' मराठी भाषा दिना ' निमित्त-
विशेष
मराठीच वाचू मराठीत बोलू -
मराठी लिहूनी आनंदात डोलू !
मराठी मराठी जी माझीच माय -
कशी विसरू सांगा दुधावरची साय !
परीसामुळे होई लोखंड सोने -
मराठी असे जीवनी साज-लेणे !
उतू नका आणि मातू नका हो -
मराठी वसा तुम्ही टाकू नका हो !
मी मातृभाषाभिमानी रहावे -
जगाने शहाणे मराठीत व्हावे !
मिरवणार झेंडा मराठी सदा मी
फडकणार उंचावरी तोच नेहमी !!
वाचने
1280
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
विदेशां -
मराठी मराठी जी माझीच माय -
कशी विसरू सांगा दुधावरची साय !
परीसामुळे होई लोखंड सोने -
मराठी असे जीवनी साज-लेणे !
आवडले.छान!!
विदेशां - मराठी मराठी जी