेला नाही.
मुळात चढ्ढा मधून भारतीय सैन्याचा अपमान झाला असे म्हणणे म्हणजे फारच मोठी उडी आहे, असे सिनेमातल्या प्रसंगाच्या वर्णनावरून वाटते.
मुळात काल्पनिक कथानकाच्या नावावर अतिरेक्याला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न म्हणजे सैन्याचा अपमान आणि राष्ट्रद्रोह देखील आहे. तुम्ही कितीही कल्पना शक्ती लावली आणि ती हवी तशी ताणली तरी अतिरेक्याचे समर्थन करु शकत नाही. उध्या अश्या कल्पनाशक्तीचा वापर करुन कसाबचे आणि अफजल गुरु चे देखील ग्लोरिफिकेशन केले जाईल !
जाता जाता :- चकली प्रतिसाद देऊन फुकाचा बद्धीभेद करण्याचा प्रयत्न आता तरी सोडा, कारण मी "कॉमी" नाही. हा माझा तुम्हाला या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
चकली प्रतिसाद देऊन फुकाचा
In reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by मदनबाण
इतके कष्ट होत असताना तुम्ही ह्या धाग्यावर पो टाकण्याची गरज नव्हती. पुढच्या वेळेस पो टाकणार नसाल तर थेट थांबा, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. :)
चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
धन्यवाद
समतोल, पूर्वग्रहविरहित
समतोल, पूर्वग्रहविरहित परीक्षण फार आवडले. आमिरचा फॅन असल्याने चित्रपट पाहणार आहेच. पण पीके पासून आमिरच्या अभिनयात एक तोच तोच पणा जाणवतोय.
खरे आहे
In reply to समतोल, पूर्वग्रहविरहित by प्रचेतस
खरे आहे. आमिर खानच्या अभिनयात आता तोचतोचपणा जाणवू लागला आहे. त्यामुळे आमिर खान आवडत असूनही हा पिक्चर कदाचित पाहणार नाही. ओटीटीवर आल्यावर ठरवू. मात्र परीक्षण नक्कीच आवडले.
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण हिरोईनच्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये अफूची गोळी मिसळायचा. पण हिरो सावध असल्यामुळे हिरोईन नेहमी वाचायची. तसाच हा सिनेमा आहे. सोशल मीडियाने सिनेमाचा हेतू उघड केला. कलाकार उत्तम असेल तर टूल किटचा उद्देश साध्य होतो. जसा माचिस सिनेमात झाला होता. तो सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे मत झाले सरकार, प्रशासन, पोलीस अत्याचारामुळे लोक आतंकवादी बनतात. आतंकवादी कोमल हृदयाचे चप्पा चप्पा गाणारे असतात. ज्या सिनेमात मंद बुध्दीचा सैनिक दाखविला आहे. त्या सिनेमाची प्रशंसा करणारा लेख इथे चालतो. शेवटी विचार स्वतंत्रता महत्वाची. फक्त इतिहासाचे सत्य दाखविणारा माझा लेख मात्र संपादकांनी उडविला होता. किमान आता तरी पुन्हा धाग्यावर संपादकांनी दाखविण्याचे धारिष्ट्य दाखवावे.
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा भारतीय जनतेने लोकशाहीत मान्य अश्या पद्धतीने बॉयकॉट करुन फ्लॉप यशस्वी केल्याने सगळ्या पुरोगाम्यांचे व लिबरल्सचे धाबे दणाणले आहेत. एक तर शांततापुर्ण खळ्ळ खट्याक न करता सुद्धा आपला विरोध दाखवु शकतो हे प्रकर्शाने जाणवले. भारतात गोदी मिडीया चालवणार्या उजवीकडे कलंडलेल्या केंद्र सरकारचा ह्या सिनेमाविरुद्ध कोणत्याही निर्देश नसतानाही असा बॉयकॉट यशस्वी केल्याने जनतेचे अभिनंदन !
लाल सिंग चढ्ढा सिनेमा पुर्ण डब्ब्यात गेल्यावरही तो सिनेमा म्हणजे अप्रतिम कलाकृती होती अस सांगणारे मिडीयातले "ध्रुव राठी" सारखे लोक पैसे घेऊनच आपले मत मांडतात हे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले.
आमिर खान हा "देश प्रेमी" आहे त्यामुळे माझ्या सिनेमाचा बॉयकॉट करु नका अस विनवत राहीला पण त्याच्या सिनेमाचा बॉयकॉट हा तो
हिंदु हेटर आहे म्हणून हिंदु जनतेने केलेला आहे हेच त्याला उमगले नाही. स्वःताला देश प्रेमी आहे अस जनतेला समजवणार्या आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच. काही वर्षांपुर्वी उप राष्ट्रपती असलेल्या हामिद अंसारी ने सुद्धा १५ ऑगस्टला झेंड्याला सलाम न करण्याचा हक्क बजावला होता. त्यावेळेला ही लिबरल्सनां त्यात काही गैर वाटल नाही. पण फक्त मुसलमानांसाठी जन्मलेल्या पाकिस्तानातले लोक नेते, मौलवी, अध्यक्ष सर्वेच पाकिस्तानच्या सब्ज परचमला ( हिरव्या झेंड्याला) सलाम करतात. त्यावेळेला त्यांचा ईस्लाम धर्म त्यांच्या अश्या वागण्याच्या आड येत नाही. मग भारतातल्याच मुसलमानांना तिरंग्याला सलाम करताना ईस्लाम का आड येतो ?
सलमान रश्दी ह्यांच्या वर सॅटॅनिक वर्सेस (१९८८) नावाच पुस्तक लिहील्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर व त्यांच्यावरच्या ईराणच्या खोमेनीने काढलेल्या फतव्या नंतर १० वर्षांनी एका २४ वर्षांच्या युवकाने ( हादि मतार) चाकुने न्युयॉर्क मध्ये हल्ला केला. सॅटॅनिक वर्सेस कधीही न वाचलेल्या ह्या युवकाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या व त्याने अश्या लेखकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला ज्याच्या बद्दल काहीही माहीती सुद्धा नव्हते.
आमिर खानच्या सिनेमांनी ह्यांच्या भावना कश्याकाय दुखतात अस विचारणार्या लोकांना माझा प्रश्न एकच आहे. हिंदुंच्या भावनाना केराची
टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ?
अरुंधती रॉय ताई
In reply to लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा by डँबिस००७
हिंदुंच्या भावनाना केराची
टोपली आणी ३४ वर्षांनंतरही त्यांच्या दुखर्या भावना आपला डुक सोडत नाहीत ?
हाच तर मंत्र आहे स्वतःला पुरोगामी न्हाणवून घेणाऱ्यांचा
आता यावर अरुंधती रॉय ताई / महेश भट इत्यादी काय म्हणतात हे बघणे रोचक ठरेल
का यात हि त्यान्ना फॅसिष्ठ हात दिसेल !
ह्म्म्म
म्हणजे आम्हि शितावरुन भाताची केलेली परिक्षा चुकली म्हणायची.. ट्रेलर वरुन तर चित्रपट फारच गचाळ वाटला. आमिर खानचा म्हणुन धूम-३, ठग्स ऑफ हिन्दुस्तान, मंगल पांडे वगैरे चित्रपट बघितले तेंव्हा उगाच पैसा/वेळ वाया गेल्याचा फील आला होता. लाल सिंगचा ट्रेलर बघुन तर निदान खास टिकीट काढुन सिनेमा बघायला जायचं नाहि हेच ठरवलं होतं.. पण आता सोत्रींनी तारीफ केली आहे म्हटल्यावर परत विचार करतोय...
पी. के आणि आमिर खान
पीके सिनेमातील काही दृष्य ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत आणि त्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी ठरवला गेला !!
.. पीके सिनेमातली दृष्य ही खरेच हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत असं मानूयात. पण तरी त्याचा दोषी आमिर खान ? म्हणजे निर्माता-दिग्दर्शक-लेखक विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी यांनी फक्त झोपा काढल्यात आणि "कर रे बाबा तुला वाटतील ती दृष्य आणि तुला आवडेल ते संवाद तू म्हण" असं आमिरला मोकाट सोडलं होतं का ? चित्रपटातील कथा/पटकथा/संवाद /आशय ही लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी असते की अभिनेत्याची ?
पीके नंतर चोप्रा-हिरानी-जोशी या त्रयींचा संजू नावाचा - एके ५६ रायफल बाळगणार्या संजय दत्तचे काहीसे उदात्तीकरण करणारा चित्रपट आला आणि ५८६ कोटी कमावून गेला. पण त्यावेळी बॉयकॉटची हाक आली नाही ते कसे ?
बाकी लालसिंग चढ्ढा मी पाहिला नाही - आणि बहुधा बघणारही नाही- कारण एकतर आमिर खानचा अतिरेकी अभिनय - मला आमिर खानचा "तलाश" मधला अभिनय जास्त आवडतो- पण त्याने तसा अभिनय केला की चित्रपट फ्लॉप होतो - तर ते असो. आणि दुसरी गोष्ट - मी बघितलेल्या चित्रपट परिक्षणाच्या एका चित्रफितीनुसार कमी बुद्ध्यांकचा व्यक्ती भारतीय लष्करात भरती केलेला दाखवणे हे मुळातच गंडलेले कथानक आहे. फॉरेस्ट गम्प या अमेरिकी चित्रपटासाठी ते कथानक योग्य ठरते कारण अमेरिकेने व्हिएतनाम युध्दाच्या वेळी असला भयंकर प्रकार केला होता त्यामुळे त्यांची युद्धात खूप जीवित हानीही झाली होती (मी याबद्दल मुळातून वाचलेलं नाही सदर चित्रफितीत जे सांगितलंय ते मी लिहित आहे, त्यामुळे तपशीलात काही त्रुटी असू शकतील). पण भारतीय सैन्यात असला काही भयंकर प्रकार कधी घडलेला नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींना मूळ अमेरिकी चित्रपट कितीही आवडला असला तरी त्याचे भारतीयीकरण करण्याची कल्पना मुळातच चुकलेली आहे असे मला वाटते.
चोप्रा-हिरानी-जोशी
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
चोप्रा-हिरानी-जोशी
तर्कवादी तुम्ही निदर्शनास आणून दिलेला हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे हे मान्य
पिके मधील एकांगि पणा बद्दल अर्थातच चोप्रा-हिरानी-जोशी जबादार आहेत , आमिर वर टिका होते कारण तो " मौथपीस " म्हणून वावरतो ...
यौग्य नाही माहित आहे पण आपण जर असे सुचवत असाल कि जोशी आणि हिरानी हिंदू असल्यामुळे त्यावर टिका होत नाही आणि "खानावर" होते तर तसे नाही
किंवा तसा हेतू नाही
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी
In reply to चोप्रा-हिरानी-जोशी by चौकस२१२
निदान मिपाकरांमध्ये तशी प्रवृत्ती नाही हे समजून बरे वाटले. पण इतर समाजमाध्यमांवर अशी प्रवृत्ती ही आढळून येते. मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्या पोलीस अधिकार्याची भूमिका रंगवली होती.
बाकी या विषयावरही ध्रुव राठीची चित्रफीत बघण्याजोगी आहे.
आमिर, शाहरुख, सलमान व अक्षय कुमार या चौघांचे चित्रपट हे मुख्यतः त्यांचे चित्रपट म्हणूनच ओळखले जातात. चित्रपटाच्या यशापयाशाचे श्रेय (वा दोष) दिग्दर्शकापेक्षा या नायकांना जास्त दिले जाते त्यामुळे असेल कदाचित. शाहरुख व सलमान हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाचे निर्माते/सहनिर्मातेही असतात. तर सलमान सारखा अभिनेता चित्रपट करताना स्वतःच्या चाहत्यांचा खूप विचार करतो हे ही दिसून येते. पण तरी काहीही असले तरी माझ्या मते अंतिम जबाबदारी ही दिग्दर्शक व निर्माता यांचीच असली पाहिजे. खास करुन पीके बद्दल बोलायचे तर विवि चोप्रा, हिरानी हे स्वतः प्रथितयश व्यावसायिक आहेत. मुन्नाभाईच्या चित्रपटांमुळे हिरानीचे नाव आधीच खूप मोठे झाले होते. त्यामुळे अगदी आमिर खान सारखा अभिनेताही पटकथेत काही ढवळाढवळ करु शकला असेल असे संभवत नाही.
