मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी दिन

माय मराठीचे श्लोक...!!

गंगाधर मुटे ·
विशेष
Taxonomy upgrade extras
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला

माझी मराठी माऊली : ओवी

गंगाधर मुटे ·
विशेष
माझी मराठी माऊली : ओवी माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!

' मराठी भाषा दिना ' निमित्त-

विदेश ·
विशेष
मराठीच वाचू मराठीत बोलू - मराठी लिहूनी आनंदात डोलू ! मराठी मराठी जी माझीच माय - कशी विसरू सांगा दुधावरची साय ! परीसामुळे होई लोखंड सोने - मराठी असे जीवनी साज-लेणे ! उतू नका आणि मातू नका हो - मराठी वसा तुम्ही टाकू नका हो ! मी मातृभाषाभिमानी रहावे - जगाने शहाणे मराठीत व्हावे ! मिरवणार झेंडा मराठी सदा मी फडकणार उंचावरी तोच नेहमी !!

समिधाच सख्या या...

अवलिया ·
विशेष
राम राम मंडळी आज २७ फेब्रुवारी. वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील. ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल.

सुधारक सावरकर

विकास ·
विशेष
आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- “Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा!

क्रांतीकवी कुसुमाग्रज

सर्वसाक्षी ·
विशेष
आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्‍या आणि आपला ठसा उमटविणार्‍या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच.