बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ६: देवगड बीच आणि किल्ला
बघता मानस होते दंग ६: देवगड बीच आणि किल्ला
देवगडला पोहचल्यामुळे खूप उत्तेजित वाटतंय! माळरानावरच्या सुनसान घरामध्ये उरलेला दिवस गेला. पाच दिवसांमध्ये ४१३ पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालवली! सायकलीला खूप धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत! हे माळरानावरचं घर मुख्य रस्त्यापासून पाऊण किलोमीटर आत आहे आणि आत येणारा रस्ता अगदी कच्चा व खडकाळच आहे. येताना सुरुवातीला तर वाटलं की सायकल हातात धरूनच आणावी. पण इतक्या दिवसांच्या सायकलीच्या सोबतीमुळे विश्वास वाढला होता, म्हणून हळु हळु चालवतच घरी पोहचलो होतो. माझे नातेवाईक उद्या येतील, त्यामुळे घरातही शांतता आहे.
मिसळपाव