Skip to main content

उदारीकरण

लेखक काळा_पहाड यांनी शनिवार, 21/06/2008 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4326
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. खुप छान

देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते अति सुदंर लिहत जा....... संजीव

उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. ह्या ओळी आवडल्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय विचार खुपच छान आहे. पण त्यातील कठोर सत्याने मन व्याकुळ सैरभैर होते.

संपूर्ण कविताच छान आहे. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते. अगदी खरे आहे!

काळाशेठ, विकासराव म्हणातात त्याप्रमाणे मीही म्हणतो. संपूर्ण कविताच आवडली! औरभी आने दो. तात्या.

आवडली कविता, और भी आने दो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल केळकर,संजीव नाईक , सखाराम गटणे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तात्या, चतुरंग , विकास, व श्रीमंतपेशवे सर्वांचे मनःपुर्वक आभार. आपला नम्र काळा पहाड