गवत्या
गवत्या
जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या होत्या आणि त्याखाली घंटांचा, घुंगरांचा ढीग होता.
मिसळपाव