भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १४ - समाधी
या प्रकरणापासून 'प्रचिती' या पाचव्या विभागाची सुरूवात होते. अध्यात्म हा वास्तविक पाहता प्रचितीचाच प्रांत आहे. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात समाधीविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानसाधनेच्या प्रगत टप्प्यावर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे सजग भान येणे किंवा ध्यान साधत असताना अत्यंत उत्कटपणे ध्येय वस्तूत (उदा. नाम, प्रतिमा, मूर्ती इ.) अखंडपणे लीन होणे ही अवस्था साधकांना अनुभवता येते. पौर्वात्य जगतातल्या अध्यात्मिक साहित्यात ही प्रचिती दर्शवण्यासाठी 'समाधी' हा शब्द प्रचुरतेने वापरला जातो .
मिसळपाव