Skip to main content

काम हे काम असतं!

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 17/09/2018 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला मी: हॅलो क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय. मी: ओके चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :( काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला. ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही. आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला! मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ?

टैम्पास

लेखक लौंगी मिरची यांनी रविवार, 16/09/2018 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारी उन्हाच्या झळया खात एकाच लाइनीत जवळ्जवळ आम्हि ६ जनी बसलो होतो . गावाला एकतर बसण्याची सोय नसते . रस्त्याच्या कडेला येणार्या जाणार्यांकडे बघत बसावच लागतं . पर्याय नसतो . माझ्या शेजारी माझी वहिनी तिच्या बाजुला काकु आणि तिच्या शेजारी तिचीच मावस बहिन . तिने तर दर दोन मिनिटाला पूढे सरकुन सरकुन पार रस्ता गाठत आणला , तरी आम्हि त्याच जागी . अवघडुन गेलो होतो पार , पण काकु काहि केल्या जागची हलेना , एकाच जागी बसुन ढिगारेच्या ढिगारे बनवले तिने . समोर शाडुची माती होती ना , मग काय बसल्या बसल्या टाइमपासच कि . आजुबाजुला आतापर्यंत भयाण गर्दी झालेली . उन्हामुळे पोटात कालवाकालव झाली होती .

लेले आनंदले

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 16/09/2018 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी.

" तेथे कर माझे जुळती ! ! "

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी रविवार, 16/09/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :- या संदर्भात नुकताच " TIME " ( २४ सप्टेंबर २०१८ चा ) या प्रसिध्द मासिकात आलेला एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेचे ३९ वे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची निवड झाली होती, ते माननीय श्री.

तीन देवियां - भाग ३

लेखक Prakashputra यांनी रविवार, 16/09/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा भाग इथे वाचा : https://www.misalpav.com/node/43245 माझ्या पहिल्या प्रेमभंगाचे दुःख अजून ताजे होते, मी त्यातून नुकतेच सावरायला लागलो होतो. त्यावेळी मी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. जुनमध्ये वर्ष नुकतेच चालू झाले होते आणि मला लगेचच सप्टेंबरमध्ये कॅंपस इंटरव्यू मधून Reliance मध्ये नोकरी लागली होती, त्यामुळे थोडा रिलॅक्स होतो. त्यानंतर लगेचचीच गोष्ट, एकदा आम्ही सगळे मित्र रस्त्यावर टवाळी करीत फिरत होतो . नुकतेच गणपतीचे दर्शन घेऊन झाले होते. तेवढ्यात एक मुलींचा ग्रुप जाताना दिसला, मग काय आम्ही त्यांच्या मागे चाललो, आणि मला ती दिसली. गर्र्कन मान वळवून बघावी अशी नव्हती, पण जसे जास्त वेळा बघावे तशी जास्त आवडेल अशी होती. छान स्टेप कट होता , केस मानेच्या खालीपर्यंत रुळत होते, आणि खूप सहज आणि सुंदर हास्य होते. मी जसे जास्त बघितले तशी ती मला आवडत गेली. कुठेतरी हृदयात Click झाले कि हीच माझी राणी ( तसे त्याकाळात मला बरेचदा Click व्हायचे, पण हे फीलिंग जरा जास्त तीव्र होते ). मी पुढे जाऊन नाव विचारायचे ठरवले, पण तेवढ्यात मित्रांची काहीतरी गडबड झाली आणि ती तेवढ्यात गायब झाली. मी लगेच खूप शोध घेतला, पण त्या रात्री तरी ती गायबच झाली. मग मी तिचा शोध घ्यायचे ठरवले.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 16/09/2018 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.