✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 09/18/2021 - 06:19  ·  लेख
लेख

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे. लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारला गेला अथवा नाही, हे लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येईल. -दिवाळी अंक समिती नमस्कार मिपाकरहो... मिसळपाव या 'मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती'ला वाहिलेल्या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकासाठी आम्ही लेख मागवत आहोत. यंदाचा दिवाळी अंक मुक्त स्वरुपात असेल, म्हणजे दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे. लेखाबरोबर प्रकाशचित्रं द्यायची असल्यास ती शक्यतो स्वतः काढलेले फोटो, स्वतः काढलेली चित्रं किंवा जालावर मुक्त उपलब्ध असलेली असावीत, अशी अपेक्षा आहे. प्रकाशचित्रं स्वतंत्रपणे स्टोअर करून लेखात समाविष्ट केली जातील. काही अडचणी असल्यास तुम्ही प्रकाशचित्रं आम्हाला ईमेलने पाठवू शकता. आम्ही ती लेखात समविष्ट करू. ...आणि काही सूचना :- १) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. २) मिपाचा दिवाळी अंकात आलेलं साहित्य फक्त मिपाच्याच दिवाळी अंकात (एक्सक्ल्युजिवली) वाचायला मिळावं असं आम्हाला वाटतं. म्हणून, अंकासाठी पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. तसंच, मिपाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर १५ दिवसांच्या आत ते लेखन ब्लॉग, फेसबुक किंवा अन्य संस्थळांवर / सामाजिक माध्यमांवर प्रकाशित करू नये. (मिपा आपल्या फेसबुक+ट्विटर अकाउंटवर प्रसिद्धी करतंच. ती पोस्ट शेअर करायला अर्थातच हरकत नाही. तसंच, मिपाची लिंक व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवायलाही काहीच हरकत नाही.) ३) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा. ४) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. याव्यतिरिक्त काही प्रश्न, शंका असल्यास अथवा तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा. --x--

लेखन देण्याची मुदत : २४ ऑक्टोबर, २०२१.

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak . mipa @ gmail . com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. ईमेलने लेखन पाठवताना ईमेलमध्ये लिहून, किंवा MS Word docx फाइल attach करून पाठवू शकता. फाईल attach करताना फोटो (असल्यास) ते वर्ड फाइलमध्ये न देता, स्वतंत्रपणे attach करावेत. कृपया पीडीएफ फाइल स्वरूपात लेखन पाठवू नका. काही प्रश्न, अडचणी, शंका असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंक १ नोव्हेंबरला प्रकाशित करण्याचे नियोजन आहे, तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. २० ऑक्टोबरला केवळ तीस दिवस राहिलेत. तेव्हा, लागा लिहायला! - टीम दिवाळी अंक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
संस्कृती
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक

प्रतिक्रिया द्या
20424 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

व्वा..! दिवाळीच्या

प्रचेतस
Sat, 09/18/2021 - 07:29 नवीन
व्वा..! दिवाळीच्या फराळासारख्याच विविधांगी लेखांनी नटलेल्या दिवाळी अंकाचे वाचन करण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

अरे गलेमा संपत नाही तर आला सुध्दा धागा?

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 09/18/2021 - 09:13 नवीन
या वेळी दिवाळी अंक जोरदार होणार असे दिसते आहे. या अंका करता काम करणार्‍या सर्व दृष्य व अदृष्य हातांना मनःपूर्वक शुभेच्छा. लेखक लोक हो लागा कामाला, आपल्या प्रतिभेला ढोसण्या मारुन जागे करा आणि उधळूद्या तिला चौखुर मिपा मैदानात... होउ दे खर्च, मिपा आहे घरच... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

ॲबसेंट माइंडेड…
Sat, 09/18/2021 - 13:00 नवीन
दिवाळी अंक वाचण्याची ऊत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंकास शुभेच्छा!!!

पाषाणभेद
Sat, 09/18/2021 - 23:47 नवीन
दिवाळी अंकास शुभेच्छा!!! दुसरे असे की फोटो नसावेत. कारण त्यामुळे अकारण फाईलची साईज वाढेल अन फॉरवर्ड करण्यात, जतन करण्यात अडचणी येतील. तसेच आजकाल कॅमेर्‍यांपेक्षा मोबाईल कॅमेरे अन त्याहीपेक्षा तो वापरणारी व्यक्ती सुजाण झाली असल्याने या फोटो विभागाला उदंड प्रतिसाद मिळेल अन संपादकांची अडचण होईल. (तसेच फोटोग्राफी ही कला आहे की तंत्रमाध्यम हा वादाचा नवा धागाही काढता येईल. जूना धागा आहेच येथे. शोधा.) :-)
  • Log in or register to post comments

