या नालायकांना अटकाव कसा करायचा
In reply to जुनी बातमी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सिंहगडावर बिड्या .. by संदीप चित्रे
महाराजांच्या काळी सिंहगडावर मावळ्यांपैकी कोणी विडी ओढली नसेलच ह्याची काय गॅरंटी ?मला प्रश्न जाम आवडला. =)) बिड्या फुंकणार्यांच्या कानशिलात का वाजवायचात हो तुम्ही सर्केश्वर? बिड्यांनी वातावरण प्रदूषित होतं म्हणून की किल्ल्यावर कुठेतरी आग लागून नुकसान होईल म्हणून? कारण बिडी फुंकून लोक काहीतरी विचित्र चाळे करत असतील असं वाटत नाही. म्हणजे ग्यारंटी नाही पण तरीही... ;)
In reply to हाहाहा! by प्रियाली
In reply to फक्त by धमाल मुलगा
In reply to उत्तम! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to फक्त by धमाल मुलगा
In reply to धमाला... by एक
In reply to कायद्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी by धनंजय
In reply to असेच म्हणतो.. by संदीप चित्रे
आपल्याकडे 'दंड होणं' आणि 'दंडाची खरी रक्कम पूर्ण भरणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेतचआणि ती 'दंडाची रक्कम योग्य जागी जमा होणे' याचीही गणती करावी. ;) तुमच्या दुसर्या प्रतिसादाला अनुमोदन. मारामारी करून प्रश्न सुटत नसतात. एखादा तुमच्यापेक्षा भारी भेटला तर तुम्ही त्याला एक कानफटात माराल आणि तो तुम्हाला लाथा-बुक्क्यांनी बुकलेल. :)
In reply to धमाल आणि चिन्या१९८५ by संदीप चित्रे
In reply to स्वनियुक् by चिन्या१९८५
In reply to संस्कृती माणसांसाठी का माणसं तिच्या दावणीला बांधायची? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to संस्कृती माणसांसाठी का माणसं तिच्या दावणीला बांधायची? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मग by चिन्या१९८५
In reply to प्रिय मित्र चिन्या१९८५ by टारझन
In reply to ज्यांच मत by चिन्या१९८५
In reply to नाही कळल by टारझन
In reply to ऐतिहासीक स्थानांचे पावित्र्य व सामान्य जनांची वर्तवणुक ... by छोटा डॉन
In reply to त्याला by चिन्या१९८५
पण काहीकाहींच्या डोक्यात शिरत नाही.मुळात आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जातोय ,त्याचे महत्व काय हे समजायला हवेच सुज्ञ माणसाला.तुझे काही अंशी बरोबर आहे. माणसाला समजत नाही आपण कुठे काय करतोय ते, पण ते समजावयाची जबाबदारी आपलीच की ... सरकार कुठे कुठे आणि काय काय बघणार ? पण त्यासाठी लगेच "लाठ्याकाठ्या आणि हॉकी स्टीकचा" वापर कशाला ? एकट्यादुकट्याला [ मी निर्दोष म्हणत नाही हे लक्षात घ्यावे ] पकडुन मारण्यात कसले आले शौर्य आणि पावित्र्यरक्षण ? खाली महाराजांच्या नावावर जे काही घडते ते पाहुन वर महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ह्याचा कुणी विचार करतो का ? कितीही नाकारले तरी कमीत कमी मला तरी ह्यात थोडा का होईना "वैयक्तीक आणि राजकीय स्वार्थ" दिसतो बाबा ... पण मी "इमानदारीने हे कार्य" करणार्यांच्या भावनांचा व कष्टांचा अपमान करत नाही हे लक्षात घ्यावे, त्यांच्याबद्दल आदर आहेच की. त्यांची भावना मुळीच चुक नाही पण मार्ग नक्कीच चुकीचा आहे.
ज्यांच्यामुळे आम्ही आज 'दाढीवाले खान' नाही त्यांनी बांधलेल्या पवित्र स्थानाचे पावित्र्यही आम्ही राखु शकत नाही याची आम्हाला लाज वाटते.यु सेट इट ... ही भावना प्रत्येकाच्याच मनात आहे ह्याबद्दल दुमत नाहीच ... पण पावित्र्य राखायचा हा आतातायी मार्ग कशासाठी ? शोधले तर हजारो मार्ग सापडतीलच की, मग फक्त हाच का निवडता ... समाजातल्या प्रत्येक वर्गाला ह्याविषयी काही ना काही आत्मियता वाटतेच ना, मग त्यांना सामीक करुन घेऊन का एखादा "समंजस व योग्य मार्ग" निघत नाही, हा लाठ्याकाठ्यांचा वापर कशासाठी ? "अशा स्थानांचे पावित्र्य अशा आतातायी मार्गाने टिकवण्याचा प्रयत्न होतो ह्याची आम्हाला मनापासुन लाज वाटते"
मी गरीब असेल आणि झोपडीत राहत असेल तर मी माझ्या झोपडीतच निसर्गर्विधी करावा का???ज्या वेळेला माझे घर विकसित होईल त्यावेळेला मी आपोआपच टॉयलेटमधे जाईल म्हणने बरोबर आहे का??हेच पुर्ण बेसलेस विधान आहे ... ह्याचा काय संबंध आपल्या विषयाशी ? आपली "सोय आणि पावित्र्य ह्या संकल्पनांशी" गल्लत होत आहे.
हे नतद्रष्ट लोक तिथेही जाउन असे चाळे करतीलही.फक्त त्यांना याची भिती असते की आपण असे करायला गेलो तर आपल्याला चोप मिळेल.मी असहमत आहे ह्याच्याशी ... त्या ठिकाणी अशी भानवाच निर्माण होत नाही, ह्याचा अर्थ असा नाही की "गडांवर ह्या भावनेला खतपाणी मिळते", कॄपया असा गैरसमज करुन घेऊ नये ... तुम्हीच सांगा हो, समजा तुम्ही व कुनीही "तिरुपतीला, शिर्डीला, पंढरपुरला" आलात तर असे वागाल का ? त्यावर जनमानसाच्या रिऍक्शनचा प्रश्न नंतर येतो, मुलात कोणी असे करणारच नाही कारण अशी भानवा ह्या ठिकाणी निर्माण होने शक्य नाही ... मी तर नाही वाचले / पाहिले बॉ की कुणी "तिरुपतीला, शिर्डीला, पंढरपुरला" मंदिरात दारु पिऊन धिंगाणा केला, चोचीच चोच घालुन बसले वा इतर काही , हे कशाचे प्रतिक ? बाकी सोडा हो, लोक अशा पवित्र ठिकाणी "पारोशा अंगाने" जायला मनापासुन बिचकतात ... ह्यात कुठली सक्ती किंवा लठ्याकाठ्यांचा दबाव नसावा कदाचित ... अजुन एक आपन दंडाची भाषा करता, कशासाठी दंड हो ? केलेल्या सो कॉल्ड पावित्र्यभंगासाठी ? त्यापेक्षा तशी भावना निर्माण होणार नाही अशी व्यवस्था का होऊ शकत नाही ? जोरजबरदस्तीत काही अर्थ नाही व शौर्यही नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to हम्म् , काहेतरी गल्लत होतेय ... by छोटा डॉन
In reply to ऐतिहासीक स्थानांचे पावित्र्य व सामान्य जनांची वर्तवणुक ... by छोटा डॉन
In reply to डॉनची प्रतिक्रीया छान आहे. by शितल
In reply to मीपण डॉनशी by मेघना भुस्कुटे
In reply to डॉनची प्रतिक्रीया छान आहे. by शितल
In reply to सही आहे... by एक
In reply to आम्ही जे by चिन्या१९८५
In reply to नशीब... by एक
In reply to आमच्या by चिन्या१९८५
In reply to चिन्या१८५७ by टारझन
In reply to भावी कॉर्पोरेटर by धनंजय
आपणांमध्ये अजून स्वतः ठोकपीट करणारे समाजसेवक, फारतर कॉर्पोरेटर, आहेत. आमदारकीची कळसूत्री पात्रता त्यांच्यात अजून आलेली नाही.अगदी! अगदी! प्रसंगी छातीवर लाठ्या खाऊ पण भगवा विधानसभेवर फडकलाच पाहिजे अशा विचारांचे शिवसैनिक आपल्यात आहेत. बाळ, उद्धव ठाकरे नाहीत. :) हिंदूंचे राष्ट्र झालेच पाहिजे असे ध्येय बाळगणारे बजरंगदली कार्यकर्ते आहेत, वाजपेयी, महाजन, अडवाणी नाहीत. :)
In reply to सही प्रतिसाद by प्रियाली
आपल्याकडे 'दंड होणं' आणि 'दंडाची खरी रक्कम पूर्ण भरणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेतचहेच म्हणतो.
आणि ती 'दंडाची रक्कम योग्य जागी जमा होणे' याचीही गणती करावी.:? ह्याचा अर्थ नाही कळला प्रियालीताई. वर एक मुद्दा आला आहे, की अशा लोकांना समजावूनही सांगता येऊ शकतं. केलेले आहेत..हे ही प्रयत्न केलेले आहेत. पदरी काय पडलं? दारुड्यांचा मार, प्रेमी युगुलांच्या शिव्याशाप. आणी ऊठसुठ प्रत्येक जोडीची कानशीलं आम्ही शेकायचो असा काहीसा गैरसमज इथं झालेला दिसतोय. जे व्यवस्थित फिरतात त्यांना कोणिही त्रास देत नाही. उलट सुरुवातीला जेव्हा आम्ही दारुड्यांना समजवायचो तेव्हा एखादं जोडपं जर दारुडे बसलेल्या ठिकाणापासून जात असेल, तर त्या जोडप्याला आमच्यातले काहीजण सोबतही करायचो. पण जेव्हा तुम्ही एखादं जोडपं, ज्या तानाजी मालुसर्यांनी पोराचं लग्न बाजुला ठेऊन स्वतःचा जीव देऊन गड काबीज केला, त्या तानाजींच्या अर्धपुतळ्याचा आडोसा पकडून अश्लील चाळे करताना पाहता, तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच वाट्त नाही? आश्चर्य आहे ! बरं, गुंडगिरीबद्द्ल म्हणाल, तर आमच्या ह्या ग्रुपमधली जवळपास सगळी मुलं चांगल्या घरातलीच होती. सोबत मुलीही असायच्या (फक्त दिवसा...कबुतरं केसेस हाताळायला...नाहीतर हे लोक विनयभंगाच्या उलट तक्रारी नोंदवायचे.). नडग्या फोडण्याबद्दल म्हणाल तर, जर आपण हे केलं नाही, तर आपल्या नडग्या फुटणार हे नक्की. कारण एकदा ही 'अक्काबाई' पोटात गेली की सगळेच शुरवीर होऊन जातात. एक आठवण सांगतो, जिच्यामुळे आम्ही काठ्या वापरायला सुरुवात केली. एका शनिवारी रात्री गडावर दारु पिणार्यांना समजाऊन सांगताना त्यांच्यातला एकजण अचानक भडकला, सोबत असलेली क्वॉर्टर त्यानं आमच्या एका मित्राला फेकुन मारली, कपाळावर बाटली फुटली आणि काचाही घुसल्या. त्यानंतर ठरवलं, स्वसंरक्षण हे पहिलं. पुरे झाली गांधीगिरी. छोटा डॉन म्हणतात,
पावित्र्य ही काय "नाजुक कचकड्यांची बाहुली" आहे का की कुणा लुंग्यासुंग्याच्या गैरवर्तनामुळे ती भंग व्हायला ?मुळीच नाही. एखाद दुसर्या फडतुस माणसाच्या गैरवर्तनाने कधीच असं होणार नाही... पण, जर त्याला वेळीच अटकाव केला नाही तर मात्र लोकांना ती सवय होऊन जाते. मग हळुहळु 'त्याला काय होतंय? सगळे हेच करतात की' ही भावना वाढीला लागते, आणि मग हळुहळु गडाचा 'ओपन एअर बार' व्हायला वेळ नाही लागणार. ह्याच वाक्याच्या धर्तीवर मी असं म्हणालो की, "माझ्यासारख्या लुंग्यासुंग्यानं देवळात लघुशंका केली तर कुठे बिघडलं?" तर? ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि ज्यांना ती कळत नाही, त्यांना ती कधी प्रेमाने, हात जोडून तर कधी नडग्या फोडून शिकवावी लागते. अर्थात शिकली जात नाही हा भाग अलाहिदा!
अहो, ते स्थळ तुम्ही असे विकसीत का करत नाही की "कुणाही देशी अथवा परदेशी येथे आला की इथला इतिहास व वैभव पाहुन त्याची मान आपोआप आदराने झुकली पाहिजे" ,लाखमोलाचं बोललात डॉनराव. आमची लाख इच्छा आहे, पण लाल फितीचा कारभार आडवा येतो ना!
छान थंड हवा आहे, थोडं धुकं आहे आणि थोडा थोडा पाऊस आहे अश्यावेळी असा काही अपराध करून बघितला आहेस का? अरे मजा असते अश्या चोरटेपणात सुद्धा.एकराव ;) अगदी पटलं बॉ! पण असे अपराध करताना एक पथ्य सांभाळलं, गड-किल्ल्यांवर नाही गेलो, इतर बरीच ठिकाणं आहेत तिकडे गेलो.. ;) चाळ्यांची व्याख्या द्यायची म्हणजे नक्की काय करावे बुवा?
सध्या कोजागिरीच्या रात्री सिंहगडावर चोचीत चोच घालून बसणे गुन्हा आहे की केवळ निर्लज्जपणा?माफ करा धनंजयराव, पण कोजागिरीचा संबंध गडावर दारु पिण्याशी होता, आणि इतर वेळी चोचीत चोच घालुन बसणे हा वेगळा संदर्भ होता. असो, कदाचित आमची मतं टोकाची असु शकतील, असतीलही, पण तात्कालिन परिस्थितीमध्ये जे आम्हाला योग्य वाटलं ते केलं.
डिसक्लेमर : माझी सध्याच्या "पावित्र्यरक्षकांबद्दल" काहीही तक्रार नाही फक्त त्यांचा मार्ग चुकीचा आहे हेच माझे मत आहे. सध्याच्या परिस्थीत त्यांच्या कामाचे कौतुक करायला हरकत नाही पण ते योग्य आहे असे माझे मुळीच मत नाही.:) डानराव, योग्य मार्गाची अंमलबजावणी अंशतः चालु झाल्यापासुन आम्हीही हा चुकीचा मार्ग बंद केला आहे. पण ती अंमलबजावणी सुरु व्हायला, चुकीचा मार्गच कारणीभूत ठरला हे ही नसे थोडके.
In reply to बापरे... by धमाल मुलगा
In reply to बापरे... by धमाल मुलगा
In reply to दारू by गुंडोपंत
In reply to बापरे... by धमाल मुलगा
In reply to येकदम शिवसेना ष्टाइल by पंकज
येकदम शिवसेना ष्टाइल....हे लय भारी :)
कानशीलं शेकवताना लाल फित नसते वाटतं.तेव्हामात्र आडवी येत नाही..खाकी ची कृपा. त्यांच्याशी आधीच विचारविनिमय करुन पाऊल उचलल्यावर लाल फित आडवी येत नाही. आणि जर कुठे येण्याची शक्यता असेलच, तर आमच्या त्या गृपमधले २ वकील कायदेशीर बाबी सांभाळून कृती करायचे सल्ले देत.
तुमचे विचार चांगले असतील हो... पण तुमच्या पावलावर पाउल ठेवून आलेल्या स्वंयघोषीत संस्कृतीरक्षकांची जबाबदारी कोण घेणार. मी बोलेल तीच संस्कृती,मी बोलेल तेच योग्य...यापेक्षा वेगळे काय असेल?पंकजराव, हे मात्र अगदी १०१% खरं. ह्याचाच त्रास व्हायला लागून पुढे आमची ही मोहीम आम्ही बंद केली. स्वतःला काडीचा फायदा नसताना, खिशातले पैसे घालुन पेट्रोल जाळून तिथे जायचं,आणि करुन सवरुन पुन्हा वर, स्वतःच्या पोटातलं पाणीही न हलवता शिव्यांची लाखोली वाहणार्यांच्या आणि आमच्या कामाचीही तुलना पुंडाईशी करणार्या संभावित पांढरपेशी 'आपल्याच' लोकांचा त्रास सहन करायचा ह्याला विटलो आणि सरळ डोळ्यावर कातडं ओढून घेतलं. आणि अंशतः कारवाई चालू झाल्यापासून ह्या फुकटच्या उस्तवारीशी फारकत घेतली. आता सरकार, दारुडे, जोडपी आणि अजुन कोणी असतील ते...जो गोंधळ घालायचा तो घालुदे... चुकुन माकुन कधी गेलोच गडावर, तर आम्हीही जे चाललंय ते मिटक्या मारत पाहू...
In reply to येकदम by धमाल मुलगा
In reply to आता बदलून by गुंडोपंत
नको तिथे दारू पिवून धिंगाणा करणार्यांना, मुली बायकांना त्रास देणार्यांना मात्र धम्याचाच मार्ग योग्य आहे. आणि त्याला माझा १००% पाठिंबा आहे आणि राहिल.धन्यवाद. आता वळुया तुमच्या दुसर्या प्रतिसादाकडे.
एकदा हे असलेच संस्कृती रक्षक (!) पांडवलेण्याला पोरा पोरींना कोपर्यात गाठून सकाळी सकाळी त्रास देत होते.... ...असले तर हे संस्कृती रक्षक वीर!हे खरे संस्कृतीरक्षक होते की कातडं पांघरलेले संस्कृतीभक्षक बुभुक्षित लांडगे? हाताची पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना? मध्ये बर्याच बातम्या यायच्या, "खडकवासला धरणापाशी पोलीस असल्याचे भासवून जोडप्यांना लुटले", "पुणे विद्यापीठात पोलीस असल्याचे भासवून बलात्कार" इ.इ. मग हे खरे पोलीस होते का? नाही ना?
यांनी नको तिथे जावून मारामार्या केल्या. भलत्याच लोकांना हाणले ते पण त्यांना वाचवणारे तेथे कुणी नसतांना!माझा वरचा प्रतिसाद बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की, भलत्याच लोकांना मारलेले नाही. नको तिथे जाऊन मारामार्या ह्या शेवटचा पर्याय म्हणून कराव्या लागल्या.
पावित्र्य टिकवायला तुम्ही कोण आले पवित्र? काय पात्रता?किमान, ज्या अयोग्य गोष्टी आपण करत नाही आहोत त्या रोखण्याची पात्रता असु शकत नाही काय? आता योग्य आणि अयोग्य हे कोणि ठरवायचे असाही प्रश्न उद्भवू शकतोच. तर सारासार विचारशक्तीला साक्षी ठेऊन सद्सदविवेकबुध्दीला जे खटकतं ते अयोग्य. आपल्या बरोबर असलेल्या माय बहिणींना ज्या उघड गोष्टींमुळे लाजेने मान खाली घालावी लागेल ते अयोग्य. आपल्या अनुभवातले 'संस्कृतीरक्षक' जर योग्य हेतुने फिरत असते, तर नक्कीच हे घडले नसते. काय त्यांच्याबरोबर ह्या कामासाठी कॉलेजात शिकणार्या मुली, काही विवाहित स्त्रियाही फिरत होत्या? आमच्या बरोबर नेहमी असायच्या. त्यामुळे जरी कोणाला तुमच्या वरच्या अनुभवाप्रमाणे करावसं वाटलंच तरी ते करणं, म्हणजे आपल्याच सोबत्यांकडून मार खाणं हे माहित असल्याने आणी मुळातच तसे हेतु मनात नसल्याने अशा प्रकारच्या गोष्टी होत नसत, ह्याची नोंद घेण्यासारखी. गल्लीतल्या गुंडगिरीचा फायदा घेऊन / राजकिय पक्षाच्या आशिर्वादाने ह्या कामास सुरुवात करुन त्याला घॄणास्पद रुप देणारे हे देहान्त प्रायश्चित्त देण्याच्या लायकीचे आहेत असं माझं वैयक्तिक (आणि टोकाचं म्हणा हवंतर) मत आहे. आम्हालाही व्यक्तिस्वातंत्र्याचा पुर्ण आदर आहेच, पण सार्वजनीक ठिकाणी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असा अर्थ जर ध्वनीत होत असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.
प्रेमीयुगुलांना मारहाण करून गडाचे पावित्र्य कमी करण्यास तुम्हीही हातभार लावलात की रे.:) पक्याशेठ,
आणी ऊठसुठ प्रत्येक जोडीची कानशीलं आम्ही शेकायचो असा काहीसा गैरसमज इथं झालेला दिसतोय. जे व्यवस्थित फिरतात त्यांना कोणिही त्रास देत नाही. उलट सुरुवातीला जेव्हा आम्ही दारुड्यांना समजवायचो तेव्हा एखादं जोडपं जर दारुडे बसलेल्या ठिकाणापासून जात असेल, तर त्या जोडप्याला आमच्यातले काहीजण सोबतही करायचो. पण जेव्हा तुम्ही एखादं जोडपं, ज्या तानाजी मालुसर्यांनी पोराचं लग्न बाजुला ठेऊन स्वतःचा जीव देऊन गड काबीज केला, त्या तानाजींच्या अर्धपुतळ्याचा आडोसा पकडून अश्लील चाळे करताना पाहता, तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच वाट्त नाही? आश्चर्य आहे !गड म्हणजे साबरमतीचा आश्रम नव्हे ना? :) जेव्हा झुडपात खसफसतं आणि तुम्ही आवाज देता "कोण आहे रे तिकडं? येऊ का?" तेव्हा एखादी मुलगी तोंड ओढणीनं झाकून कमरेची सलवार एका मुठीत आवळून पळून जाताना पाहिली ना की मग लक्षात येतं, काय करायला हवं आणि काय नाही!
मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्यांना अटकाव करावा.पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात.
In reply to कदाचित by धमाल मुलगा
In reply to हे सगळे by लबाड मुलगा
In reply to तुमी कश्याला by गुंडोपंत
In reply to तुमास्नी by लबाड मुलगा
In reply to हे सगळे by लबाड मुलगा
In reply to बरोबर आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to साडी by लबाड मुलगा
In reply to आत्ताच ह्या by लंबूटांग
In reply to राम राम... by एक
जुनी बातमी