लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च
"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.
घरात भरल्या घुसले उंदीर...
घरात भरल्या घुसले उंदीर
गणयंत्राच्या समोर बसले
ज्ञानपिपासू अधीर डोळे
चकाकत्या पडद्याला डसले
ज्ञानाची ती अपार विश्चे;
हवे हवे ते क्षणात वेचून
क्लिकक्लिकणारा उंदीर आणी-
थेट घरातच अवघे खेचून
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे
उंदीर हेची बाप जहाले
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
सांघिक खेळ
हे असे कां व्हावे? कर्मधर्मसंयोगाने विंबल्डनची अंतीम फेरी तीन ठिकाणी बसून बघितली. ज्याला त्याला फ़ेडरर जिंकावा असेच वाटत होते. नादालचे परतावे जबरदस्त दिसत असतानाही सहानुभूती त्या फ़ेडररलाच दिसत होती. तीसया सेटला नादालचा पाय दुखावला तेव्हा त्याची लंगडी चाल पाहून ’पुरे झाली तुझी नाटकं’ अशी टिपण्णी देणारे देखील होतेच. एकूण केबलचा पैसा वसूल करणारी मॆच होती हे नक्की.
आणि हो, प्रेक्षकांत बसलेल्या बोर्गला हसताना पहिल्य़ांदाच पाहिले.
आता सायकल शर्यत सुरु आहे. मला ही स्पर्धा जास्त शैक्षणिक वाटते. खरी संघभावना या स्पर्धकांमध्ये दिसून येते.
ठिपका
घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही
कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही
तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही
तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही
मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही
बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही
तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही
-अनि
आमचे मधुभाई...!
काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो.
बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट
अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत..
आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत..
कृपया अधिक माहिती द्यावी..
(काळजी ग्रस्त)केशवसुमार
कार्यालय
कार्यालय
इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी
कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय
- विनोद इंगळे
Taxonomy upgrade extras
एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं
नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता.
मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता.
आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला.
म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?.
बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले.
मिसळपाव