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन जातात की आमिर खानने सरफरोश मध्ये मुस्लिम अतिरेकी / त्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान धार्जिणे मुस्लिम यांच्याविरोधात लढणार्या पोलीस अधिकार्याची भूमिका रंगवली होती.
आपणास माहित नसल्यास एक माहिती देतो :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
Anti India ?
In reply to मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन by मदनबाण
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद. पण आता थोडी अधिक माहिती घेवूयात.
पण त्या आधी काही प्रश्न :
Anti India म्हणजे काय ? हे काही देशविघातक कृत्त्य असेल आणि देशविघातक कृत्त्य करणार्यांना आमिर खान पैसे पुरवत असेल तर काही गंभीर गुन्हे दाखल होवू शकतात , मग तसे का होत नाही ? NIA , CBI ईत्यादींकडून आमिर खानची चौकशी का होत नाही ? गेला बाजार आपल्या ED वा Income Tax चीही धाड नाही असे का ?
आता थोडी अधिक आणि अगदी सहज मिळू शकलेली माहिती - आपण आणखी खोलवर ही जावू शकता
सदर ट्विटमध्ये नमूद केलेली IPSMF ही संस्था काय आहे ? IPSMF अर्थात INDEPENDENT AND PUBLIC-SPIRITED MEDIA FOUNDATION च्या साईटवर गेल्यास काय दिसते ?Chief Executive Officer आहेत सुनील राजशेखर. बाकी टीम मधली नावे आहेत जयक्रिष्न ई, आदित्य नडिग, अविनाश हुकेरी , अपर्णा अय्यर, ग्रीष्मा सुकुरामन ईत्यादी.
The Board of Trustees ची नावे बघू
१) अमोल पालेकर (अरे बापरे !!)
२) सी बी भावे [Mr. Bhave was Chairman of the Securities and Exchange Board of India (SEBI), as well as Chairman and Managing Director of National Securities Depository Limited (NSDL)[]
३) मुकूंद पद्मनाभन
४) रुक्मिणी बॅनर्जी
५) श्याम दिवाण
६) टी एन निनाण
या पैकी प्रत्येकाचा संक्षिप्त परिचय या दुव्यावर आहे आणि तो आवर्जुन वाचण्याजोगा आहे. प्रतिसादाची लांबी आणखी वाढू नये म्हणून मी सगळंच पेस्ट करत नाही.
बर संस्थेच्या देणगीदारांची नावे पण साईटवर आहेत. ती आता मराठीत टंकण्याचा कंटाळा करुन कॉपी-पेस्ट करतो, माफी असावी
Azim Premji Philanthropic Initiatives Pvt Ltd
Pirojsha Godrej Foundation
Cyrus Guzder
Rohini Nilekani Philanthropies
Kiran Mazumdar Shaw
Rohinton and Anu Aga Family Discretionary No.2 Trust, RDA Holdings Pvt Ltd
Lal Family Foundation
Sri Nataraja Trust
Manipal Education and Medical Group India Pvt Ltd
Piramal Enterprises Ltd
Tejaskiran Pharmachem India Pvt Ltd,
Viditi Investment Pvt Ltd,
Unimed Technologies Ltd,
Quality Investment Pvt Ltd
यातील काही संस्थांबद्दल आपणास थोडीफार माहिती असू शकते. पण मग या सगळ्या Anti India / Anti Hindu आहेत काय ?
मग याच न्यायाने अजिम प्रेमजींच्या विप्रोमध्ये वा अनु आगांच्या थर्मॅक्स मध्ये काम करणे म्हणजे सदर कंपन्याना नफा मिळवून देणे व पर्यायाने IPSMF देणगी मिळवून देणे झाले की !! [ Lal Family म्हणजे बहुधा Eicher Motors कंपनीचे मालक असावेत - म्हणजे बुलेट घेणंही IPSMF देणगी मिळवून देणे .. असो] तर प्रखर देशभक्त म्हणून या देणगीदार सर्व संस्थांशी संबंध तोडायला हवेत नाही का ? पण या यादीत आमिर खानचे नाव का नाही ? म्हणजे तो बहुतेक इतर देणगीदारांच्या तुलनेत खूप कमी देणगी देत असावा काय ? कंजूष कुठला.. मग त्याकरिताही त्याचा निषेध करायला हरकत नाही.
बाकी IPSMF चा पत्ता बंगळूरुचा आहे. मग आणि केंद्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारांनी मिळून सदर Anti India / Anti Hindu संस्थेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तातडीने.

बाकी ट्वीट मध्ये नमूद Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही. बाकीच्या २ साईट्स अजून फारशी माहिती घेतलेली नाही.
पण एक गंमत म्हणजे द वायरला टाटा ट्रस्टकडूनही देणगी मिळालेली आहे (आली का पंचाईत)
मदनबाणजी आपण एक ज्येष्ठ मिपाकर आहात. आपल्या आसपास चालणार्या प्रोपागंडावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करायला हवा.
तर्कवादी,Altnews, The Wire,
In reply to Anti India ? by तर्कवादी
तर्कवादी,
Altnews, The Wire, The Caravan यापैकी Alt news च्या काही चित्रफिती मी पाहिल्या आहेत, FactCheck प्रकारचे त्यांचे काम आहे. मला तरी त्यात Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही.
मदनबाण साहेबांच्या प्रतिसादाला मूद्देसुद प्रतिसाद देताना ईथे येऊन तुम्ही अडखळलात !!
Alt News जर तुम्हाला Anti India / Anti Hindu असे काही दिसले नाही तर तुमच्या नजरेत जरूर काही तरी गडबड आहे. Alt News चा मालक महम्मद झूबेर
हा दोन तीन आठवड्यासाठी जेल मध्ये बंद होता. हिंदु भावना दूखावणार्या ट्विट कल्याबद्दल त्याच्यावर केस चालु आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडुन त्याला अंतरीम बेल मिळालेला आहे.
https://www.google.ae/amp/s/m.thewire.in/article/law/supreme-court-moha…
https://www.google.ae/amp/s/www.thehindu.com/news/national/bail-sought-…
नूपुर शर्माच्या व्यक्तव्याला मोडुन तोडुन ईस्लाम विरुद्ध दाखवुन वायरल करण्यात ह्या महम्मद झूबेरचा हात आहे. त्याच्यामूळेच नूपुर शर्मा विरुद्ध मुसलमानात रोष निर्माण झाला व त्याची परिणीती म्हणुन १८-२० हिंदुंच्या निघृण हत्त्या झाल्या.
हे तर फक्त अल्ट न्यूज बद्दल आहे.
"द वायर " "कारवान" सारख्या बद्दल भरपुर माहीती जालावर आहे.
अभ्यास वाढवा ईतकच म्हणेन !!
महम्मद झुबेरचा जामीन
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
कसा दिला हे नीट समजावून घेतले असते तर तो अजूनही गुन्हेगार आहे हे आडून आडून सुचवण्याचा प्रयत्न केला नसता. त्याला बंदिवासात ठेवण्याचे कुठलेही सबळ कारण सरकार पक्षाकडे नव्हते आणि त्याला या उप्पर बंदिवासात ठेवता येणार नाही इतकी कणखर भूमिका न्यायालयाने घेतली आहे. एवढेच नाही तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून मिळाली नाही या कारणास्तव वेळकाढूपणा पोलिसांनी करू नये हे देखील न्यायालयाने पहिले. एरवी भक्त अशा बाबतीत काय म्हणतात? ते सणसणीत चपराक वगैरे?
Altnews
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
Altnews चा co founder प्रतिक सिन्हा आहे, यावर आपले काय मत आहे?
सं - दी - प
मी जे वरती ट्विट दिले आहे
In reply to Altnews by चांदणे संदीप
मी जे वरती ट्विट दिले आहे त्याचा संदर्भ पत्रकार अजीत भारती यांच्या व्हिडियोतुन घेतला आहे, ते पत्रकार आहेत तेव्हा त्यांनी दिलेली माहिती योग्यच असावी असा विचार करुन मी हा संदर्भ इथे दिला.
मोहम्मद ज़ुबैर वर अधिक माहिती घेताना मला २ संदर्भ मिळाले ते इथे देऊन ठेवतो. या प्रोपागंडा न्ञुज नसाव्यात अशी अपेक्षा आहे.
ताबीज का हुआ 'उल्टा असर' तो बुजुर्ग से 'जय श्री राम' बुलवाकर काट दी दाढ़ी: Alt News के वायरल Video का सच
Unremorseful after triggering a hate wave that claimed the lives of Hindus, Mohammed Zubair returns on Twitter to whitewash Jihadi violence
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
डँबिसजी
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
डँबिसजी
मी कुठेही अडखळलो नाही.
अतिसंक्षिप्त माहितीबद्दल धन्यवाद !!
हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ? बरं तो ट्वीट नेमका काय होता ? इथे बघता येईल ते ट्वीट.
म्हणजे झुबेरने किसि से ना कहना या चित्रपटातले एक दृष्य ट्वीटमध्ये वापरले. त्याने त्यात काही फेरफार केला काय ? ते ही बघता येईल YouTube वर चित्रपट आहे.
मग किसि से ना कहना या चित्रपटाचे लेखक सचिन भौमिक व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनाही हिंदूविरोधी ठरवायला हवे. अभिनेता फारुक शेख तर बाय डिफॉल्ट हिंदू विरोधी असेलच !!
अच्छा, मग नूपुर शर्माचे मूळ वक्तव्य काय होते त्याची चित्रफीत आपण देवू शकता का ? आणि जर नूपुर शर्माचे काहीच चुकले नाही तर भाजपने तिला पदावरुन दूर का केले असावे, शिवाय तुम्ही म्हणता तसे झुबेरने वक्तव्य तोडून मोडून दाखवले असेल तर त्याच्याविरोधात त्याबद्दल खटला दाखल करायला हवा, त्याबद्दल त्याला अटक व्हायला हवी. .. पण त्याला २०२२ मध्ये अटक करायला २०१८ च्या ट्वीटची गरज का भासली.
असो,नुपूर शर्मा हे पुर्णतः वेगळे प्रकरण आहे. मदनबाण यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा IPSMF मुख्यतः बद्दल होता, त्याबद्दलही आपण अधिक माहिती दिलीत तर आवडेलच.
खरंय.. मी पण द वायर बद्दलची काही माहिती वर दिली आहेच पण आपण त्या मुद्द्यावर काहीच बोलला नाहीत. असो.
हेटाळणीजनक टिप्पणी टाळावी. "अभ्यास वाढवा ", "तुम्हाला काय कळतं ?" वगैरे अर्थाची वाक्ये टाकून उगाच समोरच्याला चिडविण्याचा प्रयत्न करु नये. आपणास जी माहिती आहे ती आपण द्यावी. सगळ्या जगाचं सगळं ज्ञान कुणालाच नसतं. आपल्याकडे समोरच्यापेक्षा काही अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच सांगावी पण त्यात समोरच्याची हेटाळणीकरण्याचा सूर नसावा. आपण ज्येष्ठ मिपाकर आहात आणि मिपावर सकारात्मक वातावरणात मुद्देसूद चर्चा कशा कराव्यात हे आपणास अवगत असेलच असो.
छान
In reply to डँबिसजी by तर्कवादी
@तर्कवादी,
युक्तीवाद, वादसंवादाची पध्दत आणि भाषाप्रयोग आवडलेला आहे.
कीपीटप.
"अभ्यास वाढवा, आपली लायकी पहा" आदी शेरे मारणारे स्वलालधन्य 'हुशारी के पेड' छाटण्याची मिपाला फार गरज आहे.
धन्यवाद
In reply to छान by सुरिया
धन्यवाद सुरियाजी..
आणखी ते "वाढदिवसाच्या शुभेच्छा" पण.
हे सर्व हेटाळणीजनक / चिथावणी देणारे वाक्य टाळून सकारात्मक चर्चा व्हायला हवी,
तर्कवादीजी,हो बेल मिळालेला
In reply to डँबिसजी by तर्कवादी
तर्कवादीजी,
हो बेल मिळालेला आहे , म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झाला नाही ना ?
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा अर्थ जर "गून्हा सिद्ध झाला नाही ना ?" असा लावायचा असेल तर "कोर्टाने अंतरीम बेल दिलेला आहे, म. झुबेर हा निर्दोष आहे असा आदेश दिलेला नाही" असा पण ह्याचा अर्थ होउ शकतो.
झुबरवर ८ केस दाखल झालेल्या आहेत. झुबेरला अटक करण्यासाठी २०१८ पासुन केसेस पेंडीग असताना २०२२ च्या केसवर अटक कशी करता येईल ?
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा
In reply to तर्कवादीजी,हो बेल मिळालेला by डँबिस००७
अर्थात आपण आपणास हवा तो अर्थ काढू शकता ? आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करुन सदर ट्वीट खरेच हिंदू विरोधी / हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे का हे पण ठरवू शकता.
बाकी झुबेर हाच चर्चेचा केंद्रबिंदू करण्यात मला रस नाही. मदनबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट मधील IPSMF आणि IPSMF ला देणगी देणे हा प्रमुख मुद्दा होता त्याबद्दल अधिक चर्चा होवू शकेल.
Altnews, The Wire, The
In reply to Anti India ? by तर्कवादी
Altnews, The Wire, The Caravan यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. फार चतुराईने खर्या खोट्याची मिसळ करतात. आणि त्यांना हवे तेच मुद्दे चर्चेत आणायचा प्रयत्न करतात. वरदराजन तसेच शेखर गुप्ता हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहेत.
The Caravan तर अनेकदा खोटी वृत्ते देतांना पकडला गेला आहे असे म्हणतात. टकले यांचे प्रकरण आठवते आहे.
The Wire हे तर कोंग्रेस चे मुखपत्र असावे असे वागते.
संदर्भ देणार नाही, शोधा.
ते IPSMF बद्दल काहितरी होतं ना ...?
In reply to Altnews, The Wire, The by निनाद
असेलही कदाचित. Altnews, The Wire, The Caravan ह्यापैकी प्रत्येकी वेगळ्या धाग्यांचे विषय होवू शकतील. सहजपणे मिळालेल्या माहितीत The Wire च्या देणगीदारांत टाटा ट्रस्टचे नाव सापडले ते मी लिहिले बाकी या प्रत्येकाच्या खोलात जाण्याकरिता हा धागा योग्य नाही असे माझे मत आहे. असो.
पण मदणबाण यांनी शेअर केलेल्या ट्विट्मध्ये केलेला मूळ मुद्दा आमिर खानच्या IPSMF ला देणगी देण्यासंदर्भात होती. त्या IPSMF बद्दल मी बरीच माहिती दिली आहे. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये अमोल पालेकर आणि इतर काहि दिग्गजांची नावे आहेत. देणगीदारांत अनु आगा, अजिम प्रेमजी यांच्या ट्रस्टची नावेही आहेत. पण या मुद्द्यांवर पुढे चर्चा झालीच नाही.. असो.
असे म्हणतात का ? म्हणत असतील बुवा ...
शक्य आहे. वरील ट्वीट ज्यांचे आहे ते विजय पटेल भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर राजकीय पक्षांच्या नेते / कार्यकर्ते स्वतःच्या संस्था, युट्युब चॅनेल चालवू शकतातच की.
नाही देणार तर नका देवू संदर्भ.. आग्रह नाही..मला जेवढी शोधाशोध कराविशी वाटली तेवढी केली आणि इतके मला समजले की IPSMF ला देणगी देणे हा काही गुन्हा नाही की पाप नाही !!
हिंदूविरोधी दृष्य आणि बहिष्कार !!
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
पीके चित्रपटामुळे अभिनेता आमिर खानला (फक्त अभिनेताच हं.. लेखन, दिग्दर्शन , निर्मितीत त्याचा सहभाग नव्हता) बहिष्काराला सामोरे जावे लागत असेल तर जितेंद्र जोशींनी (अभिनेते आणि निर्मातेसुद्धा - चित्रपट गोदावरी) या एकाच दृष्यातून त्यांच्या पुढील सात जन्माच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायची सोय करुन ठेवलीये असे म्हणता येईल... अरे हो पण इतके पाप केल्यावर त्यांच्या आत्म्याला गती वगैरे मिळून पुनर्जन्म लाभेला का हा देखील प्रश्नच आहे म्हणा !! असो.. दृष्य बघा.. हॅव फन !!
सिगरेट !
In reply to हिंदूविरोधी दृष्य आणि बहिष्कार !! by तर्कवादी
जाता जाता :- च्यामारी आमिरच्या बुडास लागलेली आग विझली असेल मला वाटले होते, पण त्याच्या डाव्या भक्तांची अजुन मजबुत जळतेय इतकं मात्र नक्की ! :))) ते काय म्हण हाय ? हं, गिरे तो भी टांग उप्पर ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)
"मदनबाण"
"मदनबाण"
तुम्ही इथे परिक्षण टाकले फार उत्तम झाले, कोणत्या मिपाकरांचे या विषयावर काय विचार आहे हे समजायला मदत झाली.
अगदी नेमक्या शब्दात तुम्ही लिहीलत.
ईतक असुन सुद्धा काही आपलच कस खर हे सांगत आहेत.
