Skip to main content

दोसतार - ५७ ( अंतीम भाग)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/06/2020 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपताना बरेच वेळ झोपच येत नव्हती. डोळे मिटले की डोळ्यासमोर मुलांनी गच्च भरलेले मैदानच येत होते. मॅच हरलो तरी खूप मजा आली. मुख्याध्यापक सरांनी सहावी ब आणि आमच्या टीमला त्यांच्या घरी चहा चे निमंत्रण दिले. सर्वांचे अभिनंदन केले. पुढचे बरेच दिवस मॅच शिवाय वर्गात दुसरा विषयच नव्हता.
मागील दुवा http://misalpav.com/node/47081 वार्षीक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला की पुन्हा एकदा यवतेश्वराची सहल करायचीय. सगळ्यांना घेऊन. एल्प्या टंप्या योग्या राजा मंदार , महेश आंजी , गौरी , संगीता , दाम्या , अज्या , सुन्या सगळ्यांनी जायचय.

((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 26/06/2020 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच इथुन मित्र घरी जायला निघतो तेव्हा, अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो..

जब I met मी :-3

लेखक Cuty यांनी शुक्रवार, 26/06/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी घरात सर्व मुलांमध्ये मोठा. माझ्यामागे पाठच्या दोन बहिणी आणि सर्वात धाकटा भाऊ. वडिल कामगार. त्यामुळे परिस्थिती बेताचीच. त्यामुळे थोडा जाणता होताच जबाबदारीची जाणीव होऊ लागलेली. मग फक्त अभ्यासावरच सर्व लक्ष केंद्रित केलेले. त्यातून पहिल्यापासूनच शाळेत हुशार असल्याने, मार्क्सही चांगले पडत गेले.बारावीनंतर चांगल्या साईडला अॅडमिशन मिळाले, तेही फ्री सीट मध्ये. माझ्या शिक्षणाचा म्हणावा असा काहीच खर्च आला नाही. नंतर कर्ज काढून उच्चशिक्षणही पूर्ण केले. नोकरीला लागून दोन वर्षातच मी सर्व कर्ज फेडले. तोपर्यंत बहिणी लग्नाच्या झाल्या होत्या.

प्रिंटर आणि मी!

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 26/06/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि प्रिंटरचं काय वैर आहे माहिती नाही.पण मी प्रिंट दिली अन प्रिंटरजवळ गेल्यावर ती आलेली दिसली असं कधीच होत नाही. त्या लॅनचा तरी प्रॉब्लेम असेल किंवा आतमध्ये आधीपासूनच कागदं तरी अडकलेले असतील किंवा प्रिंटर हँग तरी झालेलं असेल! एकतर मी बसतो तिथून प्रिंटभर कोसभर लांब आहे. अश्यावेळी आपण दहा-बारा प्रिंट्स देऊन प्रिंटरजवळ गेल्यावर तो मक्ख चेहऱ्याने आपल्याकडे बघताना दिसला की माझा तिळपापड होतो. "अरे बाबारे, कंपनीत आम्ही आहोत ना मक्ख, आम्ही आहोत ना मठ्ठ !! तुला काय गरज आहे माणसात यायची !" आता हे रोजचंच असल्यामुळे सवय झालीये. पण कधी कधी आपल्याला जेन्युईन अर्जन्सी असते.

अभियांत्रिकीचे दिवस- भाग १

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 26/06/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन: २००६-०७ आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल. आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको. तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं. हे असं होतंच म्हणजे.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 26/06/2020 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: अध्यात्मिक साधकांच्या भावविश्वाचा धांडोळा घेतला असता शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, उत्कट भावभावनांचे मानसिक स्थिती सतत दोलायमान ठेवणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येत असल्याचे लक्षात येते.

राजयोग-१८

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 26/06/2020 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१७ *** यावर्षी त्रिपुरामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. उत्तरेकडून उंदरांच्या एकामागे एक टोळ्या त्रिपुराच्या शेतांमध्ये आल्या. सगळी पिकं तर खाल्लीच पण, लोकांनी त्यांच्या घरात जे साठवलं होतं, तेही अन्नधान्य खाऊन टाकलं. बघता बघता दुष्काळ पडला. जंगलात मिळणार्या कंदमुळांवर लोक आपली गुजराण करत होते. जंगलांची तशी कमतरता नव्ह्ती आणि तिथल्या जमिनीत खाण्यायोग्य गोष्टीही मिळत होत्या. शिकार करून आणलेले मांस बाजारात चढ्या भावाने विकले जाऊ लागले.

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 26/06/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ?? हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..! आता तू तयार आहेस..

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक २ काहूर

लेखक @tul यांनी शुक्रवार, 26/06/2020 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, एकदा लिहिलं , खोडलं , पुन्हा लिहीलं, पुन्हा खोडलं पण प्रिय तर आपल्याला ज्या व्यक्ती आवडतात त्यांना लिहितो ना मग का खोडलं मी? प्रिय तुझं भावना पत्र मिळालं. तुला माहितेय इतक्या वर्षांनी मला कोणीतरी संबोधून पत्र लिहिलंय. आज अनेक वर्षांनी मी पत्र वाचतोय. तेही केवळ मला आलेलं. आणि कोणी लिहिलेलं? तिने जिने मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी स्थान ग्रहण केलय. वर लिहीत होतो खोडत होतो आता धीर आलाय. हो केलं आहेस तू एक स्थान तयार माझ्या मनात. म्हणजे जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर. थोड्याश्या भीतीने तू म्हणालीस चहा कॉफी?

अथ श्री पुरुषलीळा।

लेखक आजी यांनी गुरुवार, 25/06/2020 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो. ट्रेन किंवा बस सुटायची वेळ झाली तरी वेळेवर न येणे हा कॉमन पॉईंट. ट्रेनची शिटी होते. सिग्नल मिळतो. ती हलते. चालू लागते तरीही खाली उतरलेल्या पुरुषाचा डब्यामधे पत्ता नसतो. बायको कावरीबावरी होते. मुलं रडू लागतात, तेव्हा कुठे हे पुरुषमहाशय कंपार्टमेंटमधे येतात.