Skip to main content

विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 11/12/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम, सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
  • ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
  • याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ?

'विडंबित' अंगाई गीत

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 11/12/2018 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा https://www.apurvaoka.com/2018/12/blog-post.html लहान मुलं झोपत नाहीत अशी तक्रार बहुतेक पालकांची असेल कदाचित. अशाच एका पालकाच्या तक्रारीवर चिंतन करताना गमतीत सुचलेलं एक काव्य. सो गया ये जहाँ च्या चालीवर काही मराठी ओळी.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ३

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/12/2018 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी राज्यकारभार शिकायला दिवसभर मग्न रहाणार तू जे दिसशील ते आत्ताचे क्षणच असे म्हणत मी उठायचोआणि तू कौसल्या आईनी नाहीतर सुमित्रा आईनी बोलावलं म्हणून दालनातून बाहेर पडायचीस...... तुला तसे जाताना मी मनात हसुन म्हणायचो...." यां चिंतयामी मयी सततं..... सा विरक्ता" हा दिवसही कालचा दिवस गेला तसा भुर्रकन उडून जायचा. भेटणं तर सोड साधे बोलणं ही व्हायचं नाही मागील दुवा https://www.misalpav.com/node/43729 मी फार बोलका नाही. त देखील कधी बोलून दाखवले नसेल. पण तात दशरथ महाराजानी तुझी तगमग ओळखली असावी .

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ६. बीड ते अंबेजोगाई

लेखक मार्गी यांनी सोमवार, 10/12/2018 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ६. बीड ते अंबेजोगाई १७ नोव्हेंबरची पहाट. इन्फँट इंडिया बाल गृहातून निघालो. निघताना दत्ता बारगजे जी व सर्व मुलांनी मला निरोप दिला. पहाटे लवकर उठून अगदी प्रेमाने माझ्यासाठी जेवण बनवलं! डोंगर उतरताना आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य वाटतोय! कालच्या भेटीच्या आठवणी मनात आहेत. आजही मला तुलनेने अगदी कमी दर्जाचा रस्ता लागणार आहे. आज असा तिसरा दिवस आहे जेव्हा सुरुवातीला तीस- पस्तीस किलोमीटरपर्यंत असा रस्ता असेल व नंतर चांगला रस्ता मिळेल. असा विचार करतोय किंवा अशी आशा करतोय की फक्त पस्तीस किलोमीटरपर्यंतच असा रस्ता असावा.

कथा विविधा

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 10/12/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, विविध विषयांवरील लेखन आणि कवितांमुळे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या मिपा सदस्या ज्योती अळवणी यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेल्या ‘कथा विविधा’ ह्या त्यांच्या पहिल्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग काल जुळून आला. मुळात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी हि पहिलीच वेळ होती, त्यामुळे चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा.

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/12/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे थोडं वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा हे variation मला आवडतं. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो.

नाना करा व्हाटस ॲप गृप

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/12/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग || नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को|| गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन नका लावू...अहो नका लावू साधा कॉल, खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून || मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन || - पाभे
काव्यरस

अतृप्त आत्मा 11

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 09/12/2018 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं. "नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो. दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं. "हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला. " हे मी घेउन काय करु ?