Cold Blooded - ५
Cold Blooded - Final - ५
हवालदार माधोसिंग चांगलाच वैतागला होता!
गेल्या दोन रात्रींपासून वसंत विहार परिसरातल्या एका बंगल्यावर नजर ठेवण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. रात्री नऊ वाजल्यापासून तो या ड्यूटीवर हजर झाला होता. सुरवातीचे दोन तास त्याने फूटपाथवर चकरा मारत घालवले होते. कंटाळा आल्यावर तो गाडीत येऊन बसला होता. आदल्या दोन रात्रीही त्याने त्या बंगल्यावर पहारा ठेवलेला होता. पहिल्या दिवशी तिथे येण्यापूर्वी बंगल्यात राहणार्या माणसाचा फोटो कोहलींनी त्याला दाखवला होता. गेल्या दोन रात्रीत त्या माणसाव्यतिरिक्तं कोणीही आलं-गेलेलं त्याने पाहिलेलं नव्हतं.
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...
बघता मानस होते दंग ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...
किनारी रस्त्याने कुणकेश्वरला फिरून आल्यानंतर दुस-या दिवशी सगळ्यांसोबत थोडं फिरलो. सायकल सोबत नसताना देवबाग बीच व तारकर्ली बीच बघितला. वेळेच्या अभावी सायकलवर अन्य कुठे जाता आलं नाही. निदान देवगड- आचरा बीच तरी जायची इच्छा होती. त्या रूटवर बीचबरोबर कोंकणातल्या आतली खेडेगावं दिसली असती. पण ते शक्य झालं नाही. बायको व मुलगी सोबत असल्यामुळे परतीच्या प्रवासात किमान गगनबावडापर्यंत जाण्याचीही इच्छा अपूर्ण राहिली. त्यांच्यासोबतच जावं लागलं.
मुक्तछंद
विसरलेल्या आठवणी वा नकळत निसटून गेल्या क्षणांचा मोह कधी परतून एकांतात एखादा विराग सूर छेडून मनाला वाऱ्याबरोबर हलके करेल वा एखाद्या ओल्या कापसाच्या ओझ्याप्रमाणे भारी करेल हे सहसा सामान्य बुद्धीच्या पालिकडे! कदाचित काळाला खुणगाठ बांधता आली असती वा एखादा क्षण मोरपिसाप्रमाणे वा त्या पिंपळाच्या पानाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात राखता आला असता तर नक्कीच सुखकर झाले असते.
Cold Blooded - ४
Cold Blooded - Final - ४
रोहित सिमल्याला पोहोचला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. सिमल्याला पोहोचल्यावर त्याने ताबडतोब रोशनीचं कॉलेज गाठलं. जीन्स - टी-शर्ट आणि पाठीवर मोठी सॅक अशा अवतारात असलेला हा तरुण पोलीस अधिकारी असेल यावर कॉलेजच्या स्टाफचा आधी विश्वासच बसेना. रोहितने आपलं आयकार्ड त्यांच्यासमोर ठेवल्यावर अखेर त्यांची खात्री पटली! रोशनी द्विवेदीबद्दल त्याने चौकशी करताच तिचं सर्व रेकॉर्ड त्यांनी त्याच्या पुढ्यात ठेवलं. द्विवेदींच्या घरी मिळालेल्या सर्टीफिकेट्सप्रमाणे रोशनीने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, पण तिचं कॉलेजमधलं रेकॉर्ड काही वेगळंच सूचित करत होतं.
तुम्हाला आपारपी, लिंगोरच्या, रूमाल पाणी, डब्बा ऐसपैस, ईश्टोप पलटी शब्द आठवतायेत?
काल श्रीहरीकडे पावभाजीसोबत गप्पागोष्टी सुरु होत्या. गप्पात बालपणातल्या खेळांचा विषय आला. कर्मधर्मसंयोगाने आभासी दुनियेतल्या मिमिवर देखील त्याच गप्पा रंगल्या होत्या.
Hide and Seek म्हणजे लपाछपी हा तर राष्ट्रीय खेळ असल्यासारखा फेमस. अजूनही तितकीच बालप्रियता टिकवून आहे. आपल्या वेळेला डबा ऐसपैस् होतं. करवंटी, डवा लांब फेकायचा, तो आणेपर्यंत आपण लपायचं.
गल्लीत देवीच मोठ मंदिर,. नवरात्रीत संपूर्ण गल्लीत मांडव टाकलेला असतो. त्या वेळी खांबखांबोळी पेश्शल. खांब असणाऱ्या देवळात कधी ताकतुंबा खेळलाय? तसंच झाड पकडून ? प्रत्येकाने खांब पकडून उभा रहायचे आणि एकावर राज्य.
श्रद्धा: मी अनुभवलेली
मी सूतक हि कथा प्रकाशित केल्यावर त्यावरून बरीच चर्चा झाली. खरतर आस्तिकता, मूर्तिपूजा एवढंच काय तर नास्तिकता हा सुध्दा आपल्यातला "श्रद्धेचा" विभाग. त्या ससंदर्भातच माझ्याच घरी झालेला या वेळच्या गणपती उत्सवातील एक प्रसंग:
या गणपती उत्सवातली गोष्ट, माझा मुलगा वेदांत हा सात वर्षाचा आहे., मागल्या वर्षी पर्यंत तो कधी गणपती उत्सव किंवा बाकीच्या इतर सणांमध्ये एवढा भाग घेत नसे कारण त्याच सगळं लक्ष खेळण्यांमध्ये किंवा खाऊमध्ये असायचं पण या वर्षी पासून मात्र मी त्याला न चुकता मूर्ती कशी निवडायची, आरास कशी करायची या सगळ्यात भाग घ्यायला लावला.
दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील.
ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का?
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण
बघता मानस होते दंग ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण
१२ सप्टेंबरला सायकल चालवता आली नाही. बायको व मुलीला आणायला कोल्हापूरला जावं लागलं. त्यामुळे सायकल प्रवासातला आणखी एक दिवस कमी झाला. आता फक्त एकच दिवस सायकल चालवू शकेन. आत्या व इतर जण आल्यामुळे ह्या शांत घरामध्येही आता उत्साहाचं वातावरण आहे. आता थोडं ठीक वाटतंय. जुन्या आठवणी आहेतच आणि अदू आल्यामुळे नवीन आठवणी तयार होत आहेत. हे फार्म हाऊस समुद्र किना-यापासून नऊ किलोमीटर दूर आहे. पण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना व मोठ्या पावसात त्याची गर्जना इथपर्यंत ऐकू येते! ह्यावेळी मोठा पाऊस असता तर ती संधीही मिळाली असती!
मिसळपाव