मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्याला जरा रागवा ना बाई !

संदीप चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्‍यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा ! ---------------------------------------------------------- त्याला जरा रागवा ना बाई तो काही माझे ऐकत नाही… घर बदलले दार बदलले मी सारे आधार बदलले तो काही माझे पाहत नाही त्याला जरा रागवा ना बाई … १ आषाढ गेले श्रावण आले महिने काय सालही गेले तो काही पाऊस पाडत नाही त्याला जरा रागवा ना बाई … २ दबाव टाकले गार्हाणे नेले विमानही ते ओळखीचं झाले तो म्हणे की डाळ शिजत नाही त्याला जरा रागवा ना बाई … ३ लोक जमवले पार जागवले पत्रकार तर नेहमीचे झाले तो म्हणे की बार उडत नाही त्याला जरा रागवा ना बाई … ४ ---------------------------------------------------------- www.atakmatak.blogspot.com

वाचने 2611 वाचनखूण प्रतिक्रिया 6

शितल गुरुवार, 08/07/2008 - 19:41
वेगळ्या विषयावरची कविता आवडली. :)

प्राजु गुरुवार, 08/07/2008 - 20:27
संदीप, सॉलिड हाणला आहेस... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/