Skip to main content

मन कातर कातर...

Published on 06/08/2008 - 12:37 प्रकाशित मुखपृष्ठ
मन कातर कातर... फार जपलं जपलं... पाणी गढूळ गढूळ... उडे चिखल चिखल... एक बोचला कातळ... वाहे रक्त भळभळ.... मनी उठले काहूर... एक वेदनेची लहर... परत लाटांचा कल्लोळ... पण जल निर्मळ निर्मळ... मनी आशेचा मोहोर... वाहू थांबले रुधिर.... मन कातर कातर... झाले नितळ नितळ...
लेखनविषय:

याद्या 5725
Taxonomy upgrade extras

मी डेटिंग केले नाही..!

Published on 06/08/2008 - 11:31 प्रकाशित मुखपृष्ठ
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही. मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही. भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना, कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना. मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा. मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही. मी डेटिंग केले नाही.. बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी. सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो. मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. मी डेटिंग केले नाही अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
लेखनविषय:

याद्या 9501
Taxonomy upgrade extras

उलगता बाजार

Published on 06/08/2008 - 08:32 प्रकाशित मुखपृष्ठ
"सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच." मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेव
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1487

लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया.

Published on 06/08/2008 - 06:01 प्रकाशित मुखपृष्ठ
लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया. स्वर्गच जसा काही.... दोन फोटू (२००७ च्या ऊन्हाळ्यात काढ्लेले). कॅमेरा ? आपला साधा (Sony DSC) डिजीटल. १. ईमेराल्ड बे लेक (ताहोचाच एक भाग):-- २. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) ) . . (फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3954

कणकेचा केक :पौश्टिक झट्पट

Published on 06/08/2008 - 04:17 प्रकाशित मुखपृष्ठ
१ वाटि कणिक १ वाटि पाणी २ चमचे बेकीन्ग पावडर अर्धि वाटि गूळ गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेत बेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ). मस्त पौष्टिक केक तयार.... स्मार्ट बनी

याद्या 6325

साक्षात परमेश्वरही...

Published on 06/08/2008 - 01:43 प्रकाशित मुखपृष्ठ
आज इ-सकाळवर खालील बातमी वाचली (संक्षिप्त स्वरूपः) साक्षात परमेश्वरही या देशाला वाचवू शकत नाही नवी दिल्ली, ता. ५ - या देशाला आता साक्षात परमेश्वरही वाचवू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास सरकारने नकार दिल्याने न्यायालय संतप्त झाले आहे.

याद्या 4358

श्रावणातील सण

Published on 05/08/2008 - 22:24 प्रकाशित मुखपृष्ठ
श्रावणातील सण
होता श्रावणाचे आगमनं सुरू होते सणांची उधळणं गोड धोड मिळे खायला आणि सुट्ट्यांना उधाण
प्रथम येते नागपंचमी फुलोय्रावाचून हिची महती कमी काढून सर्पनक्षी देवघरा त्यापुढे सान-थोरही नमीं मग येते पौर्णिमा नारळी जमती सारे बांधव कोळी पूजती त्या सागरदेवतेला जो त्यांना हो सांभाळी दिन हा रक्ष
लेखनविषय:

याद्या 4014
Taxonomy upgrade extras

असूनी दोस्त करितो दुष्मनी

Published on 05/08/2008 - 22:04 प्रकाशित मुखपृष्ठ
(अनुवादीत. कवी--समीर) केला आहे दुष्टपणा दुष्टानी केले तरी कुठे कमी दोस्तानी येतो काळ आसाही जीवनी असूनी दोस्त करितो दुष्मनी लागे दोस्तीला कुणाची नजर बदल होता तुला नसे ती खबर नाही राहिल्या आणा अन शपथा साथ साथ मरण्याचा एकही इरादा दौलतीला राहती सर्वस्व मानूनी येतो काळ आसाही जीवनी असूनी दोस्त करितो दुष्मनी प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी दौलत कसली कसली दोस्ती नाती गोती सर्वच नावा पुरती पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी असूनी दोस्त करितो दुष्मनी श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

याद्या 1793

उपासाची भजी

Published on 05/08/2008 - 21:36 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य : ४/६ अळकुड्या ; शिंगाडा पीठ ; हिरव्या मिरचीचा ठेचा ; मीठ ; जीरा पावडर ; पाणी ; तळणाकरीता तूप. कृती : अळकुड्या सोलून त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावे.ते लगेच मीठाच्या पाण्यात ठेवावे नाही तर बुळबुळीत होतात. शिंगाडयाच्या पीठात हिरव्या मिरचीचा ठेचा , चवीपुरते मीठ आणि जीरा पावडर घालून जरा पातळसरच भिजवावे. तूप तापवून मंद आचेवर अळकुड्यांचे तुकडे पीठामधे बुडवून सोडावे. चांगला लालसर रंग येईपर्यंत तळावे.गरम गरम खाण्यातच मजा आहे. अळकुड्या शिजवून घेतल्या तरी चालतील पण मग त्याचे काप करून त्याला पीठ जरा जाड भिजवावे लागेल.

याद्या 5753