काश्मिर फाईल्स वरच्या धागा आल्या आल्या, तो सिनेमाचा विषय राहीला बाजूला तर "विवेक अग्नीहोत्री" कसा वाईट हे सांगण्यासाठी ह्यांनी किती आटापीटा केला होता ते आठवले.
दाभोलकरांना फक्त हिंदू
दाभोलकरांना फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात, इतर इतर धर्मातील दूर करायची हिम्मत करत नाही असे काही आक्षेप घ्यायचे. आमिर खान हिंदूंच्या अंधश्रध्दाबद्दल काही बोलला तर त्यालाही नावं ठेवायची. म्हणजे एका हिंदूंनी दुसऱ्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते ह्यांना चालणार ,फक्त आमच्या धर्मात करू नका.
आग्या ... म्हणणे एवढेच आहे
आग्या ... म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना
मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ...
ती हिंमत नाही यांच्यात
मग ते समाज कार्यातून असो, समाजप्रबोधनातून असो , कलाकृतीतून असो , चित्रपट / नाटक / साहित्यातून असो काह्ही माध्यम असले तरी हा नियम पाळावा
पिके मधील हिंदू धर्मातील अंधश्रद्धा बाहेर आणली यात माझ्यसारख्याला चांगलेच वाटते .. पण ते करताना इतर धर्मातील अश्या चालिरीनवर जास्त बोलण्याची हिंमत हे लोक दाखवत नाहीत .. हा ढोंगी पणा आता उघडकीला आलाय ....
दिसला हिंदू कि मार टपली .. लै सहन केलं
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय पहा एकदा .
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर
In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर असोत नाही तर आमिर खान जर अंधश्रद्धा उघड करायची हा शुद्ध हेतू आहे ना
मग तर सर्व धर्मातील समतोल पने करा ...
ती हिंमत नाही यांच्यात
अनिसचे संबंधित धर्माचे कार्यकर्ते त्यांच्या धर्मातील अनिष्ट रूढी निर्मूलनाचे कार्य करत आहेत. शुद्ध हेतू ठेवून तुम्हीही हे काम करण्याची हिम्मत करू शकता. फक्त बोटं दाखवण्याचा शुरपणा सोडावा लागेल.
एखाद उदाहरण आहे का?
In reply to म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर by आग्या१९९०
एखाद उदाहरण आहे का?
माझ्यासाठी हिंदू व्यातरिक्त बाकी कुठे अश्या सुधारणा होत आहेत ही न्यूज आहे.
https://www.google.com/amp/s
In reply to एखाद उदाहरण आहे का? by सुखी
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/controv…
अनिसला साथ द्या. त्यांच्या सोबत काम केले की बऱ्याचशा शंका दूर होतील. अनिस फार गाजावाजा करत नाही त्यांच्या कार्याचा. बऱ्याचदा भोंदूबाबांना लेखी हमी घेऊन माफ करतात.
भोंदूबाबा
In reply to https://www.google.com/amp/s by आग्या१९९०
हमीद दाभोलकरांनी लेखी हमी दिलीय का?
अंनिस ने हमीद दाभोलकरांना माफ केलंय का?
संदर्भः http://www.misalpav.com/node/37392
तिथून साभारः
विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले.
सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या!
बाकी चालू द्या.
नेमका
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
मर्मभेदी प्रतिसाद!
आपली वाटचाल ब्लासफेमी लॉ कडे
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
आपली वाटचाल ब्लासफेमी लॉ कडे चालली आहे का? असेल तर ते कितपत योग्य आहे?
https://www.aksharnama.com/client/article_detail/6265
मिपावरच्या किती लोकांनी
In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
हलाला तर नाही पाहिला पण शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (मशिदीवरील भोंग्याचा विषय) पाहिला, अतिशय आवडला आणि या चित्रपटाबद्दल (तसेच हलालाबद्दलही) मुस्लिम संघटनांनी शिवाजी पाटील यांचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही.
मिपावरच्या किती लोकांनी
In reply to मिपावरच्या किती लोकांनी by तर्कवादी
मिपावरच्या किती लोकांनी शिवाजी लोटन पाटील यांनी निर्मिलेला "हलाला" पाहिलंय
मी हा चित्रपट पाहिला आहे.उत्तम चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटा बद्धल बोलले जात होते तेव्हा या चित्रपटाच्या निर्म्याताचा एक व्हिडियो मी मिपावर दिल्याचे स्मरते. आज तो व्हिडियो इथे परत देतो. चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर काही आंदोलने झाली की नाही या बद्धल माहिती नाही,परंतु सेंसर बॉर्डातुन सर्टीफाईड होऊन बाहेर पडण्यासाठी काय दिव्यातुन जावे लागले ते या व्हिडियोतुन कळते.
सनी देओल आणि अमिशा पटेल चा गदर चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर हिंदूस्थानात अशांती दुतांनी हैदोस घातला होता. एका शीख व्यक्तीचे मुस्लिम मुली बरोबर लग्न होऊन ती नंतर गर्भवती होऊन मुलास जन्म घालते, तसेच तीचे नाव सकीना होते हे सुद्धा अशांती दुतांना सहन झाले नव्हते. जितक मला माहित आहे त्यानुसार बहुतेक भोपाळ मध्ये थेटर देखील जाळण्यात आले होते.
संदर्भ :-
Religious protests against period film Gadar put free speech on the boil
Gadar Protests In Lucknow
'Disruption of 'Gadar' part of sinister plan'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
,परंतु सेंसर बॉर्डातुन
In reply to मिपावरच्या किती लोकांनी by मदनबाण
२०१६ साली चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून त्रास झाला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. RC मध्ये चित्रपट पास केला त्यावेळी ८ मुस्लिम व्यक्तीही ज्युरी म्हणून आल्या होत्या हे पण निर्माता कागणे याने सांगितले आहे. आणि त्यानंतर निर्मात्याने भोंगा चित्रपट बनवला. असो.
हे खरंय.आणि सर्वच धर्मातील माथेफिरु धर्मांधाचा निषेध करायला हवाच.
गदरच्या वेळी गदारोळ झाला होता हे मलाही आठतंय. तसेच बॉम्बे चित्रपटातही नायिका मुस्लिम व नायक हिंदू असल्याने काही मुस्लिम संघटनांकडून विरोध झाला होता. मुंबई दंगलींचा विषय तसा ताजाच होता, अतिशय संवेदनशील विषय होता. काही निदर्शने हिंसकही असावीत बहुधा. पण या सगळ्यांची व्याप्ती किती होती ते आता आठवत नाही. मी हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात जावून बघितले होते. बॉम्बे प्रदर्शित झाला तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी काळजीपोटी आधी मला चित्रपटगृहात जाण्याची परवानगी दिली नाही. पण नंतर पुण्यात तरी काही गडबड झाल्याच्या विशेष काही बातम्या आल्या नाहीत तशी मला परवानगी मिळाली आणि मी दापोडीच्या अरुण या चित्रपटगृहात एकट्याने जावून बॉम्बे चित्रपट पाहिला.
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच आल्याचे (नेहमीप्रमाणे) दिसते. हे रोचक आहे. कोणाची तरी मते, अर्धवट सीन, ट्रेलर असे पाहून फायनल आग्रही आणि तपशीलवार मत देणे. स्टाम्प मारणे हे अनाकलनीय आहे. पुलंचे अंतूशेट जसे झापे बाजूला करुन घटकाभर एकच प्याला नाटक झलक रुपात बघतात आणि "सिंधूचा पार्टी कन्डम, यापेक्षा दशावतारी बरे" अशी निर्णायक मते देतो तसे काहीसे सर्वत्रच घडताना दिसते. मग मत अति समर्थक असो किंवा अति विरोधी..
चित्रपट प्रत्यक्ष बघितला की बहुतांश वेळा जी हवा केली गेली होती तसे तितके त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सिद्ध झाल्याचीच उदाहरणे आहेत.
अर्थात अद्याप चित्रपट बघितला नसल्याने चित्रपटाबद्दल निवाडा देणे शक्य नाही. केवळ निरीक्षण नोंदवले.
धन्स.
चित्रपटाची ओळख आवडली. पाहणे आहेच. पण, चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत, असे जे वाटायचे त्याची परिक्षण वाचून खात्री पटली. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
चित्रपट न पाहता लोक वाद उभा करीत आहेत,
सॅटॅनिक व्हर्सेस साठी सलमान रश्दी याना "सर तन से जुदा" म्हणणाऱ्या किती टक्के लोकांनी वाचले असणार?
एक टक्का सुद्धा नाही याची मला १०० % खात्री आहे.
पुरोगामी दुटप्पीपणा हा असा असतो.
अरेरे! चुकीच्या मार्गाने
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
अरेरे! चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांचे समर्थन करतोय ह्याचे काही कारण?
ते माहिती नाही ब्वा पण
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
असे वाचन वगैरे न करणारे अजून काही उपरे आता दिल्लीत राहणार आहेत रेफ्युजी म्हणून. रोहींग्या म्हणतात बुआ त्यांना.
आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट
आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला?
This is interesting!!!
नै नै. जोरात सुरु आहे.
In reply to आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट by आनन्दा
>>> आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट campaign मुळे पडला?
नै नै...लोकांनी बायकॉट केला म्हणून सिनेमा अजिबात पडणार नाही. पडत तर अजिबात नसतो. सिनेमा प्रेक्षकांना किती अपिल होतो त्यावर आपल्याकडे सिनेमा चालतो-पडतो, असे वाटते. उलट या बायकॉटमुळे सिनेमा उरलेल्या दिवसात सिनेमा अधिक चर्चेत राहील. आज सिनेमा पाचव्या दिवशी पन्नास कोटीच्या जवळ जवळ पोचला आहे. माध्यमांमधून सिनेमाला 'मिला जुला रिस्पॉन्स मिल रहा है' अशा बातम्या आहेत त्यामुळे सिनेमा नफ्यात राहणार आहे. सिनेमा शौकीन पब्लिक तर, सिनेमा पाहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
बॉयकॉटमुळे आणि अपीलबाह्य कारणांमुळेच पडला
In reply to नै नै. जोरात सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा सिनेमा कारणांमुळे पडला ( म्हणजे अपेक्षित यश नाही )-
१. खान मंडळींविरुद्ध / प्रस्थापित बॉलिवूड कलाकरांबद्दलचा रोष
२. काश्मीर फाईल्स नंतर प्रस्थापित हिरो हिरविनी 'खर्या' म्हणजे आधुनिक हिंदू अस्मितेच्या प्रश्नांना भिडत नाही हा पसरलेला समज
३. नेत्रदीपक दाक्षिणात्य चित्रपटांपुढे बॉलीवूड फिके आहे असा पसरत चाललेला समज
४. आमीर खान/ किरण राव यांची तथाकथित देशद्रोही वक्तव्ये ( जी इथून पुढे आयुष्यभर त्यांना छळत राहणार )
५. बॉयकॉट मोहीम
शिवाय या बॉयकॉट मोहीमेने "एनी पब्लीसिटी इज गुड पब्लिसिटी" अशी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजिदेखील चालतेच हा गैरसमज खोडून काढला. अर्थात हे चित्रपट निर्मात्यांनाच लागू आहे. स्वतः आमिर खानचे इन्स्टा/ट्विटर अनुयायी वाढलेच असतील.
नवराष्ट्रवादी अदलित लोकांनी झुंड देखील असाच मुद्दामहून नाकारला. त्यात राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, जातद्रोही, पंथद्रोही, भाजपद्रोही, मोदीद्रोही, रास्वसद्रोही काहीही नव्हते. त्यामुळे इथून पुढे "रंग दे बसंती", "लगान", "दिल चाहता है" सारखे एखादी पिढी झपाटणारे चित्रपटसुद्धा तयार होतील का नाही याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे. तुलनेने दक्षिणी प्रेक्षकांत एखाद्या हिरोप्रती निष्ठा जास्त ठळक असल्याने आणि त्याचवेळी प्रयोगशीलतेचे चाहते असणारे लोकही अनेक असल्याने तेच अशी रिस्क घेऊ शकतात. त्यामुळे उत्तरेकडचे किंवा बॉलीवूडचे चित्रपट आता गायपट्ट्यातील अदलित नवराष्ट्रवादी भारतीयांना शरण जाणार हे नक्की.
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच सेलिब्रीटी आता लाईनीवर आलेत.
काही दिवसांपुर्वी ला.सिं.च. च्या बॉयकॉटची खिल्ली उडवत एका कार्यक्रमात कॅमेरा समोर "आम्हाला सूद्धा बॉयकॉट कराना प्लिज" म्हणणार्या अनुराग कश्यप व तापसी पन्नु ला आता ऊपरती झालेली आहे. तापसी पन्नु
सारख्या अत्यंत अहंकारी हिँंदु हेटर अभिनेत्रीचे आता तेवर बदलले दिसत आहे.
बॉयकॉटची भिती र्हितीक रोशनला सूद्धा भेडसावत आहे.
बॉयकॉट
बॉयकॉट गँग मुळे पिक्चर चालात किंवा पडत असते तर भाजप क्वीन कंगनाचे पिक्चर सुपरहिट झाले असते..
खुद्द शेठ चा पिक्चर सुपर फ्लॉप आहे तर बाकीच्यांची काय कथा...
भूल भू २ हिट झालाच की... लोकांना वेगळा विषय , फ्रेश चेहरे हवे आहेत... आणि सध्या इकॉनॉमी चे ल लावले असल्याने लोक थिएटर मध्ये जाऊन पैसे खर्च करत नाहीत
काश्मीर फाईल्स सुद्धा?
In reply to बॉयकॉट by कपिलमुनी
काश्मीर फाईल्स सुद्धा?
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या शुटींग करता तुर्कस्तानात जाऊन लेडी एर्दोगनला तिच्या महालात जाऊन भेटलेला आमिर खान स्वःताला देश प्रेमी म्हणवतो. कौन बनेगा करोडपती मध्ये झेंड्याला सलाम न करणारा आमिर खान आपल्या घरावर तिरंगा फडकवतो, ह्यांना वाटत जनतेला
(हिंदु) सहज मुर्ख बनवता येते.
हेच
In reply to ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या by डँबिस००७
ह्यांना वाटतं हिंदु जनतेला सहज मुर्ख बनवता येते.- पण समाज जागा झाला आहे आणि हेच त्यांना पचत नाहीये. हे समाजद्रोही ठेचलेच पाहिजेत.
मी पैसे देऊन खान लोकांचा पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. त्यानंतर यांना पैसे कधीही दिलेले नाहीत, मरेस्तोवर कधी देणारही नाही!
सिनेमा पडेल आहे अभिनेता उघडा पडलेला आहे.
तेच ते व्हिएफएक्स चे तारुण्य आणि तोच तो माकडछाप अभिनय लोक तरी कितीकाळ पाहणार?
"मज़हब से मलेरिया फैलता है"
सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.
"मज़हब से मलेरिया फैलता है"
सदर चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी "मज़हब से मलेरिया फैलता है" हे कसे हे समजावून सांगावे.
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा अनेक वेळेस सिद्ध केलेला आहे. इरोडगन यांच्या बायकोला भेटल्यापासून तर तो लोकांच्या मनातून साफच उतरला आहे
कुठेही कधीही समाजसुधारक लोकाना केवळ हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा कशा काय दिसतात? हे एक कोडे आहे.
भेकड पणा हा पुरोगामी लोकांचा स्थायीभाव असल्याने इस्लाम मधील सरळ सरळ दिसणाऱ्या अन्धश्रद्धा आणि अमानुषपणा बद्दल त्यांची तोंडे कायमच बंद असतात.
भारतात प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक अधिकारांबद्दल उच्चरवाने बोम्ब मारणाऱ्या पुरोगाम्यांनी तलाकपीडित महिला भारतात किती आहेत याची साधी आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही या बद्दल कधी तोंड उघडलेले मी पाहिलेले नाही.
भारतीय राज्यघटनेबद्दल दुहाई देणारे सर्वच पुरोगामी समान नागरी कायदा सारख्या घटनेच्या मूलभूत कलम ४४ बद्दल गेली ७५ वर्षे कधीही आग्रहाने बोलताना दिसत नाहीत.
Article 44 in The Constitution Of India 1949
44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India
शेवटी एकच म्हणावेसे वाटते. उद्या दाऊद इब्राहिम ने जर चित्रपट काढला आणि त्यात दिग्गज कलाकार असतील तरी कलेसाठी कला म्हणून मी तो कधीही पाहणार नाही.
हि एकच वृत्ती आहे कि जे म्हणतात पाकिस्तानी क्रिकेटर्सची काय चूक आहे? त्यांना पण भारतात बोलवा आणि आय पी एल मधून कोट्यवधी रुपयांची खैरात करा.
बॉलिवूड कडे एकंदर पैसा कुठून आणि कसा येतो याची माहिती मिळाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकंदर सिनेमे पाहणेच मी बंद केले आहे.
त्यामुळे लालसिंग चड्ढा कसाही असला तरी मला शष्प फरक पडत नाही.
" होईना काही, जीवाची लाही ".
In reply to आमीर खान ने आपला दुटप्पीपणा by सुबोध खरे
" होईना काही, जीवाची लाही ".
सध्या पुरोगाम्यांचे सरकार नाही ना? करा ना अहिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर. किती दिवस पुरोगाम्यांचे तुणतुणे वाजवणार?
तुमच्या पातळीच्या वर आहे
In reply to " होईना काही, जीवाची लाही ". by आग्या१९९०
तुमच्या पातळीच्या वर आहे
तुम्ही ताण घेऊ नका
डोळे बंद करून पातळी कशी समजते
In reply to तुमच्या पातळीच्या वर आहे by सुबोध खरे
डोळे बंद करून पातळी कशी समजते? काही सिद्धी प्राप्त झाली का?
उपाय योजना करा प्रत्येक समस्येवर. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या.