✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुष्ट दुष्ट बायको!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 07/31/2019 - 16:30
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस? मलाच मार! प्रेम तुझ गेलं कुठं!?" :( "जरा पोरांकडे लक्ष दिलं, तर वाटायला लागलं का? सगळ सुटं सुटं!? " "तीच कुठे आहेत फक्त? मीही नाही का तुझा!?" "आहाहाहा !!! लै लाडात आलास रे आज? मी माझा...मी माझा!" "अगे दुष्ट दुष्ट बाई कीती दगड हाणतेस? नाशिक.. नागपूर.. कोल्हापूर.. सोलापूर!!!? काय काय मधे आणतेस?" "तु जरासा बाजूला हो मंजे यातलं का...ही तुला लागणार नाही. आणि काय रे आधीची मी बायको आत्ताच कशी झाले रे बाई!?" "नाही नाही..नाही, तस्स का...ही नाही! शब्द वापरताना चुकून, ज..राशी झाली घाई!" "सोंग बाकी छान घेता, तुम्ही नवरे लोक." "आज सोडणार(च) नाहियेस का? धर की ठोक!धर की ठोक!" "ज्जा! कार्टी शाळेला जायच्येट डबा उचल आणि तु ही पळ!" "ठीक.संध्याकाळी उरलेलं भांडू आता..खा..झोप आणि कमव बळ!" "माझ्यातली बायको गेली.., तर तुझ्यात बाप आण की!?" "तेच म्हटलं..जाता जाता एक तरी हाण की!!!" "किती रे कातडी निबर!????? नवरेपणाचा हा कळस आहे!!!!!!" "नाय गग्गग्गग्ग...मी नव्हे तो कडक पिंपळ, मी साधा मऊ पळस आहे!!!" "कित्ती दुष्ट आहेस रे मेल्या..., हसता हसता रडवलस!" "पण आज मात्र ह्या नवर्यातल्या बापाला तू पढवलंस!" "ज्ज्जा आता लवकर.. आणि लवकर परतंही ये!" "येतो ग सखे लवकर तोपर्यंत थोडी गाई गाई घे!" चला आता मी ही तुमचा, इथेच पूर्ण विराम घेतो. नवर्यामधला बाप, सापडतो का? पाहून येतो! ====०====०====०====०==== अतृप्त...

प्रतिक्रिया द्या
24637 वाचन

💬 प्रतिसाद (27)

झाले का लिहिते पुन्हा बुवा?

यशोधरा
Wed, 07/31/2019 - 16:43 नवीन
तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू!  )
=)) अवांतर: ती अर्धीच राहिली आहे ना म्हणे एक लेखमालिका?
  • Log in or register to post comments

लेखक महोदय अतिशय थोडक्यात व

जॉनविक्क
Wed, 07/31/2019 - 16:47 नवीन
लेखक महोदय अतिशय थोडक्यात व खुसखूशीतपणे फार मार्मिक (टोला) मारतात :)
  • Log in or register to post comments

विडंबन येणार.

कंजूस
Wed, 07/31/2019 - 17:40 नवीन
विडंबन येणार.
  • Log in or register to post comments

दुत्त दुत्त कं का? का? =))

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/31/2019 - 18:29 नवीन
दुत्त दुत्त कं का? का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

:)

इरामयी
Wed, 07/31/2019 - 20:26 नवीन
:) बायकोला वाचायला दिलंत का? "दुष्ट दुष्ट" चं त्यामुळेच "दुत्त दुत्त" झालेलं दिसतंय बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी,

गड्डा झब्बू
Wed, 07/31/2019 - 20:52 नवीन
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी

अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला!

गड्डा झब्बू
Wed, 07/31/2019 - 20:56 नवीन
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

कोडइ कॅनाल वगैरे अजून बरंच काही मिसिंग आहे...

जॉनविक्क
Wed, 07/31/2019 - 21:49 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/31/2019 - 22:51 नवीन
@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही

गड्डा झब्बू
गुरुवार, 08/01/2019 - 01:50 नवीन
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बालभारतीतील कविता आणि धडे

कंजूस
Wed, 07/31/2019 - 20:35 नवीन
बालभारतीतील कविता आणि धडे वाचून उट्ट उट्ट काढणार बाळ याच खफवर. पाळण्यातच कविता ऐकल्यात बाळाने.
  • Log in or register to post comments

ऑं ?

सस्नेह
Wed, 07/31/2019 - 21:55 नवीन
दु दु अगोबाची दु दु बायको कशी काय बॉ झाली ? =))
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/31/2019 - 23:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्तच की

अभ्या..
Wed, 07/31/2019 - 23:19 नवीन
आमच्या गावाचं नाव हाय कवितेत म्हणून मला कविता लै आवाडली.
  • Log in or register to post comments

आमच्याबी गावाचं नाव हाय

श्वेता२४
गुरुवार, 08/01/2019 - 11:28 नवीन
म्हनून मलाबी आवाडली ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

संसारीक काव्य.

पाषाणभेद
Wed, 07/31/2019 - 23:46 नवीन
संसारीक काव्य. बुवा, लईच भारीयेरे हे काव्य! आमालाबी समजायचं शिकीव की.
  • Log in or register to post comments

आवडली आहे ही कविता पण थोडं एक्स्ट्रा लिहिला ही चुकी झाली म्हणायच

गड्डा झब्बू
गुरुवार, 08/01/2019 - 01:55 नवीन
आवडली आहे ही कविता पण थोडं एक्स्ट्रा लिहिला ही चुकी झाली म्हणायची...
  • Log in or register to post comments

संसारीक काव्य लिहा.

कंजूस
गुरुवार, 08/01/2019 - 06:36 नवीन
संसारीक काव्य लिहा. जनतेची मागणी पूर्ण करा
  • Log in or register to post comments

अरे संसार संसार

नाखु
गुरुवार, 08/01/2019 - 07:31 नवीन
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments

सुमार.

नावातकायआहे
गुरुवार, 08/01/2019 - 10:59 नवीन
सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय....
  • Log in or register to post comments

आगोबा मोड

चौकटराजा
गुरुवार, 08/01/2019 - 13:17 नवीन
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?
  • Log in or register to post comments

आगोबांना त्याच्याच गल्लीत

कंजूस
गुरुवार, 08/01/2019 - 13:22 नवीन
आगोबांना त्याच्याच गल्लीत भेटता येईल काय?
  • Log in or register to post comments

ही कवीता

नाखु
गुरुवार, 08/01/2019 - 15:17 नवीन
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वि सू

चौकटराजा
गुरुवार, 08/01/2019 - 17:21 नवीन
वि सू -सदर घारेशास्त्री सभागृहाच्या बाहेर फायर ब्रिगेड गाडीची व्यवस्था केली आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तुमची पण समोरची पार्टी डांबीस

खटपट्या
गुरुवार, 08/01/2019 - 17:10 नवीन
तुमची पण समोरची पार्टी डांबीस निघाली तर.... असो. घरोघरी...
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/03/2019 - 00:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

@सुमार.

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/03/2019 - 13:40 नवीन
@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. Image removed. @
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा