मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवन मी जगून गेलो

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
जीवन मी जगून गेलो . एकसे सुख दु:खा लेखून गेलो जीवनी असा मी जगून गेलो पाहिली मी दिवास्वप्ने कधी जी साकारण्या तया गढून गेलो आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो ऊन-पावसात हसलो सदा मी मैफलीत गीत गाऊन गेलो म्हणती कुणी सटकला कधी हा साथ अशी तुला देऊन गेलो करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो ========================= स्वाती फडणीस ....................... २२-०५-२००८

बदल तर घडतोय...

स्वाती फडणीस ·
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

एप्रिल फळ (९)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८) मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

बेसनलाडू ·
ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.

आकांक्षा पुढती इथे...

विनायक प्रभू ·
http://www.misalpav.com/node/2474 आजकाल ऑफीसमध्ये मी सर्व प्राण घातक शस्त्रे माझ्यापासून लांब ठेवतो.पेन , पेन्सील, पेपर नाईफ वगैरे.पालक मंडळी भेटायला येतात.त्यांची मुक्ताफळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आत्मघातकी विचार येऊ नयेत म्हणून. मला एक पालक भेटलेआणि मला म्हणाले " मी माझ्या मुलाला न्युरॉलॉजीस्ट करणार आहे."मी दचकलो. मग एक शिरस्ता म्हणून दहावीचे मार्क विचारले.उत्तर आले "फर्स्ट क्लास." सर्वात आधी ऑफीसच्या खिडक्या बंद आहेतयाची खातरजमा करून घेतली. सुमारे अर्धा तास फर्ड्या इंग्रजीमध्ये मानवी ब्रह्मदेवाशी चर्चा होत असताना चिरंजीव फर्स्टक्लासचे मेडल म्हणून मिळालेल्या मोबाईल वर बिझी होते.

लेखन -चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय......भाऊ?

श्रीकृष्ण सामंत ·
ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात.पहिल्याचं "पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग"अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे. आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले. मला लिहीतात, "मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली.

`यू टर्न'

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय... समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..

नोटापुराण

देवदत्त ·
लेखनप्रकार
"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना." मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी.

चूकीचे ( गझल )

आनंदा माने ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी बोललो " हे वाटले चूकीचे " "मी बोललो" हे जाहले चूकीचे होतात कोठे वाद बोलण्याने.. अंदाज मी हे बांधले चूकीचे जे घावले त्याच्यात अर्थ मिळेना मी शोधले ... ते दाखले चूकीचे ओटीत गाथा आज ओतल्या तू रे हाय!! का ?...मी वेचले चूकीचे.. - आनंदा आनंद माने, सोलापूर