प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास
प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास
इसवी सन २०१८ची सुरुवात महाराष्ट्रात एका दंगलीने झाली. भीमा कोरेगावला असलेल्या विजयस्तंभाला २०० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात वाद उसळले आणि अर्थातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या.
त्याआधीच्या रात्री शनिवारवाड्यासमोर एल्गार परिषद भरली होती. ह्या परिषदेतील भाषणांवर आक्षेप घेणारी तक्रार अक्षय बिक्कड आणि तुषार दामगुडे ह्या दोन तरुणांनी पोलीस ठाण्यात केली होती.
मिसळपाव