Skip to main content

मुद्रणपूर्व साहित्यकाल

लेखक अलकनंदा यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H मुद्रणपूर्व साहित्यकाल मुद्रणकलेचा इतिहास बघायचा झाला, तर बहुतेक दोनएकशे वर्षांइतका मर्यादित असावा. तरीही, काळाची गती आणि गरज ह्यांच्याशी जुळवून घेत मुद्रणाची कला जन्म पावून पुढे चांगलीच विकसत आणि आधुनिक होत गेली. आता तर डिजिटल लिखाणाचा जमाना आहे, म्हणजे कागदावरील मुद्रणही मागे पडल्यात जमा होत आहे. मग मुद्रणपूर्व काळात साहित्याचा आणि ज्ञानाचा प्रसार, निर्मिती होतच नव्हती का? मुद्रणाच्या आधीही भाषा, लिपी हे सारे अस्तित्वात होतेच की.

दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

फार फार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या निबिड अरण्यात भटकायला गेलो होतो. ठिकाण नेमकं विस्मरणात गेलंय. कदाचित सुधागडच्या पायथ्याचं धोंडसं असावं, तिकोना पेठ असावी, घनगडाच्या आसपासचं येकोले असावं, ताम्हिणीतल्या विंझाई मंदिराचं आवार असावं किंवा थेट रतनवाडी. तेव्हाचे ट्रेक बर्‍याचदा मुक्कामी असत. कारण वाहतुकीच्या सुलभ साधनांची कमतरता. एसटीवरच अवलंबून राहावं लागत असे.

क्र क्रोएशियाचा!

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H

क्र क्रोएशियाचा!

काही महिन्यांपूर्वी पिताश्रींनी हसत-हसवत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत. आप्त-मित्र-परिवार आणि त्यांचे प्रियपात्र विद्यार्थी जमले. दृष्ट लागेल असा समारंभ झाला. साखरतुला, सत्कार, ७५ दिव्यांनी ओवाळणी-औक्षण, देणग्या, केक, शॅम्पेन, पार्टी सगळे सगळे झाले. आनंदलेला दिवस मजेत निघून गेला आणि रात्री उशिरा सत्कारमूर्ती म्हणाले - "मला हवे ते गिफ्ट मिळाले नाहीच अजून!"

इझी, पिझी! नारळाची बर्फी!

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H इझी, पिझी! नारळाची बर्फी! चिवडा, चकली, करंज्या, अनरसे, लाडू ... फराळातली ही मातबर मंडळी खमंग भाजून, सारणाने भरून आणि तेलातुपात तळून आता सज्ज झाली असतील, हो ना? घरोघरी खरेदीची धांदल, पै-पाहुण्यांची गडबड सुरू झाली असेल. उटण्याचा सुगंध, रांगोळीचे रंग, पणत्यांची आरास आणि भरगच्च भरलेले फराळाचे ताट! या फराळात भर म्हणून एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी पाककृती आज आपण पाहणार आहोत.

इंद्रधनू

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H इंद्रधनू रक्तकेशरी सूर्यदिशा मी समजून घे रे कधी मलाही, कसा कळेना तुला आवडे मावळतीचा रंग गुलाबी.. अवखळ हसरा झरा होऊनी बागडते मी तुझ्यासभोती, निळी जांभळी कोसळते मी शोधतोस तू शब्द गुलाबी.. हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून, मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी.. धम्मक पिवळी होऊन येईन, बंध जगाचे तोडून येईन, अंतर सारे मिटवू जाता होईन मी आरक्त गुलाबी.. मृद्ग़ंधासम हळवे नाते, सांभाळाया तुझ्याच हाती. सोपवून मी विश्वासाने मिटता डोळे

हलेल तर शप्पथ..

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H हलेल तर शप्पथ.. डिस्क्लेमर - कृपया हलके घ्यावं. हे लेखन पूर्णपणे काल्पनिक आहे. काय गं बाई करायचं आता या वजनाच्या काट्याचं? जर्रा म्हणून हलत नाहीये जागचा. बिघडलाय की काय कोण जाणे. फेकूनच देणारे आता मी तो. काय म्हणालात? वजनाचा काटा नाही गं ... तू हल म्हणून? कळतात बरं का टोमणे. काय काय केलं मी विच्चारू नका. आधी ठरवलं की फिरायलाच जाऊ या. अगदी पहाटे उठून. मग काय, एकदा ठरवलं की ठरवलं. आधी दुपारचं जागरण होणार, त्याची पर्वा न करता शॉपिंगला गेले. का म्हणजे?

माझा संगीत प्रवास

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H माझा संगीत प्रवास मी कोणीहि गायक, वादक संगीतकार किंवा कवी इ. काहीही नाही. मला संगीतातील रागदारी इ. काहीही कळत नाही. केवळ संगीत ऐकणे एवढेच करणारा सामान्य माणूस आहे.

अटक मटक, सारण चटक!

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H अटक मटक, सारण चटक! दोस्तहो, दिवाळीतलं गोग्गोड खाताना मध्येच काही चटकदार हवं असं वाटतंय ना? मग आता मी देतेय दोन पाककृती. आता दिवाळी म्हटलं की कॅलरी, व्यायाम, वजन असले शब्द ऐकले की पापच लागणार बरं का. त्यामुळे या पाककृती दिवाळी पेश्शल आहेत. (म्हणजे थोडक्यात तळलेल्या आहेत) नाहीतरी सध्या तेला-तुपाच्या कढया असतीलच ओट्यावर. तर पहा करून. एक आहे चीझी मिरची वडा आणि दुसरी चीझी मॅट/लहरिया सामोसा. यात पाककृती दोन असल्या, तरीही मी सारण मात्र एकच वापरलं आहे.

आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे - प्रवासवर्णन

लेखक निशाचर यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे

"आम्हा दोघांची गावं बाजूबाजूच्या दोन खोर्‍यांत आहेत, मधून डोंगररांग जाते. इकडून तिकडे जायचं असेल तर हिवाळ्यात बरं पडतं. केबल कारने डोंगर चढायचा आणि स्की करून उतरायचा. उन्हाळ्यात रस्त्याने जायचं म्हणजे वैताग येतो, कारण बराच वळसा पडतो." नवर्‍याचा ऑस्ट्रियन सहकारी सांगत होता. ही होती माझी ऑस्ट्रियाशी अनेक वर्षांपूर्वी झालेली ओळख. एक देश म्हणून ऑस्ट्रियाबद्दल थोडीफार माहिती होती.