Skip to main content

मानसीक छळाची परीसीमा

लेखक ब्रिटिश यांनी रविवार, 09/11/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीक छळ म्हणजे दूस-याच्या एखाद्या कृतीने खुप त्रास होऊन देखिल काहीही करू न शकणे (जाणकारांनी आपापल्या परीने व्याखेत बदल करावा) तूमचा कधी मानसीक छळ झाला आहे काय ? माझा होतो. कित्येक वेळा. उदा १) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे २) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे ३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे ४) वळणदार मुलींनी काका म्हणणे ५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना ! मानसीक छळातून सुटका नसलेला मिथुन काशिनाथ भोईर

भाईकाकांना शुभेच्छा...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय भाईकाका, काल ८ नोव्हेंबर होता, आपला वाढदिवस! परंतु कालचा संपूर्ण दिस खरंच गडबडीत गेला त्यामुळे मिपावर निवांतपणे यायला जमलंच नाही. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे दोन शब्द आज जरा सवडीने लिहीत आहे... आपल्याला वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा..! :) आम्हा सर्व मिपाकरांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला ही छोटीशी, प्रेमाची भेट.. गोड मानून घ्यावी!

कविता (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
सूर तुझे येथे गुंजतात कानी भारलेल्या रानी साद देती | स्वप्नांची इथेच भेट अशी घडे प्राजक्ताचे सडे माझ्यासाठी | नजरेत सारे गूज हे मनीचे श्वास कसे माझे गंधाळले | चांदणे शिंपीत ये तुझी चाहूल प्रितीचीच भूल या र्‍हुदयी | भेट तुझी माझी घडता ही सारी सृष्टी होई न्यारी धुंदाउनी | नवा नवा भासे निसर्ग हा असा जीव माझा पिसा सुखावला |

पाउस (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
वीज भारलेला गंध दाटलेला आसमंत ओला आसावला | तेज सौदामिनी चमकते नभी जळ कृष्णमेघी साचलेले | बेभान हा वारा रानात भरारा घुसळतो सारा चराचरा | टपोरे टपोरे थेंब पावसाचे झेलीत हा नाचे मोर रानी | अंग अंग ओले धरतीचे झाले नभ ते झुकले भेटीसाठी |

राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ

लेखक निमीत्त मात्र यांनी रविवार, 09/11/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी अवलंबलेला मार्ग किती चुकिचा आहे हे आता दिसुन येत आहे. हरयाणातील मराठी बांधवांना वाचवायला आता राज ठाकरे तिकडे जातील का? सकाळमध्ये आलेली ही बातमी वाचा. ------------------------- चंदीगढ- राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे. हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे.

पाल्हाळ (देवद्वार)

लेखक लिखाळ यांनी रविवार, 09/11/2008 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या लेखावरून स्फुर्ती घेउन... वाचतो क्वचित त्यातून ललित घुसते डोईत कधितरी लिहितो मधेच त्यातून तात्विक विचार सात्विक करितो मी ठरवितो मग लिहावी कविता सुखदु:ख बाता जमेचिना पुरे झाले आता डोके खाजवणे कविता रचणे चेष्टा नोहे पहा मिपावर असा हा लिखाळ लावितो पाल्हाळ पुन्हा पुन्हा --लिखाळ.

EMI - एकदा तरी बघाच

लेखक योगी९०० यांनी रविवार, 09/11/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
Wednesday नंतर जेवढे नवीन चित्रपट आले, ते मी अर्ध्यावरच सोडून दिले. 'द्रोणा'' तर पहिल्या पंधरा मिनीटानंतरच बंद केला. आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. अर्थात मान्यवर समिक्षकांनी दोनच स्टार दिले असले तरी थोडा पहावा असा विचार केला. चित्रपट तसा हलका फुलकाच आहे. पण आशय महत्वाचा. "कर्ज काढून सण साजरे करू नये" हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तशी कथा चार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर फिरते. सर्वानाच पैसा हवा आहे.

कार्यरत राहिल्याने हिम्मत येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/11/2008 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं. "तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली, "माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं.