Skip to main content

भेळपुरीच्या गाड्या

Published on 07/08/2008 - 17:40 प्रकाशित मुखपृष्ठ
घाटावरच्या भटांनी काल केलेली विडंबनाची भेळपुरी खाल्याने आमच्या पोटात गडबड सुरू झाली.. (डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा) व्यथा ऐकली भटा तुझी मी अता ऐक तू माझी कथा कविता माझी तू हलकी घे, आहे जरा ती यथातथा नवखा असशी सदस्य तू रे वय तव आहे हप्त्याचे इतक्यातच अन तुला जाहले अजीर्ण विडंबन कवितांचे? हसता हसता पोट दुखे मी वाचून हे झालो बेजार चहुबाजूंनी झाला मजवर द्या उत्तर ऐसा भडिमार महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी' या भेळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे सर्किट, मुक्ती या दोघां
लेखनविषय:

याद्या 5158

कविकिरडुंची साठमारी ... (विडंबनाची भेळपुरी)

Published on 07/08/2008 - 14:49 प्रकाशित मुखपृष्ठ
घाटावरच्या भटसाहेबांनी विडंबनाची भेळपुरी लिहुन आमच्या प्राण:प्रिय साहित्यप्रकारावर टिका केली (मारली). त्यात आमच्या प्रातःस्मरणी सदगुरु केशवसुमारांचा उल्लेख पाहुन तर आमची अस्मिताच दुखावली (शेजारच्या क्युबिकल मधली नाही). आमची ती वेदना मग ही अशी आम्ही झरझर उतरवुन काढली. (डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा नाही समजले तर गेलात उडत !) मिपाकरांनो झोडुन घ्यावे मांडतो त्यांची व्यथा विडंबन माझे ह.
लेखनविषय:

याद्या 3111

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय.....

Published on 07/08/2008 - 13:11 प्रकाशित मुखपृष्ठ
आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय ती माझी होणार नाही हे तीने मला २ वर्षांनी कळ्वलंय जुन्या आठवणी सोडुन मी मन "दुसरी" कडे वळ्वलंय माझ्या कडे पाहतांना प्रत्येकीच्या डोळ्यात हसु दिसतंय मनातल्या मनात म्हणतेय ती कसं पाखरु जाळ्यात फसतयं आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय.............
लेखनविषय:

याद्या 1693
Taxonomy upgrade extras

म्हणून म्हणतो ऐका माझे ...

Published on 07/08/2008 - 13:09 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. प्रेमाचे दिवस संपले की वाहतात संशयाचे वारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... त्याला भेटायाची वेळ ती मुद्दाम विसरते. त्याला काही केल्या तिचा जन्मदिन न स्मरे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... ओफिसमध्ये साहेबाची कटकट, घरात बायको आणि पोरे.
लेखनविषय:

याद्या 1444

डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

Published on 07/08/2008 - 10:57 प्रकाशित मुखपृष्ठ
बरं झालं असतं "ओएसओ" जर बघितला नसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळणार. दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळणार. जग सुनं सुनं होणार पिक्चर सरता सरता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते. क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते ! क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू. आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू. "दि एन्ड" नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता, डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..! -- अभिजीत दाते
लेखनविषय:

याद्या 1914

कोचर्‍याची लिलू

Published on 07/08/2008 - 09:02 प्रकाशित मुखपृष्ठ
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली. "अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर" असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो, "अगं तू वकील केव्हां झालीस ?" "असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते" असं ती मला म्हणाली. कोचर्‍याला माझ्या वहिनीच्या माहेरचे शेजारी कोचरेकर त्यांची ही मुलगी होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2941

या नालायकांना अटकाव कसा करायचा

Published on 07/08/2008 - 08:25 प्रकाशित मुखपृष्ठ
रायगडाला जेव्हा लाज येते... महराष्ट्र टाइम्स मधली ही बातमी वाचुन डोके तापले. ह्या नालायकांना अटकाव कसा करायचा? दोन वर्षांपुर्वी मला राजगड्लाही हाच अनिभव आला होता.

याद्या 29313

स्केच..

Published on 07/08/2008 - 05:41 प्रकाशित मुखपृष्ठ
आज दुपारी हे चित्र काढलं.. पहीलाच प्रयत्नात हे असं आलं.. अजुन एकदा दोनदा मी नक्कीच हे काढणार आहे.. कारण खूप सुधारणा लागतील अजुन..पण माझ्या मते, नऊवारी साडी,चेहर्‍यावरचे किंचीत दुख्खी एक्सप्रेशन्स बर्‍यापैकी जमलेत.. चारकोल वापरणं अजुन नीट जमत नाही. तुमची काय सजेशन्स? IMG_1036-1
लेखनविषय:

याद्या 5430
Taxonomy upgrade extras

विडंबनाची भेळपुरी

Published on 07/08/2008 - 05:39 प्रकाशित मुखपृष्ठ
(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा) मिपाकरांनो ऐकून घ्यावे मनातली मांडतो व्यथा कविता माझी पण ह.
लेखनविषय:

याद्या 23591

त्याला जरा रागवा ना बाई !

Published on 07/08/2008 - 02:05 प्रकाशित मुखपृष्ठ
राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्‍यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा ! ---------------------------------------------------------- त्याला जरा रागवा ना बाई तो काही माझे ऐकत नाही… घर बदलले दार बदलले मी सारे आधार बदलले तो काही माझे पाहत नाही त्याला जरा रागवा ना बाई … १ आषाढ गेले श्रावण आले महिने काय सालही गेले तो काही पाऊस पाडत नाही त्याला जरा रागवा ना बाई … २ दबाव टाकले गार्हाणे नेले विमानही ते ओळखीचं झाले तो म्हणे की डाळ शिजत नाही त्याला जरा रागवा ना बाई … ३ लोक जमवले पार जागवले पत्रकार तर नेहमीचे झाले तो म्हणे की बार उडत नाही त्याला जरा रागवा ना बाई … ४ ---------------------------------------
लेखनविषय:

याद्या 2614
Taxonomy upgrade extras