Skip to main content

राजस्थान सफर....(वाळवंटातील सौंदर्य....)

लेखक मॅक यांनी सोमवार, 17/12/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
राजस्थान सफर ...( वाळवंटातील सौंदर्य....एक स्वप्न) भाग-पहीला..... पुर्वतयारी.......... २०१४ नंतर देवभूमी केरळची सफर केल्यानंतर गेली तीन वर्ष छोट्यामोठ्या सहली सोडल्यातर कुठे मोठ्या सहलीसाठी जाण झाल नव्हत. त्यांच कारणही तसच होत मध्यल्या काळात ब-याच घडामोडी घडल्या आणि सहलीसाठी जाण्यासाठी लागणार आर्थिक गणित सुध्दा जुळत नव्हतं. तसही मी अशा सहलीसाठी स्वतंत्र SIP केली आहे पण अनेक अडचणी आल्यामुळे ते काही शक्य झाल नाही. असो..... त्यापैकी एक महत्वाच कारण म्हणजे २०१६ च्या शेवटी आम्ही नवीन घर खरेदी केलं आणि जानेवारी-२०१७ मध्ये तिकडे रहायला गेलो.

अडनिडी मुलं-२

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी... टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल...

अडनिडी मुलं -१

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेक मागच्या दोन वर्षापूर्वी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न . मॉम यु नो , ऑल गर्ल्स क्रेझी अबाउट ..... , ऑल ह्याव क्रश ऑन हिम ,. क्लास बंक करून मुली त्याला बघायला जातात . मी अवाक . पण न जाणवून देता ... एवढं काय आहे ग त्याच्यात? सर्व जणी एवढ्या वेड्या झाल्यात त्या ?

अतृप्त आत्मा 12

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 16/12/2018 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता. नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते. त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो. एव्हाना सकाळ झाली होती.आणी आमचे अस्थि साव

टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज

लेखक mrcoolguynice यांनी रविवार, 16/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. ८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.