Skip to main content

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ६

लेखक कलम यांनी शुक्रवार, 02/11/2018 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी शांभवीच्या घरातून निघून गेल्यावर मात्र एकदाही अमितनं तिला फोन केला नाही. शांभवीच्या कानात त्यानं सांगितलेला प्रत्येक शब्द घुमत होता. आयुष्यात कधी कधी जास्त विश्लेषण करत बसलं तर हातात असलेला क्षण पण आपण घालवून बसतो. शांभवीच थोडंफार तसंच झालं होतं. अथर्वनं एका रात्री जेवताना विषय काढलाच. "काय झालंय तुला शांभवी? पूर्वीसारखी बोलत नाहीस, जेवणावर लक्ष नसतं , परवा सान्वी किती रडत होती आणि तू मात्र कुठंतरी विचारात हरवलेली आणि हे काय? एकही पैंटिंग काढलेलं नाहीयेस इतक्या दिवसात. इज एव्हरीथिंग ओके?" "अह... हो. सगळं ठीक आहे अथर्व.

हे पदार्थविज्ञान शिकायचं तरी कशाला ? (Why to study Physics in the first place!!)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 02/11/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र.. दूर वर ऐकू येणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्व खुणा.. काही ओळखी काही अनोळखी आवाज ऐकत जात असताना राजा विक्रम नेहमीप्रमाणेच चिंतनशील झाला.. दरबारातील एकेकाचे चेहरे, त्यांचे आवाज, त्यांचे स्वभाव, त्यांचे डोळ्याला दिसणारे रूप, अनुभवाने त्यांच्या स्वभावाची झालेली खरी ओळख, गुप्तहेरांकडून त्यांच्या राजनिष्ठेविषयी झालेली पडताळणी, त्यांची खासियत आणि त्यांची भाषा, धर्म, कबिला, मातृभूमी यांच्या आधारे राजा विक्रम प्रत्येकाचे एक पूर्ण चित्रच डोळ्यासमोर रेखाटत होता.. त्याच्यामार्फत त्याला अनेक वरकरणी न कळणाऱ्या गोष्टी जाणवत होत्या..

अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/11/2018 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला -------------------------------------- साहित्य दालचिनी --३ तुकडे काळी मिरी --२ टे स्पून जावेत्री --२ पाकळ्या जायफळ ३-४ खांडे तमाल पत्र -३-४ पाने मोठी वेलची -४-५ न ग शहाजिरे - १ टे स्पून लवंगा - १ टे स्पून वेलदोडे -१० न ग सर्व एकत्र करावे व ग्राइंडर वर बारीक पूड करावा मसाले भात भरली वांगी व्हेज बिर्याणी आदी ला नेहमीच्या मसाल्या सोबत एक चमचा वा प्रमाणात हा मसाला घालावा चवीत अप्रतिम फरक पडतो

कटर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/11/2018 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
. डेक्कन वर जागा मिळेल तिथे स्कुटर पार्क केली व चालायला सुरवात केली डेक्कन पेट्रोल पंपाजवळ एक जण टोस्ट सॅन्डविच बनवणारा आहे तो कांदा कापत होता चॉपिन बोर्ड वर नाजूक बारीक कापलेल्या चिरलेल्या कांद्याचा ढीग होता त्याच्या हातून सूरी घेत मी ब्लेड च्या थिकनेस चा पाते चिमटीत धरुन अंदाज घेतला खिश्यातुन पैसे काढत विचारणा केली सूरी कुठून विकत घेतली -मला मिळेल का इत्यादी पण तो माहिती देण्यास नाखूष दिसला -"साब वो सूरी बनाने वाला गाव को गयेला है -वापस नाही आने वा

Cold Blooded - ३

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 01/11/2018 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनीच्या मृत्यूला आठवडा उलटला होता. अद्यापही केसचा तपास फारसा पुढे सरकत नव्हता. तिचा मित्रं रुपेश हवेत विरुन गेल्याप्रमाणे अदृष्यं झाला होता. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफच होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे रेशमीने रुपेशचा फोटो त्याला पाठवला होता, परंतु त्याचाही फारसा काही उपयोग झालेला नव्हता. डॉ. भरुचांनी हैद्राबादच्या ज्या लॅबमध्ये रोशनीचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्या लॅबमधूनही काहीही कळलेलं नव्हतं. रोहितने आपल्या एकूण एक खबर्‍यांना कामाला लावलं होतं, पण परंतु चौफेर शोध घेवूनही रोशनीची पर्स किंवा तिच्या फोनचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.

गावातली चावडी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/11/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई. गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी.

मी अतिरेकी...

लेखक कलम यांनी गुरुवार, 01/11/2018 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला: वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली.