मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माय मराठीचे श्लोक...!!

गंगाधर मुटे ·

प्रकाश१११ 27/02/2011 - 09:34
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी! तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!! तुझे शब्दलालित्य सूरास मोही

धमाल मुलगा 28/02/2011 - 19:47
अभय" एक निश्चय मनासी करावा ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा सदा शब्द वाणीत ये सर्वकाली घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अगदी अगदी!!! मनापासून पटलं. अगदी आवडलं.

गंगाधर मुटे 27/02/2013 - 18:35
श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला

माझी मराठी माऊली : ओवी

गंगाधर मुटे ·

प्रकाश१११ 27/02/2011 - 09:38
गंगाधर मुटेजी- माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ चान ओवी

मनराव 09/03/2011 - 12:29
मस्तच, अप्रतिम........ त्यात >>माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ ...॥४॥ हे विशेष अवडले.....

माझी मराठी माऊली : ओवी माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!

' मराठी भाषा दिना ' निमित्त-

विदेश ·
मराठीच वाचू मराठीत बोलू - मराठी लिहूनी आनंदात डोलू ! मराठी मराठी जी माझीच माय - कशी विसरू सांगा दुधावरची साय ! परीसामुळे होई लोखंड सोने - मराठी असे जीवनी साज-लेणे ! उतू नका आणि मातू नका हो - मराठी वसा तुम्ही टाकू नका हो ! मी मातृभाषाभिमानी रहावे - जगाने शहाणे मराठीत व्हावे ! मिरवणार झेंडा मराठी सदा मी फडकणार उंचावरी तोच नेहमी !!

समिधाच सख्या या...

अवलिया ·

ज्ञानेश... 27/02/2011 - 09:34
कुसुमाग्रजांना सादर, सप्रेम अभिवादन ! "... नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे !"

पैसा 27/02/2011 - 11:37
कुसुमाग्रजांची प्रत्येक कविता सुंदर. बरोबरचं निरुपणही आवडलं.

sneharani 28/02/2011 - 10:10
सुरेखच...! अप्रतिम! मस्त ! शब्दसामर्थ्य आवडले. :)

छोटा डॉन 28/02/2011 - 10:14
फारच मस्त लेख आणि त्याहुन निवडलेल्या काव्य तुकड्यांची निवड व त्याचे निरुपण फारच सुंदर. शब्दकळांनी लेख अक्षरशः सजलेला आहे. ह्या सुंदर लेखाबद्दल नानासाहेबांना धन्यवाद. - छोटा डॉन

असुर 01/03/2011 - 05:17
नाना, कवितांचं सिलेक्शन अप्रतिम! त्यावरचं भाष्यदेखील सुरेख आणि वैशिष्ठ्यपूर्ण! आणि ज्या काव्यसूर्याने या कविता लिहील्यात, त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याची माझी लायकीच नाही! त्यांना शीरसाष्टांग प्रणाम! शिणलेल्या झाडापाशी बिजली आली म्हणाली, मिठीत येऊ का ? झाडाचं मौन सुटलं अंगाअंगातुन होकारांच तुफान उठलं. खल्लास! शहारा आला अंगावर! कसलं खतरनाक आहे हे कडवं! --असुर

मनीषा 01/03/2011 - 20:53
सरस्वतीची पूजा करायला मोठमोठे हारतुरेच हवेत असे नाही. अगदी खरं ... पण तुम्ही वाहिलेलं फुल सुद्धा खूप सुंदर आहे . आणि निवडलेल्या कविताही अप्रतिम !

राम राम मंडळी आज २७ फेब्रुवारी. वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील. ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल.

सुधारक सावरकर

विकास ·

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार समग्र कधीतरी वाचायचे बरेच दिवस म्हणतो आहे. पण ही झलक छान वाटली. शब्दप्रामाण्य न मानणारा, विज्ञानावर नितांत निष्ठा ठेवणारा, कणखर व सडेतोड बोलणारा अशी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहाते. आगरकरांची सुधारकी विचारसरणी व टिळकांचा निर्भीडपणे स्वराज्य मागण्याचा आग्रह या दोन्हीचा संगम दिसतो. अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था काही प्रमाणात खिळखिळी झाली आहे (पूर्ण गेली नाही हे माहीत आहे). आज सनातनी असते तर तथाकथित शूद्रांमुळे इंटरनेट विटाळते असं म्हणाले असते. तसं कोणी म्हणत नाही, सेलफोन घेताना जात दाखवावी लागत नाही हेही नसे थोडके. आजारी पडल्यावर भोंदू बाबांकडून मंत्र म्हणून घेण्याऐवजी परिणामकारक औषधं घेण्याचं प्रमाण वाढलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पंगा 27/02/2011 - 05:30
आज सनातनी असते तर तथाकथित शूद्रांमुळे इंटरनेट विटाळते असं म्हणाले असते. तसं कोणी म्हणत नाही
नक्की? कदाचित "शूद्र"करिता काही नवी, वेगळी, पोलिटिकली करेक्ट (किंवा नॉट-सो-पोलिटिकली-करेक्ट) टर्म वापरून असे करणे अगदीच अशक्य असावे काय?

In reply to by राजेश घासकडवी

अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो. हो. पण यापैकी परिस्थितीच्या ताणतणावामुळे ( जसे - रोज हपिसात गेल्यावर परजातीय सहकार्‍याबरोबर जेवणे किंवा अशाच प्रकारे घराबाहेर पडून सगळ्यांबरोबर वावरल्यामुळे घडून येणारी आंतरजातीय लग्नं या परिस्थितीच्या रेट्यामुळे घडलेल्या सुधारणा होत ) मोडून पडलेल्या अंधश्रद्धा किती आणि अज्ञान दूर होउन शहाणे झाल्यामुळे नष्ट झालेल्या अंधश्रद्धा किती हे मोजून पाहिले पाहिजे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, वाढते शहरीकरण यांमुळे लोकं घराबाहेर पडले, एकमेकांमध्ये मिसळले, स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आणि त्यामुळे का होईना अनेक खुळ्या कल्पना नष्ट झाल्या. हे चांगलेच झाले. पण अज्ञान दूर होउन शहाणे होण्याची प्रक्रिया घडायला हवी होती त्या प्रमाणात घडली नाही. म्हणूनच तर शिकलेल्या लोकांमधीलसुद्धा अंधश्रद्धा ठायी ठायी दिसतात. जसे - गणपतीने दूध पिणे, नाडी पट्टी इत्यादी. त्यामुळे त्याकाळापेक्षा आज कमी प्रमाणात अंधश्रद्धा दिसतात ही काही फार कमेंडेबल गोष्ट नाही असे वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 27/02/2011 - 19:43
आगरकरांची सुधारकी विचारसरणी व टिळकांचा निर्भीडपणे स्वराज्य मागण्याचा आग्रह या दोन्हीचा संगम दिसतो. मला माहीत आहे की आपल्याला जे वाटले ते आपण लिहीले आहे. पण गंमत म्हणजे १९४७ साली लिहीलेल्या "माझ्या आठवणी" मध्ये सावरकर लिहीतातः
राजकारणात टिळक, चिपळूणकर हे आमचे गुरू, समाजकारणात रानडे, आगरकर हे आमचे गुरू. त्या उभयंतांच्या मतांचा यथाशक्य समन्वय हे आमचे धोरण...
अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो. सहमत आहे. पण कधी कधी वाटते स्वरूप बदलत आहे. तुर्त वेळेअभावी इतकेच म्हणतो.

नगरीनिरंजन 27/02/2011 - 09:09
सावरकरांचे विचार त्या काळात तर क्रांतीकारी होतेच पण ते अजूनही बरेच टोकाचे वाटावेत हे दुर्दैव आहे. पण त्यांच्या सुधारणावादी आणि बुद्धीनिष्ठ विचारांचा गोषवारा मांडणारा हा लेख आवडला.

नितिन थत्ते 27/02/2011 - 10:34
विज्ञाननिष्ठ निबंधांची पारायणे १५-२० वर्षांपूर्वी केली होती. त्यातील विचार कदाचित तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे ही असतील परंतु विचार करण्याची दिशा योग्य होती यात शंका नाही. (रोचक विरोधाभास: सदर निबंधलेखन + रूढीभंजनाचे कार्य सावरकरांनी १९२३-३७ या काळात केले. या काळातल्या लेखात "जेथे थोडेफार स्वराज्य आहे तेथेच सुधारणा होतात" असे सावरकर म्हणतात. तर त्याच्या तीसएक वर्षे आधी "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालू आहेत" असे टिळक म्हणतात. ब्रिटिश आमचा धर्म बुडवणार अशा समजापासून ३० वर्षांत क्रमाने ब्रिटिशांना आमचा धर्म सुधारण्यात खरोखरचा रस नाही असे रिअलायझेशन आले असावे).

In reply to by नितिन थत्ते

विकास 27/02/2011 - 22:32
त्यातील विचार कदाचित तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे ही असतील परंतु विचार करण्याची दिशा योग्य होती यात शंका नाही. सहमत. म्हणूनच सावरकर म्हणतात की कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाही, ती वर्तमानातील विज्ञानाच्या कसोटीला जर उतरली तर योग्य. त्यासंदर्भात त्यांचे अनुवांशिकतेसंदर्भातील काही मुद्दे वैज्ञानिकदृष्ट्या आज कदाचीत पटणार नाहीत पण ते ज्या संदर्भात आहेत (जातीयता आणि जातीभेद) ते आजही पटणारेच आहे. तर त्याच्या तीसएक वर्षे आधी "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालू आहेत" असे टिळक म्हणतात. टिळक या शब्दात म्हणाले होते का आणि कशाच्या संदर्भात ते पहायला हवे. त्यांचा आणि आगरकर/सुधारकांचा जो वाद होता तो, "घर आधी मिळवून साफ करायचे" का "घर साफ केले की ते आपोआप मिळेल" या संदर्भात. अर्थात "सुधारणा केल्या की लोकं आपोआप स्वातंत्र्यासाठी तयार होतील आणि मिळवतील" का "स्वातंत्र्य मिळाल्यावर सुधारकांना (आणि समाजाला) समाजसुधारणा करणे योग्य" असा होता. सावरकरांनी दिलेल्या उदाहरणात असेच दिसते की जिथे जिथे जे काही स्वातंत्र्य आहे तेथे सुधारणा करणे शक्य झाले. अर्थात टिळकांच्या मताशी विरोधाभास नसून त्यांचा मुद्दाच त्यात सिद्ध झाला असे दिसते. त्याव्यतिरीक्त अजून या संदर्भात सावरकर टिळकांच्याबद्दल अजूनही बोलले आहेत. पण ते नंतर वेळ मिळाला की लिहीन.

जागतिक मराठी दिनानिमित्य "सावरकरांची विज्ञानदृष्टी' हाच विषय घेण्यात तुम्ही जे औचित्य दाखविले ते नोंदविण्यासारखे आहे. खुद्द सावरकरांनी मराठी भाषेला आपल्या वाङ्मयानेदेखील जो देखणेपणा दिला आहे त्याची पारायणे शालेय अभ्यासक्रमात होणे नीतांत गरजेचे होते, पण होते असे की सावरकरांची राजकीय मते (त्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही...) सत्ताधार्‍यांना कधीच पटली नसल्याने त्यांच्या वाङ्मयीन लिखाणावरही (ते खणखणात नाणे असूनही) शिक्षण खात्यातील 'रावसाहेबां'ची सातत्याने वक्र नजर पडली आहे. आज सावरकर म्हणजे 'सागरा प्राण तळमळला....' इतपतच विद्यार्थ्यांना माहीत असते, पण त्याचबरोबर वर धाग्यात उल्लेखलेली त्यांच्या विज्ञानदृष्टीबद्दल आज शालेय तर राहू देच पण अगदी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या किती युवकयुवतींना माहिती असेल? [ज्याना असेल ती त्याना वर्गखोल्यातील शिकवणीतून नक्कीच मिळाली नसणार, याबद्दलही खात्री आहेच.] हे तर सर्वानाच माहीत आहे की सावरकर गीता-वेद-उपनिषदे यांचे महत्व जाणत होते, पण त्याचवेळी त्यानी असेही म्हटले आहे की, "पाच हजार वर्षांपूर्वीच्या पोथ्यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता आम्ही जर अद्ययावत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून न घेतली तर आपले हिंदू राष्ट्र व हिंदू धर्मही पाच हजार वर्षंइतकाच मागासलेला राहून या विज्ञानाच्या टकराटकरीत आपण टिकाव धरू शकणार नाही..." हा विचार १९३५ सालातील...आणि आज १०० वर्षे होत आली...विचारातील ताजेपणा कायम राहिला आहे. "...सावरकरांसारखे परखड आज भरपूर आहेत. तरी देखील, अंधश्रद्धा आहेच, धर्मांधता आहेच.. मग हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे का अजून काही?..." ~ परखड असतील आजही, पण 'सावरकर' करिष्मा नसलेलेच सर्व़जण असल्याने त्यांची याबाबतीतील शिकवण अरण्यरुदन ठरत आहे. 'धर्मांधता' तर कधीच नष्ट होणार नाही या देशातून, फक्त अंधश्रद्धाच्याबाबतीत काही करता येईल असे वाटले की पुढे लगेचच अमावास्येला काळा दोरा, बिब्बा, लाल मिरची, लिंबू आपल्या कारला, टू व्हीलरला बांधून 'भुताची नजर' पडू नये म्हणून नारळ वाढवून सायन्स कॉलेजमधील प्रॅक्टिकलला चाललेला युवक दिसतो. त्यामुळे आता वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर मर्यादा ह्या पडतातच....! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 27/02/2011 - 21:37
>>~ परखड असतील आजही, पण 'सावरकर' करिष्मा नसलेलेच सर्व़जण असल्याने त्यांची याबाबतीतील शिकवण अरण्यरुदन ठरत आहे. ..... करिष्मा असलेल्या सावरकरांचेही हे म्हणणे तत्कालीन समाजधुरीणांना मान्य नव्हतेच. आजही या कारणासाठी सावरकरांना मानणारे थोडेच असतील.

