शेजारचा फँड्री !!!

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
26 Feb 2014 - 12:54 pm

फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते. आपल्या मागे कुणीतरी बसलंय आणि त्यांना सिनेमा बघायचा आहे आणि आपला कमनीय देह जरी प्रदर्शनाच्या लायकीचा असला तरी आत्ता मागे बसलेल्या जनतेला ज्यासाठी पैसे मोजलेत तेच बघण्यात रस आहे असे कशाचे ही भान नसते. फँड्री सारख्या एका अतिशय संवेदनशील सिनेमा पाहताना सुद्धा पब्लिकला शेरेबाजी सुचत होती !! काही वेळाने अत्यंत असबंध आणि हिडीस शेरेबाजी सुरु झाली. मला खूप आश्चर्य वाटते. म्हणजे मॉल मधल्या चकचकीत सिनेमागृहात कशी काय बुवा अशी मंडळी असतात ! दरडोई २००-३०० रुपयेचे तिकीट काढणारी मंडळी आणि गावात बाल्कनीत पायाखाली जागोजागी ठिपक्याठिपक्यांची आणि धब्ब्याधब्ब्याची रंगावलेली थुंकी चुकवत मार्ग काढत ढेकुण असणा-या खुर्च्यांवर बसायला लागायचे त्या थेटरातली मंडळी यांच्या मध्ये काहीच फरक नसतो का ? फँड्रीत शिट्टी मारण्यासारखे काहीच नाई बरं का. पण मध्येच कुणीतरी शिट्टी वाजवतो !! पण मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून सिनेमाच्या सगळ्या बाबींमध्ये - म्हणजे कथा, कास्ट, लोकेशन्सची निवड त्याचा रिलेव्हन्स, एडिटिंग, छायाचित्रण वगैरे मध्ये सॉलिड घुसलो होतो. बायकोला मी एवढ्या तन्मयतेने सिनेमा बघतो हे सहनच होत नाही- पण हल्ली ती बिचारी काहीही करू शकत नाही. मुकाट्याने सिनेमा बघते. घरी गेल्यावर मग चर्चा सुरु करते - तेही माझ्यातला सिनेमा उतरलाय का ते चेक करून !! फँड्रीचे छायाचित्रण अ-प्र-ती-म आहे. जब्याच्या स्वगतावर मी बच्चनच्या सिलसिला मधल्या स्वगतापेक्षा फिदा आहे. एकूण सिनेमाची निरागसता बेमालुम जपलीय. मी खूष होतो सिनेमा बघताना. पण एवढे करून माझी समाधी भंग झालीच … मला एकसारखा कसला तरी दुर्गंध येत होता …. दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण थोड्यावेळाने डोकं भणभणायला लागले. बायकोला आश्चर्याचा धक्का. मी तिच्याशी भर सिनेमा सुरु असताना काहीतरी बोललो. तिला विचारलं तिला कसला वास येतोय का ? त्या वैतागात मी थोड्या मोठ्यानेच बोललो कारण बहुदा आजुबाजूच्यांना ते ऐकू गेल्याचे जाणवले !! खुर्चीच्या आजूबाजूला इकडे तिकडे हलून फिरून फिरवून सगळी कडे बघितले काही सांडलंय का !! माझ्या सिनेमा बघण्याची एव्हाना वाट लागली होती. हालचाल थांबवून थोडा शांत होऊन सिनेमाकडे लक्ष राहू देण्याचा आटापिटा चालु ठेवला. आणि एकदम ट्यूब पेटली. मांडी घालुन गुपचूप बसलेल्या शेजारच्याला विचारले " काहो तुमच्या सॉक्सचा वास येतोय का ? मांडीखालची पावले बुडाखाली जोरात दाबत तो म्हणाला " हो " !!

समाजराहणीशिक्षणचित्रपटप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियाअनुभवसल्लासंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

वेताळ's picture

26 Feb 2014 - 1:00 pm | वेताळ

सॉक्सचा वास म्हटला कि डोके उटते... पण हे लोक सॉक्स सार्वजनिक ठिकाणी काढायला जर देखिल कचरत नाहीत.

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 1:15 pm | आत्मशून्य

हसु नका हो ते व्यथा मांडत आहेत. ;) नायतर फँड्रीत शिट्या मारणार्‍यांच्यात अन आपल्यात काय फरक राहीला ?

फँड्री बघतनाच कसाकाय अनेकोंना लेख लिवण्या इतपत त्रास होतो... की आम्ही फँड्रीलाच दाद देणारे आहोत याचे प्रदर्शन विषश सयुक्तिक असते ? कोणाला चेन्नै एक्सप्रेस / जय हो बघताना असा त्रास झाला तर सॉक्सचा दुरगंध सुगंधात बदलल्याचा अनुभव आहे काय ? त्याबद्दल का विषेश लेखन होत नाही ? :(

सुधीर मुतालीक's picture

26 Feb 2014 - 2:05 pm | सुधीर मुतालीक

मला तुमची प्रतिक्रीया खुप आवडली.

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 2:07 pm | बॅटमॅन

=))

प्रतिसाद आवडला.

मारकुटे's picture

26 Feb 2014 - 2:07 pm | मारकुटे

३०० रु तिकिट काढुन फँड्री पाहिलात तर... समजले.