Skip to main content

तू काळजाला भिडावे

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 28/12/2018 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
देहास माझ्या स्पर्शताना तू काळजाला ही भिडावे श्वासात श्वास गुंतताना रे उरातले चांदणे धन्य व्हावे बहर माझा नि कहर तुझा क्षणांनी जराशी धुंद व्हावे तू बेभान मी व्याकूळ तरी देहानी जरा किनारा व्हावे पाकळया तू उलगडताना तुझा गंध जरा कुंद व्हावा तू रिक्त कधी, विरक्त कधी मलाही सृजनाचा पूर यावा . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा . . . . 9527460358
काव्यरस

हंपी आणि हंपी..भाग १

लेखक हर्षद खुस्पे यांनी शुक्रवार, 28/12/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आणि दरवर्षी प्रमाणे पुण्याबाहेरील ऑफिस मधील सहकार्यांना घरी जायला मिळावे म्हणून आम्हाला आमच्या सुट्टीची कुर्बानी द्यायला लागली. हे दर वर्षी असेच असतं . मग ही कुर्बानी आम्ही डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात भरून काढत असतो. ह्याही वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं ठरवत होतो पण कधी तारखा जमत नव्हत्या तर कधी बजेट .

3 Idiots

लेखक वेडसर यांनी शुक्रवार, 28/12/2018 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी कुठेतरी 3 Idiots बद्दलचा एक लेख वाचला. आता तो धागा नेमका सापडत नाहीये. लेख फारसा पटला नाही. त्यात एका प्रतिक्रियेत out of the box जाऊन काही करावं, आपल्याला आवडेल तेच करावं किंवा करून पहावं अशा काहीशा आशयाची एक प्रतिक्रिया होती ती मात्र पटली. शिवाय त्यातल्या संवादातून चतूर एकटा यशस्वी आहे आणि बाकीचे फरहान वगैरे फेल आहेत हे जे चित्र रंगवलं आहे ते चुकीचं आहे.

मुलाखत अंश: गव्हर्नन्स ववर्नन्स आणि बोलाचीच् कढी

लेखक mrcoolguynice यांनी शुक्रवार, 28/12/2018 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाखत : सुब्रमण्यम स्वामी (भाजप / बीजेपी राष्ट्रीय नेते) मुलाखतकर्ता : संजय पुगलिया सु स्वा : आज नरेंद्र मोदींना हेच सांगतोय, निवडणुका ह्या कधीही इकॉनॉमिक परफॉर्मन्सवर जिंकता येतच् नाही. ना नरसिंहा राव जिंकले, ना वाजपेयी जिंकले (इंडिया शायनींग च्या नावाने), ना मोरारजी जिंकले (भाववाढ रोखाण्याच्या मुद्द्यावरून)... या दुनियेत , लोकांच्या भावनांना हात घालूनच् (जागं करून) जिंकतात (निवडणुका)... सं पु: सर मग् हे जे क्रिटिक्स आहेत, त्यांचाच मुद्दा तुम्हीखरा सिद्ध करत आहात... (तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ) गव्हर्नसने (सुशासन) , परफॉर्मन्सने, आश्वासनाच्या पूर्ततेने निवडणुका जिंकता येत नाहीत ...

"मोहिम बागलाणची" भाग दुसरा

लेखक दिलीप वाटवे यांनी गुरुवार, 27/12/2018 23:42 या दिवशी प्रकाशित केले.

"मोहिम बागलाणची"

दिवस दुसरा

साल्हेर, सालोटा

अलंग-मदन-कुलंग हे दुर्गत्रिकुट पाहिल्यानंतर त्याच ट्रेकला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अर्थात कळसुबाईवर जाणं झालं होतं. हे कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात येतं तर महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात मोडतो. आकडेवारी अशी सांगते की नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त किल्ले आहेत. आता जास्त म्हणजे किती असतील?

आय आय टी चा क्लास

लेखक रानरेडा यांनी गुरुवार, 27/12/2018 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
हि सत्य घटना आहे आणि ज्या बद्दल लिहित आहे तो माझा चांगल्या ओळखीचा आहे . काही नावे बदलली आहेत ) "हुशारी असली आय आय टी म्हणजे फार लक लागते. आणि आणि अति कडक मेहनत पण." सतीश बोलला, "खूप हुशारी लागते रे आणि मुले मेहनत पण करतात " मी काहीही तयारी न देता केलेला एक अटेम्प्ट आठवून बोललो . " आणि आता तर क्लासेस आहेत - आणि ऐकले कि हमखास तयारी करून घेतात , ते कोटा त्यासाठीच फेमस आहे ना ? " अजून एक मित्र . सतीश माझा गेल्या ३-४ वर्षात झालेला मित्र. खरे तर मित्राच्या गाळ्या जवळ गाळा असल्याने त्यांची ओळख झाली आणि मग माझी पण.

फोटोग्राफीतले तीन काळ

लेखक फुटूवाला यांनी गुरुवार, 27/12/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
२००० साला आधी फोटोग्राफरची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर २०१२ पर्यंतची वेगळी आणि आता तर खूपच वेगळी. येत्या काही वर्षात काय होणारय देव जाणे. मी फोटोग्राफीला सुरवात केली नव्हती तेव्हा म्हणजे २००० पुर्वी फोटोग्राफरला लग्न लागायच्या वेळी बोलवायला/घ्यायला यायचे म्हणे. आणि लग्न झाल्यावर सोडायलाही. नंतर आले डिजीटल कॅमेरे. रोल संपणार नाही आणि फोटो लगेच दिसणार. म्हणून फोटोग्राफर लोक कितीही फोटो काढायचे आणि चांगले ठेऊन बाकीचे उडवायचे. त्यांच्या याच वृत्तीचा गैरफायदा ग्राहकवर्गाने घेतला. तो असा, सकाळीच मांडवपुजेपासून बिदाई, गृहप्रेवेशापर्यंत फोटोग्राफर लग्नघराच्या दावणीचा बैलच झाला.

अडनिडी मुलं-४

लेखक जेडी यांनी बुधवार, 26/12/2018 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या.

साडेतीन शहाणे!!!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 26/12/2018 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल २५ डिसेंबर २०१८.याच दिवशी २००९ साली ३ इडीयट्स हा सिनेमा रिलीज झाला होता.काल या सिनेमाने १०व्या वर्षात पदार्पण केलं.सिनेमाने त्यावेळी भरपूर गल्ला जमवला.भरपूर प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला. "जे आवडतं,भावतं त्यातंच करियर करा" हा बहुमोल सल्ला या सिनेमाने दिला.आपणही यातल्या सल्ल्यांनी तीन तास का होईना भारावून गेलो.अजूनही बरेचसे प्रबोधनपर प्रसंग आहेत. या सिनेमातल्या प्रबोधनाची दुसरी बाजू मात्र कोणीच मांडली नाही.तर तीच मांडायला याच सिनेमातली काही पात्रं जमली.बघा ती काय म्हणताहेत.काय चाललंय त्यांचं!