Skip to main content

तो आणि त्याचा 'मी'

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
देवाजवळ जाताना 'मी'पणा सोडावा म्हणतात तसाच गेलोही. पण ! मला भेटला मुर्तिमंत अहंकार मुर्तिजवळ असण्याचा. मोठ्या कष्टाने मन सावरले प्रकटणाय्रा 'मी'पणाला आवरले मनोमन खात्री पटली तीव्रतर खंतही वाटली त्या गाभाय्रात देवच नव्हता ! होता फक्त एक -- अहंकार आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरलेला देवालाही आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!
काळा पहाड
Taxonomy upgrade extras

धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !! गीत - मंगेश पाडगावकर संगीत - यशवंत देव स्वर - अरुण दाते ' ------------------------------------------------------------------------ जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !
Taxonomy upgrade extras

सस्नेह निमंत्रण.

लेखक धमाल मुलगा यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय. सप्रेम नमस्कार वि.वि. मंडळी, येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, धमाल उर्फ कैवल्य. विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे. मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा.

लग्नाआधी नि लग्नानंतर !

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 26/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी --'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद :) ------------------------------- लग्नाआधी हाती हात शब्दांमधे मधुर मिठास फोनवर बोलणं तासनतास भेटल्यावरही रोजचं खास ..१ आकाशीचा रंग निळा वा असो घनघोर वर्षा कप कॉफीचा, एक छोटासा दोन जीवांना हो पुरेसा ..२ लग्न होता सारे संपले तिचे 'ना' केवळ नाव बदले संध्याकाळी येतो घरी मी घेऊनिया भाजीचे ओझे ..३ तसे एकांती बोलतो अजूनि वेळेचा ना हिशोब ठेवूनि घरखर्च नि 'फी' पोरांची जमा संपते चुटकीसरशी ..४ मात्र आटलं प्रेम नाही पण सांगाया वेळ नाही करता संवाद नजरेतूनी शब्दांचा फुका खेळ नाही ..५ --------------------------
Taxonomy upgrade extras

जालावरील संक्षिप्त शब्द

लेखक विद्याधर३१ यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. जसे १) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप. २) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट ३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा. यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही. तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे. प्र क टा आ म्हणजे काय?

थोडक्यात, न विचारलेली गम्मत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे” यालाच, ”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात. जीवनात, ”कधी खुषी कधी गम” असतं, बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं. वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार. “नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “ असं म्हणता,म्हणता “कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते” असं म्हणे पर्यंत, ”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असं म्हणताना “जीवनात ही घडी अशीच राहूदे” असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही. आणि,नंतर “थकले रे नंदलाला” असं म्हणायला काहिही वाटत नाही. ”जन पळभर म्हणतील हाय,हाय “ म्हणण्याची वेळ केव्हां येऊन

आता कशाला उद्दयाची बात

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज कालचा उद्दया असतो आणि आज उद्दयाचा काल असतो मग उद्दया जेव्हा ’आज’ होईल आणि ’आज’ त्याचा ’काल’ होईल तेव्हा त्या उद्दयाच्या उद्दयाला ’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल आता आज जे होत राहिलंय त्याचं काल म्हणून होत जाणार जे उद्दया म्हणून होणार आहे त्याला आज म्हणून म्हटलं जाणार म्हणून “आता कशाला उद्दयाची बात बघ उडुनी चालली रात भर भरूनी पिऊ रस रंग नऊ चल बुडुनी जाऊ रंगात” हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची. श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.

मातृशक्ती विरुद्ध मातृभाषा.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 25/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते. तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना.