मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उदारीकरण

काळा_पहाड ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते.

अ॑तर

शितल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.

एक सहज कवीता

श्रीयुत संतोष जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा.. एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर.. एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.. एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्री

कवीता

श्रीयुत संतोष जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कविवर्य सुरेश भट यांची ही कवीता रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा? सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशाः "चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!" माणसांच्या मध्यराञी हिंडणारा सूर्य मीः माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

डोळे हे जुलमी गडे...

प्राजु ·
नमस्कार मंडळी, शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर....

'हाल ए दिल'ः हालच हाल

विकीपियु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात. मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने 'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे. शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात काहीही नवीन नाही.

ओळख

श्रीयुत संतोष जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार्,खादाड लोक हो " मिपा " च्या सर्व सभासदांना माझा नमस्कार. आणि मालकांना सुद्धा . बरं का! मी संतोष जोशी श्री स्थानक येथे रहातो.लोकांना पोटभर जेऊ घालणे हा व्यवसाय.गेले तीन पिढ्या हा व्यवसाय अव्याहतपणे चालु आहे.(मी तिसरा) मालक (तात्या) आमचे मित्र आहेत. तशी मैत्री कट्ट्यावरची म्हणजे विचारांची , पण खाणे आणि पिणे यातील आवडीही सारख्या आहेत हे समजल्यावर जास्त घट्ट झाली. व्यवसाय तर आहेच पण लोकांना रुचेल ते खाऊ घालणे हा छंद. त्यामुळे सामिष की निरामिष हा तुच्छ प्रश्न कधीच आडवा येत नाही. आपणा सर्वांशी मैत्री करायला आवडेल . पाहूया !! कधी भेटीचा योग येतो ते...

शून्याची महती

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
एकदा "दोन" म्हणे "एकाला" आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला ऐकून हे वाटे "तिनाला" माहीत नाही का "एक" आणि "दोनाला" मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला दोन शिंगी "चार" होता आपल्या घरात हे संभाषण गेले त्याच्या कानात ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात ऐकल कारे "एक" "दोन" आणि "तिना" "पांच" "सहा" "सात" "आठ"आणि मीना कबूल झालो आहो "नऊना" तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे "शून्य" बिचारा कोपर्यात होता बसून ऐकून सारे आले त्याला भरभरून स्वतःशीच म्हणाला ठाऊक नाही त्यांना माझी किंमत घेऊन मला शेजारी,जेव्हां एखादा दाखवील हिम्मत वृद्धि होईल त्याची कळत नकळत सूर्य,चन्द्र,तार्यांचा आहे माझ्या सारखा आकार पण सांगतात का ते कधी आमचाच

फायरफॉक्सवाल्यांसाठी - मिसळपाव नीट वाचण्यासाठी च३.० वापरा

मिसळपाव ·
फायरफॉक्स वापरणारया मिसळपावच्या वाचकांसाठी एक सूचना. फायरफॉक्स ३.० परवाच रीलीझ झाला. तो वापरला तर मिसळपाव.कॉम वर रस्व, दिर्घ व जोडाक्षरं बरोबर दिसतात. फायरफॉक्स २.न वर नीट दिसत नाहित.

कुत्रा आणि मी ... काही अनुभव...

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं...