आमची बायको कुत्रा पाळते
तुम्ही पाळून देऊ नका
आमच्या पायाखाली जळते
तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे
वेडे खूळ मनात भरले
आपण पपी घेऊ गडे
लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला
घेऊ ग लवकर, म्हटले
पपी नव्हे, घात झाला
कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन
डोबरमॅन, चिव्हावा
सारे कनाईन धुंडून
पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून
शुभ्र कुत्रा हिने खरिदला
सतत लाड त्याचे पाहून
माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ
रोज हिची धावपळ बघून
वाटे पपीला गिळू की खाऊ
सारखा राही खार खाऊन
सोफ्यावर ऐटीत बसून
मी जवळ येताच मात्र
रागाने दात विचकून
भुंकून गोंधळ करी कुत्र
आमची बायको कुत्रा पाळते
तुमचीला पाहिजे आहे का?
पाळल्यावरच खरे कळते
माझ्या कवितेवर जाऊ नका.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3192
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुत्रे
ही ही ही
हाहाहा
धन्यवाद. पा
In reply to हाहाहा by पावसाची परी