मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी मराठी माऊली : ओवी

गंगाधर मुटे · · विशेष
विशेष
माझी मराठी माऊली : ओवी माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!! ...॥३॥ माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ ...॥४॥ माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग ...॥५॥ माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई दिसे माऊली शोभून, सार्‍या जगताची आई ...॥६॥ गंगाघर मुटे "अभय" ....................................................................... सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ......................................................................

वाचने 2766 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रकाश१११ 27/02/2011 - 09:38
गंगाधर मुटेजी- माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ चान ओवी

मनराव 09/03/2011 - 12:29
मस्तच, अप्रतिम........ त्यात >>माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ ...॥४॥ हे विशेष अवडले.....