असहमत

श्रीरंग_जोशी
Sun, 09/19/2021 - 08:25 नवीन
दिवाळी अंकाच्या प्रकल्पाचे स्वागत व दिवाळी अंक चमूस शुभेच्छा!! पाषाणभेद साहेब - २०-२२ वर्षांपूर्वी साइझच्या कारणामुळे फोटो नकोत हे समजू शकतो. पण आजच्या काळात लोक रोजच्या सुप्रभात / शुभरात्रीच्या संदेशांसाठी सुद्धा खच्चून फोटो व्हिडिओजचा वापर करत असताना दिवाळी अंकात फोटोज नकोत ही सुचवणी पटत नाही. मिपावर पहिले पासून फोटो नाही तर पाकृ नाही असा प्रतिसादकांचा सूर राहिला आहे. पाककृतींखेरीज, प्रवास / स्थल वर्णने, माहितीपर लेख यांच्यात फोटोज (काही वेळा व्हिडिओजही) महत्त्वाची भूमिका बजावतात. पिडिएफ फॉरमॅटमधे दिवाळी अंकाची प्रत काढण्याचा तोटा असा की नवे वाचक प्रत्यक्ष मिपापर्यंत पोचत नाहीत अन लेखनावरच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा त्यांना आस्वाद घेता येत नाही. मिपावर प्रकाशित होणार्‍या ऑनलाइन दिवाळी अंकामुळे अशा नव्या वाचकांना 'आपणही मिपाकर व्हावे' अशी इच्छा निर्माण होऊ शकते. आज आंतरजालाची जोडणी जवळपास प्रत्येकाकडे असताना ऑनलाइन अंकाच्या जोडीला ऑफलाइन अंक लगेच न काढलेला बरा. काही महिन्यांनी किंवा पुढच्या दिवाळी अंकाच्या वेळी अगोदरच्या वर्षीचा दिवाळी अंक पिडिएफ स्वरुपात प्रकाशित करणे अधिक उपयुक्त ठरु शकते. बादवे ही केवळ सुचवणी आहे. याबाबतचे धोरण ठरवायला संबंधीत मंडळी सक्षम आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आता आपणाशी सहमत झालो आहे.

पाषाणभेद
Sun, 09/19/2021 - 23:16 नवीन
आता आपणाशी सहमत झालो आहे. मुद्दे पटलेत आपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Mon, 09/20/2021 - 02:20 नवीन
__/\__.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आली का दिवाळी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/19/2021 - 17:38 नवीन
आत्ताच तर गणेशलेखमालिका सुरु झाली होती की आलीच दिवाळी. पण मस्त आवाहन. दिवाळी अंकात काय असावे त्याबद्दलच्या भावना पोहचल्या. काही चांगलं सुचलं तर लिहीनच. साहित्य संपादक, संयोजक, दिवाळी अंकाचे पै पाहुणे, तंत्रज्ञ, संपादक, जवाबदारी घेणारे सर्वांना शुभेच्छा. सर्वांना आपलं पूर्ण सहकार्य राहील. काही लागलं सवरलं तर बिंधास्त हाक मारा. आम्ही इकडेच पडिक असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.

नावातकायआहे
Wed, 09/29/2021 - 13:53 नवीन
प्रा.डॉ. नक्की लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हार्दिक शुभेच्छा

कर्नलतपस्वी
Tue, 09/28/2021 - 09:18 नवीन
दिवाळी अंकाची प्रतीक्षेत आहे. मीपाकरांचे दर्जेदार लेखन दिवाळीच्या फराळाची गोडी नक्कीच वाढवेल.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 09/29/2021 - 21:48 नवीन
दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी व्यक्तीचित्रेच्या नावाखाली कृपया नको. आमचा काळ असा होता नी आता असंय वगैरे छाप जिलब्या कृपया टाळाव्यात.
  • Log in or register to post comments

भुजबळ साहेब!

नावातकायआहे
Wed, 09/29/2021 - 22:15 नवीन
आपण एक फर्मास, ताजोतरार्र, रापचिक मैलाचा दगड लेख लिहावा हि नम्र विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जास्त प्रोत्साहन देउ नका…

गॉडजिला
Wed, 09/29/2021 - 22:39 नवीन
जास्त प्रोत्साहन देउ नका… उगा दिवाळीत एम्पिएसिचा पेपर टाकतील ते… बर्लिन ची भिंत, जागतीक महायुध्द… आप चा उदयास्त वगैरे वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

मिपा

बिपीन सुरेश सांगळे
Mon, 10/11/2021 - 21:42 नवीन
मिपा सर्व सदस्य, दिवाळी अंकासाठी सक्रिय असलेले सभासद , वाचक , लेखक , संपादक मंडळ साऱ्यांना दिवाळी अंकासाठी आत्ताच शुभेच्छा ! सहभागी होऊन मुदतीआधी लेखन पाठवतो आहे . आभार .
  • Log in or register to post comments

अरे व्वा, खुप छान.

चौथा कोनाडा
Mon, 10/11/2021 - 22:20 नवीन
अरे व्वा, खुप छान. +१ तुमचे साहित्य वाचायची उत्सुकता आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपीन सुरेश सांगळे

दिवाळी अंकासाठी एक लेख

श्रीगुरुजी
Tue, 10/12/2021 - 11:24 नवीन
दिवाळी अंकासाठी एक लेख लिहितोय. अंतिम दिनांकापूर्वी देण्याच्या प्रयत्नात आहे.
  • Log in or register to post comments

छान

सुरिया
Tue, 10/12/2021 - 12:53 नवीन
वा. वॉटरगेटसारखे काही वाचनीय मिळणार म्हणजे. छान. मी पण लिहिणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दिवाळी अंकासाठी एक कथा

चॅट्सवूड
Sun, 10/17/2021 - 19:15 नवीन
दिवाळी अंकासाठी एक कथा पाठवली आहे कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

लेख पाठवला आहे.

चित्रगुप्त
Sun, 10/17/2021 - 19:20 नवीन
दिवाळी अंकासाठी सचित्र लेख आत्ताच पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

तुमची जागा पक्की असते हो.

पाषाणभेद
Sun, 10/24/2021 - 19:04 नवीन
तुमची जागा पक्की असते हो. रुमाल टाकून ठेवायची गरज नाही तुम्हाला! खॅ खॅ खॅ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

दिवाळी अंकाच्या संपूर्ण चमूला

अनिंद्य
Tue, 10/19/2021 - 10:49 नवीन
दिवाळी अंकाच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा, अंक वाचण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

कब है दीवाली ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/19/2021 - 10:59 नवीन
वाढीव मुदत वगैरे काही असल्यास कळविणे. लोकांना तसे सांगायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

व्यनि करून लेख पाठविलाय.

श्रीगुरुजी
Tue, 10/19/2021 - 20:31 नवीन
व्यनि करून लेख पाठविलाय.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ ,

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 10/19/2021 - 23:29 नवीन
संपादक मंडळ , मिपा, दिवाळी अंक . सस्नेह नमस्कार . आपल्या सगळ्यांच्या दिवाळी अंकासाठी ' पहिली रात्र ' ही कथा पाठवीत आहे . स्वीकारावी ही नम्र विनंती . खूप आभार आणि खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

>>> पहिली रात्र

पाषाणभेद
Sun, 10/24/2021 - 19:05 नवीन
>>> पहिली रात्र अं...अं...अं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपीन सुरेश सांगळे

वाचून आनंद झाला

जेम्स वांड
Mon, 10/25/2021 - 10:50 नवीन
संपादक मंडळाचे आग्रहाचे पत्र पण मिळाले होते, बरेच दिवस काही लिहिलेले नाही, नोकरी अन इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रच बोकांडी बसल्या होत्या हल्ली हल्ली पर्यंत, असो, ह्यावर्षी वाचन करणार मनसोक्त दिवाळीत. सालाबादप्रमाणे मिपा दिवाळी विशेषांकाच्या आगमनाची उत्कंठा अन त्यातील कंटेंट उत्तमच असणार ही हमी आहेच.
  • Log in or register to post comments

यंदाचा दिवाळी अंक मुक्त स्वरुपात

अनन्त्_यात्री
Mon, 10/25/2021 - 12:28 नवीन
ठेवण्याचा निर्णय आवडला. "थीम" कडे लक्ष्य ठेवून केलेल्या लेखनात जे एक अवघडलेपण असते ते यंदा टाळले जाईल
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

aschinch
Fri, 10/29/2021 - 09:05 नवीन
दिवाळी अंकासाठी एका वेगळ्या विषयावरील लेख पाठवला आहे. संपादकांना आणि वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक १ नोव्हेंबरला

सोत्रि
Mon, 11/01/2021 - 14:54 नवीन
दिवाळी अंक १ नोव्हेंबरला प्रकाशित करण्याचे नियोजन आहे
दिवाळीअंकाची आतुरतेने वाट पाहत आहे. - (मिपाकर) सोकाजी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा