को जागर्ती !
"को जागर्ती?".......... सॉSSल्लीड दचकलो मी. एक तर रात्र इतकी झालेली त्यात स्टडीरुम मधे मी एकटाच. त्यात आज पौर्णीमा म्हणुन खिडकी उघडी टाकलेली. अश्यावेळी जर असं कुणी म्हणालं तुमच्या मागे, तर तुम्ही नाही दचकणार? दचकाल ना? मी पण जोरात दचकलो. इतका की बुडाखालची खुर्ची खर्रर्रर्रकन आवाज करत सरली.
"को जागर्ती?" पुन्हा एकदा. जरा सावधपणे आजुबाजुला नजर फ़िरवली अंSSहं कुणी नाही, बाहेर येउन बेडरुमच्या दारातुन नजर टाकली सौभाग्यवती गाढ झोपलेली. आईशप्पत, ही झोपेत बडबडते की काय ?
सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"
*कोल्ह्याट्याचं पोर हे छोटेखानी पुस्तक वाचल्यावर त्याबद्दल मिपावर लिहण्याचा मोह आवरला नाही.*
आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.
अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं.भूपाळी (देवद्वार छंद)
आम्ही नुकतीच धोंडोपंतांची नव्याने सुरु झालेली छंदशास्त्राची शिकवणी लावलेली आहे. हा पहिल्या धड्यावरचा गृहपाठ.
उठा हो दयाळा
प्रभात जाहली
पाहा उजळली
पूर्व दिशा
भेटीसाठी झाले
जन सारे गोळां
भक्तांचा हा मेळां
वाट पाहे
दाखवा हो रूप
सावळें सुंदर
अति मनोहर
आम्हालागीं
तुम्ही राम आम्हा
तुम्ही कृष्ण आम्हा
विठ्ठलही आम्हा
तुम्हाठायी
द्या हो सर्वां सुख
आरोग्य सावली
करा ब्रीदावली
काही सार्थ
भटू म्हणे नाही
मजला कवित्व
केवळ ममत्व
ईश्वराचे
अजाणतेपणी
काही केला यत्न
दगडच रत्न
माना ऐसे
विशेष
चान्द्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं!
टी ऑफ आय मधील बातमी पुढे काय? कुणी माहिती सांगितली तर वाचायला आवडेल. चिनी ब्लॉग्स वर मात्र या मोहिमेच्या यशाविषयी बर्याच कुशंका व्यक्त केल्या जाताहेत असं वाचण्यात आलं, वस्तुस्थिती काय आहे?
नेपाळी बटाटा
माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.
देवद्वार छंद
लोकहो,
वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्या आहेत.
सर्वप्रथम
१) छंदांवर प्रभुत्व मिळवावे.
त्यानंतर
२) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी.
आणि शेवटी
३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे.
एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल.
Taxonomy upgrade extras
छंदशास्त्र
लोकहो,
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत.
मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते.
मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात.
विशेष
आमची बायको कुत्रा पाळते
आमची बायको कुत्रा पाळते
तुम्ही पाळून देऊ नका
आमच्या पायाखाली जळते
तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे
वेडे खूळ मनात भरले
आपण पपी घेऊ गडे
लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला
घेऊ ग लवकर, म्हटले
पपी नव्हे, घात झाला
कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन
डोबरमॅन, चिव्हावा
सारे कनाईन धुंडून
पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून
शुभ्र कुत्रा हिने खरिदला
सतत लाड त्याचे पाहून
माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ
रोज हिची धावपळ बघून
वाटे पपीला गिळू की खाऊ
सारखा
Taxonomy upgrade extras
आप्पा आणि बाप्पा
" काहीतरी उद्योग काढ बघू" आप्पा प्रधान
" आता गुपचूप झोप " बाप्पा सरमळकर
" अरे बाप्पा मनाला काहीतरी चाळा हवा ना"
" खरच नको रे आप्पा. गेल्यावेळेला काय गोंधळ झालेला. आठवतय ना? त्यांनी आपल्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला असता. आपण बाबा-पूता केल म्हणून थोडक्यात निभावल "
" आता त्याची आठवण कशाला ? "
" मग आता का चिडतोस ? "
" चिडत नाही. पण आत्ता काय करायचय बोल ?"
" ठीक आहे. तूझा जर एवढा आग्रहच असेल तर..."
.
***************************************************************************************
आप्पा सबनीस आणि बाप्पा महाले हे दोघ जीवश्च कंठश्च मित्र. आप्पा थोडासा घाबरट. तूमच्या आमच्या सारखा.
मिसळपाव