पैसा 28/02/2011 - 10:47
आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. २६ तारखेला सावरकरांचा निर्वाण दिन होता. हा लेख दोन्ही दिवसांसाठी अत्यंत समयोचित असा झालाय. धन्यवाद!

आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- “Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा!

क्रांतीकवी कुसुमाग्रज

सर्वसाक्षी ·

शुचि 27/02/2011 - 04:25
माझी आवडती कविता - अहि-नकुल. सर्पाच्या सौंदर्याचे, सामर्थ्याचे विलक्षण प्रभावी वर्णन या कवितेमध्ये आहे. शेवटी मुंगसाचा सर्पावरती विजयच दाखविला आहे. कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते, कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते. मार्गावर याच्या लवत तृणाची पाती पर्णावर सुमने मोडुनी माना पडती थरथरती झुडुपे हादरती नववेली जग गुलाम सारे या सम्राटापुढती. चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद ! अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद, टाकली यमाने कट्यार वा कनकाची चालली बळींचा वेध घेत ही धुंद. वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली, थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य चालला मृत्युचा मानकरीच महान ! _________________________________________________ कोलंबसाचे गर्वगीत किती सुंदर कविता आहे. "“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!” ही ओळच किती वीरश्रीपूर्ण आहे. _________________________________________________ ८ वीमध्ये त्यांचा "जीवनलहरी" हा काव्यसंग्रह वाचला आणि इतका सुंदर वाटला, इतका आवडला की डोळ्यातून धारा लागलेल्या आठवतात. पुढे "विशाखा" वाचला. कुसुमाग्रज माझे अत्यंत आवडते कवी आहेत.

सहज 27/02/2011 - 08:37
नुकत्यात मध्यपूर्व आशीयामधे उन्मत्त सत्ताधीशांच्या विरोधात उसळलेल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचताना अजुनच आवडले. साहीत्याच्या माध्यमातुन अश्या तेजस्वी कवितातून, स्वातंत्र्य संघर्षाला अजुनच धार येते. म्हणूनच बहुदा मदांध तालीबानी हे ललित साहीत्याचे वावडे असणारे असतात.

कलंत्री 27/02/2011 - 09:40
सर्वसाक्षींच्या ओघवत्या लिखाणातून हे सर्व वाचतांना अंगावर रोमांच आले. त्या काळातील साक्षीदार जरी होता आले नाही तरी त्या काळानंतर त्याचे रसास्वाद आणि महत्त्व वाचता आले त्याचे भाग्य मम मनाला हेही समजले. कालच बालगंधर्वात काव्यवाचनाचा ऐकण्याचा आनंद घेतला, धुंदी चाखली, आज परत तोच प्रत्यय आला. साक्षीचे विशेष आभार.

ह्जार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या सागरा डळमळू दे तारे | विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशाकोन सारे || ही खासच कविता आहे. थोर कवीला विनम्र अभिवादन.

धमाल मुलगा 28/02/2011 - 19:53
अप्रतिम! साक्षीदेवा, कुसुमाग्रजांचे आम्हा पामरांवर हेदेखील एक उपकारच म्हणायला हवे. इतका सुंदर लेख लिहिण्याची तुम्हाला उर्मी मिळाली आणि आम्ही वाचक धन्य झालो. :) कुसुमाग्रजांच्या क्रांतीकाव्यपंक्ती आणि त्यावरचं भाष्य आवडलं हे.वे.सां.न.ल. :)

आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्‍या आणि आपला ठसा उमटविणार्‍या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच.