मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.” बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती. आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.

आठवणी

अथांग सागर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवणी जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं या आठवणींत बुडुन जाताना आजचं नाही उरत भान क्षण ते परत ना येतील आता तीच होती सुखाची खाण आठवणी असतात अनेकांच्या तुमच्या, माझ्या, सर्वांच्या प्रत्येकाची असते एकतरी आठवण दु:खाची अथवा सुखाची साठवण माझ्याही आहेत अशाच आठवणी पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या जीवन झाल्या त्याच आठवणी सुवर्णरुपी गतकाळाच्या ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पा

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

अविनाश ओगले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात... आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली.

बावीस जून!

डॉ.प्रसाद दाढे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज बावीस जून! काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या दिवशी घडल्या आहेत, त्या॑चा हा धा॑डोळा.. १) २२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. सार्वभौम ब्रिटीश सत्तेवर प्रहार झाला. भारतीय स्वात॑त्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान उलगडले गेले.. २) २२ जून १९४० रोजी फ्रान्सने (दुसर्‍या महायुद्धात) हिटलरपुढे गुढगे टेकले, बिनशर्त शरणागती पत्करली. हिटलरने पहिल्या महायुद्धातल्या पराजयाचा सूड उगवला. ३) २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर स्वारी केली (ऑपरेशन बार्बारोसा). ही त्याची लष्करी घोडचूक ठरली.

काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.

प्राजु ·
काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध. लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज. अनुवाद : उषा तांबे. प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे. मूल्य : १९५ रू. मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी...

कहाणी अक्कलदाढेची

डॉ.प्रसाद दाढे ·
"अहो जरा बघता का..मेघनाचा गाल कालपासून सुजलाय, कानपण दुखतोय, डोक॑ ठणकत॑य" सौ.परा॑जपे म्हणाल्या. "अरे बाप रे.. हिलातर तापही आलाय बहुतेक, थर्मामीटर आण ग॑ जरा.. अरेच्च्या, मेघना तुझ॑ तो॑डही उघडत नाहीये.." बहुतेक वेळा हेच स॑वाद होतात घरा-घरातून जे॑व्हा "अक्कलदाढ" उगवत असते.. "डॉक्टर एव्हढा त्रास देऊन ही मेली अक्कलदाढ येतेच कशाला.. आणि मलाच का? माझ्या कुठल्याच मैत्रिणीला अजुन अक्कलदाढ आलेली नाहिये.." हा प्रश्नही खूप कॉमन आहे. मी प्रस्तूत लेखात अक्कलदाढेच्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीन.. 'उत्क्रा॑ती' ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे.

मैसूर बोंडा

स्वप्ना हसमनीस ·
मैसूर बोंडा
साहित्य : एक वाटी मैदा, एक वाटी दही , जिरे, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती : रात्री एक वाटी मैद्यात एक वाटी दही घालून हे मिश्रण चांगले फेटून ठेवावे. सकाळी त्यात मीठ,जिरे,बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून भज्यांप्रमाणे तळून काढावीत. हे बोंडे खूप फुगतात व रुचकर लागतात. कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावेत. :) वि.सू.

त्या गुर्जरनगरी: प्रथम तुज पाहता

ऋषिकेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १त्या गुर्जरनगरी: ओळख वरून पुढे... पहिल्या दिवशी सरळ ऑफिसाला जायचे होते व तेथून संध्याकाळी हॉटेलवर. प्रीपेड टॅक्सी केली. एकटाच असल्याचे पुढेच बसलो. गाडी विमानतळाच्या आवारातून बाहेर पडली आणि एका हमरस्त्याला लागली. अहमदाबाद विरळ होत गेलं आणि गांधीगरच्या रस्त्याला लागलो होतो. इथे माझं लक्ष वेधलं ते इथल्या रस्त्यांनी... अहाहा! रस्ते असावेत तर असे.. तेही भारतात.. संपूर्ण प्रवासात कुठेही खड्डा दिसलाच नाही.

लावणी - प्रणयरातीला कुठे चालला

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात चांदण टिपूर सांडल वार्‍याचा बी साज नवा प्रणयरातीला कुठ चालला शृंगाराला सोडून या नथनी पैंजण दूर ठेवल कशास त्यांची भीड उगा प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका हाती माझ्या हात सख्याचा अन् फुललेली रात हवी नभांगणातील लाख चांदणी प्रीत बघुनी जळल मनी प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी