✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

देवद्वार छंद

ध — धोंडोपंत, Sat, 11/08/2008 - 15:04

प्रतिक्रिया द्या
10825 वाचन

💬 प्रतिसाद (38)

वाह! धन्यवाद

सहज
Sat, 11/08/2008 - 16:04 नवीन
धोंडोपंत सांगे साधत यमक मात्राही अचुक काव्य करा छंद आणी मात्रा सांगे सर्वजना डोलवत माना करु काव्य लागलाहो आता वृत्ताचा हा छंद बघा मतिमंद लिहताहे आवडला लेख गद्य करी पद्य देतो हा नैवेद्य धोंडोपंता :-)
  • Log in or register to post comments

सहमत

घाटावरचे भट
Sat, 11/08/2008 - 17:13 नवीन
नाही आम्हा ठावे वृत्त आणि छंद आणि ताळेबंद गण मात्रा केला हरीपाठ कितीक वेळेला छंद ना दिसला त्यात काही धोंडोपंतें मात्र स्वच्छ केली धूळ दाखविलें मूळ देवद्वार धोंडोपंत ज्ञानी 'सहज' लिहिती माझी सहमती भटू म्हणे -(किंचित कवी) भटोबा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वा वा वा

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 19:07 नवीन
वा वा वा वा, झकास. आमचे लेखन सार्थकी लागले. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजा मस्त रे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2008 - 11:22 नवीन
लागलाहो आता वृत्ताचा हा छंद बघा मतिमंद लिहताहे हा हा हा हहपुवा =)) लिहित राहा. छंदा ,मात्रा च्या कवितेसाठी हार्दिक शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे (कोणताच छंद नसलेला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

धन्यवाद !!!

मनीषा
Sat, 11/08/2008 - 17:04 नवीन
माझ्यासारख्या हौशी कविता करणार्‍याना (...पण त्यातले फारसे काही न कळणार्‍यां साठी) खूपच उपयोगी ! तुमच्या पुढील धड्याची वाट पहात आहे .
  • Log in or register to post comments

कोकणी माणूस

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 19:00 नवीन
या देवद्वार छंदातील आमची एक कविता. ही कविता पूर्वी मराठी संस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. आम्ही कोकणी कसे?????? तर आम्ही असे आम्ही ही कोकणी माणसे सामान्य नको असामान्य जीणे आम्हा हवी आम्हां फक्त थंडीला शेकोटी गांडीला लंगोटी आम्ही सुखी भोजना मिळू दे दोन वेळा भात पान आणि कात थुंकायला आनंदाचा क्षण येता जरी पहा पिऊ अर्धा चहा टपरीत नाही परदेशी केले पर्यटन आमुचा कोकण आम्हा प्यारा रेवस पावस खेड चिपळूण लांजा मालवण स्वर्ग आम्हा गरम चहाचा कप अंगणात हगावे बागेत पोफळीच्या किर्र किर्र वाजे खळ्यात रहाट नागमोडी वाट समुद्राची अथांग सागर कोकणा लाभला जगाला वाटला हेवा त्याचा समृद्धी सुबत्ता येई ना कोकणा हाचि परगणा दुष्काळाचा पुरेनाच अन्न भूक वरदान तरी समाधान चित्तालागी जसे शांतपणे आलो या जगात जाऊ ही स्वर्गात शांतपणे आपला, (कोकण्या) धोंडोपंत टीप -- वरील कवितेत आलेले दोन ग्राम्य शब्द हे असेच कोकणात बोलले जातात. त्यामुळे ते तसेच्या तसेच आले आहेत. अर्थात संपूर्ण कविता किंवा ती दोन कडवी पटावरून उडविण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे आणि आम्ही तो मानतो. आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

व्वा

मदनबाण
Sat, 11/08/2008 - 19:06 नवीन
व्वा पंत,,सुंदर रचना... अजुनही परत परत वाचावे वाटते. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

उजळणी बाकी आहे.

मीनल
Sat, 11/08/2008 - 19:20 नवीन
मराठी व्याकरणाची उजळणी झाली. विसरायलाच झाले होते. खूप आवडले. अजून खूप उजळणी बाकी आहे. येऊ द्या. मीनल.
  • Log in or register to post comments

अतिव

अवलिया
Sat, 11/08/2008 - 19:25 नवीन
अतिव सुंदर पंताचे लेखन करुन वाचन धन्य झालो कराया घेतली छोटीशी रचना करुनी वंदना धोंडोपंता नाना म्हणे पंता मनीची कामना करता लेखना पुर्ण झाली नाना
  • Log in or register to post comments

भय्येच

मदनबाण
Sat, 11/08/2008 - 19:39 नवीन
भय्येच दिसती मज सर्वत्रच हाणा एकत्रच या सर्वासी वसुन इथेच करी घाण फार आता तरी तार मुंबईस चालु यादव हा करी बोंबा बोंब पेटलाच डोंब मुंबईत हाकलावे यांस त्वरित इथुन काठीच घालुन पेकाटात राज म्हणे आज योग्यच ही रीत आम्ही नाही भीत या लोकांसी माझाही एक क्षुद्र प्रयत्न... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 19:44 नवीन
अप्रतिम. चालू द्या. मजा येतेय एकाहून एक सरस कविता वाचायला. (गद्याचे तुकडे करून त्याला कविता समजून चघळण्याची तिडीक असलेला) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

मी

विनायक प्रभू
Sat, 11/08/2008 - 19:48 नवीन
मी पण कविता करु का? इतके दिवस भिती वाटायची. पंताचे गाईड असेल तर मी पण कविता करीन म्हणतो. विषय काय घ्यावा बरे? वी.डी.(की वेडा) प्रभु
  • Log in or register to post comments

जल्ला

ब्रिटिश
Sun, 11/09/2008 - 21:55 नवीन
जल्ला कोंबडीचे पीसावर बसाला जमत आसल त कवीता म्हन्जे डाव्या हातचा मळ हि परतीक्रिया तात्याला ईचारून टाकलीय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

उत्तम

बेसनलाडू
Sat, 11/08/2008 - 21:56 नवीन
आणि माहितीपूर्ण मारदर्शनपर लेखन पंत! (विद्यार्थी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

धन्यवाद बेला

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 22:08 नवीन
धन्यवाद बेला, काही वर्षांपूर्वीचा "त्या तिकडे" केलेला प्रयोग आठवत असेलच. इथे मिपा वर लेखन सुरक्षित राहील कारण हे आपलेच घर. तुम्ही विद्यार्थी कसले तुम्ही दिग्गज. आधी छंद मग जाती मग वृत्ते असा हा विषय घेऊन जायचा मनसुबा आहे. तुमचा सक्रीय सहभाग या विषयात अपेक्षित आहे. आपला, (छंदवेडा) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

चांगल बेत

बेसनलाडू
Sun, 11/09/2008 - 02:24 नवीन
छंदशिक्षण आणि वृत्तशिक्षणाचा हा बेत आवडला पंत. परिचयाच्या रचना गुणगुणल्याने संबंधित छंद/वृत्त इ. अधिक जवळचे वाटू लागते, हे सोदाहरण स्पष्ट केलेलेही आवडले. (छंदवेडा) सक्रीय सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. त्या दृष्टीने काय करायचा बेत आहे, हे सांगावे. (उपक्रमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

सुरूवातीस

धोंडोपंत
Sun, 11/09/2008 - 09:13 नवीन
सुरूवातीस छंदांबद्दल लेखन करू. एकदा छंद झाले की मग जाती घेऊ आणि शेवटी वृत्त. अशा रितीने वाटून घेऊ. देवद्वार झाला. पुढील छंद आपण घ्यावा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

धन्यवाद । अनुष्टुभ

बेसनलाडू
Sun, 11/09/2008 - 19:34 नवीन
उपक्रमात सहभागी व्हायची संधी मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू दिवसा-दोन दिवसात अनुष्टुभ छंदाबद्दल लिहायचा मानस आहे. लेखनात काही त्रुटी आढळल्यास संपादकीय अधिकार किंवा प्रतिसाद माध्यमाचा वापर करून दूर कराव्यात ही नम्र विनंती. (छंदवेडा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

वा! मस्त सुरवात.. आपले अनेक आभार

ऋषिकेश
Sat, 11/08/2008 - 22:16 नवीन
माझाहि एक प्रयत्न: -------------------- झाली हो दिवाळी कंदिल काढुया कामास लागुया नित्यनेमे पुन्हा ते ऑफीस तो रामरगाडा नेहेमीचा पाढा चालु झाला एकाएकी पुन्हा उजळली रात्र थरारले गात्र आनंदाने जागोजागी मग रोषणाई झाली स्वरांची दिवाळी पुन्हा आली भारताचे रत्न संबोधी शासन जाहला पावन पुरस्कार स्वरांचा भास्कर राहो तळपत इच्छा ही मनात सदोदित अवांतर: जाहला आनंद धन्यु! धोंडोपंत जुनी माझी खंत दूर केली -(छंदी ;)) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

वा

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 22:22 नवीन
वा छान. लिहीत रहा. शब्द आपोआप येतील. तो पहा लागला अर्थ बोलायला शब्द येतील त्यांना पुकारू नये नाव माझे फुलांनी विचारू नये नाव सांगेन तेव्हा शहारू नये ---सुरेश भट आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बहोत खुब!

ऋषिकेश
Sun, 11/09/2008 - 20:27 नवीन
नाव माझे फुलांनी विचारू नये नाव सांगेन तेव्हा शहारू नये
वा! बहोत खुब! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

देवद्वार छंद -- सरावासाठी उदाहरणे

धोंडोपंत
Sat, 11/08/2008 - 22:17 नवीन
कोणत्याही वृत्ताचा , छंदाचा अभ्यास करतांना आपल्याला माहित असलेल्या त्या छंदातील रचना सतत गुणगुणाव्या, म्हणजे ते वृत्त अंगी भिनते. एकदा त्या छंदाची लय रक्तात भिनली की भविष्यकाळात सुचणार्‍या कविता आपोआप स्वत:चे नेमके वृत्त घेऊनच येतात. त्यासाठी काही खटाटोप करावा लागत नाही. ते काव्य जिवंत असतं. कारण ते थेट हृदयातून कागदावर उतरतं. गुणगुणण्याच्या सरावासाठी देवद्वार छंदातील काही अत्यंत लोकप्रिय उदाहरणे. १) ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो...... २) वेदांसी कानडा श्रुतींसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये ३) काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग ४) रात्रंदिन आंम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन ५) इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई आपला, (सोदाहरण) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

वा कविवर्य

सुवर्णमयी
Sun, 11/09/2008 - 02:21 नवीन
वा कविवर्य, या उपक्रमाबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद. मिपावरील छंदोबद्ध लेखन करणार्‍यांना / करण्याची इच्छा असणार्‍या सर्वांना या माहितीचा उपयोगच होईल. माझ्या वृत्तबद्ध लेखन करण्याच्या धडपडीची सुरुवात झाली आणि त्यात सुधारणा व्हाव्यात असे वाटून मला मित्रमंडळींनी आपणहून मार्गदर्शन केले. धोंडोपंत, मनोगतावर वृत्ताच्या माहितीची आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादांची मुद्रणे अजूनही माझ्याकडे आहेत. अष्टाक्षरी मध्ये मी काही कविता केल्या पण त्या अष्टाक्षरीची नेमकी ओळख धोंडोपंतानी करुन दिली त्याचा इथे उल्लेख केलाच पाहिजे. माझे तोडके मोडके लेखन वाचून त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले आहे. त्यांचे असेच मार्गदर्शन सर्व मिपाकरांनाही मिळो. -सोनाली माझ्या ओठी यावे देवा तुझे नाव देवराया धाव लवकरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

धन्यवाद सोनाली

धोंडोपंत
Sun, 11/09/2008 - 09:16 नवीन
धन्यवाद सोनाली, छंदशास्त्राच्या दिंडीत स्वागत. छंदोबद्ध काव्य रुजविण्यासाठी हा यज्ञ आहे. तुमच्याकडूनही समिधा अपेक्षित आहेत. आपला, (याज्ञिक) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी

हे काय?

विसोबा खेचर
Sun, 11/09/2008 - 16:45 नवीन
हे काय? इतक्यातच मिपावर पुन्हा फेर्‍या सुरू? अजून पुढल्या दिवाळीला बराच वेळ आहे! :) धोंड्या, दे रे बाबा एखादा लेख पुढल्या दिवाळी अंकाकरता! :) आपला, (दयाळू कोकणी!) तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

वा..धन्यवाद

पद्मश्री चित्रे
Sat, 11/08/2008 - 23:45 नवीन
छान आणि सोप्प्या भाषेत छंद समजावला आहे. मी एकदम अक्षर गण वृतात लिहिण्याचा प्रयत्न करत होते, कदाचित त्यामुळेच "जमत नाही" असं मलाच वाटत होतं... (आणि ते प्रयत्न पण बंद झाले हळू हळू..) आता असा प्रयत्न करून पाहीन..
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

धोंडोपंत
Sun, 11/09/2008 - 09:17 नवीन
धन्यवाद. लेखनासाठी शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

एकलेंचपणा

कपिल काळे
Sat, 11/08/2008 - 23:49 नवीन
एकलेंचपणा संपेलच आतां जाईन भारतां माझ्या गावां अमेरिका वारी एकाकी जीवन कसलें मरण पैशापोटीं. माझ्या लेखनाने दिली मला साथ करितोहो बात मनासवें. मित्रही लाभले उत्तम अनेक हिरा हा प्रत्येक पारखिलां. कपिलच्या मना ओढ ही लागते मायभूं दिसते स्वप्नांमध्यें. पिंजरा सोनेरी टाळू येणे कसें मन वेडेपिसें करितोहां माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा

धोंडोपंत
Sun, 11/09/2008 - 00:05 नवीन
वा कपिलराव, उत्तम छंदबद्ध पद्धतीने भावना मांडल्या आहेत तुम्ही. खूपच प्रभावी लेखन. छंदातील काव्य वाचायला किती छान वाटतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

पंतांचे

विसोबा खेचर
Sun, 11/09/2008 - 09:47 नवीन
पंतांचे कौतुक करावे तितुके असेचि थोडके तात्या म्हणे! पंत, अतिशय स्तुत्य उपक्रम..! आपण मिपावर सुरू केलेला हा उपक्रम काव्याचा काही अभ्यास करू पाहणार्‍यांना निश्चितच सहाय्यभूत होईल असा आमचा विश्वास आहे... मनापासून शुभेच्छा, अभिनंदन आणि कौतुक..! तात्या.
  • Log in or register to post comments

थोर

अरुण मनोहर
Sun, 11/09/2008 - 11:24 नवीन
थोर धोंडोपंत छंद उकलले तात्यांनाही दिले काव्यमंत्र! अगोदर आम्ही कविता मानून केले छंद खून पाप भारी! शहाणे करून आम्हा सगळ्यांना केले चारोळ्यांना दोषमुक्त! बाकिही हुन्नर शिकवा आम्हाला मानूहो तुम्हाला गुरूस्थानी!
  • Log in or register to post comments

एकच कवन - अमुचेही !

दिपोटी
Mon, 11/10/2008 - 11:51 नवीन
मिसळपावाचा किती हा आनंद छंदांचा हा छंद असे भारी ! सारे करी यत्न करुनी वंदन आणिक नमन धोंडोपंतां ! छंदबध्द काव्य भारीतसे मन एकच कवन अमुचेही ! - दिपोटी
  • Log in or register to post comments

आनंद झाला

तुषार जोशी
Mon, 11/10/2008 - 02:02 नवीन
प्रकल्प फार आवडला (कधीतरीच येणारा) तुषार
  • Log in or register to post comments

आमचा प्रयत्न :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2008 - 10:53 नवीन
देवोनिया हाळी जागवतो रात झोंबतो गारवा शेतामधे जोडोनिया नाते सांधली चिंधोटी गणगोत माझे मिपावर माझीया मराठी आवडे जगाला संस्कृत बोलतो कोण आता लिहुन अभंग दिला होता इथे वाचक नव्हते माझ्याघरी छंदाचा, मात्रांचा कंटाळा आम्हाला गुरुजी आमुचे धोंडोपंत घालितो टाके फाटले आयुष्य पडतो आता आरामात सदरील छंदातील कविता थेट स्पर्धेत टाकली होती, परिक्षकांनी पाहण्याअगोदर आमच्या मित्रांनी सांगितले की जरा यमकात भानगड राहिली आहे, त्यामुळे तिकडून काढून इथे टाकली आहे. :)
  • Log in or register to post comments

माझाही प्रयत्न..

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/11/2008 - 11:25 नवीन
पुण्याचा हा पोर करोनी विचार धरोनिया धीर काव्य करें पंते दावियेला मार्ग हा सुकर प्रकट विचार मांडण्याचा शब्दी जोडूनियां शब्द हा वेगळा अर्थही निराळा स्फुरविल पूर्वी अभ्यासिले काव्य हे पुष्कळ काहीच आकळ तरिही ना परि आता आस अभ्यासिण्या छंद अध्ययनानंद निखळ हा -पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

कविता

मानसी मनोज जोशी
Tue, 11/11/2008 - 17:03 नवीन
खुप छान कल्पना आहे हि कविताही खुप छान आहेत
  • Log in or register to post comments

देवद्वार छंद

मिपाशुतोष
Fri, 12/12/2008 - 22:50 नवीन
माझाही प्रयत्न! पंती उघडले 'देवद्वार' आज दाखविला मज छंदमार्ग गुरुंची पौर्णिमा काव्याची साधना शिष्य मज माना धोंडोपंत प्रतिक्रिया जरा देतोय उशिरा तरी माफ करा एकवेळ आता छंदांसवे गिरकी घेईन नेमेचि येईन मिपावरी आज फक्त आपला छंदकाव्यावरचा एक लेख वाचला. आवडला, भावला आणि गमला पुढील लेख नक्की वाचेन! आपला (शिष्योत्तम) आशुतोष
  • Log in or register to post comments

सुंदर लेख.

गंगाधर मुटे
Fri, 03/04/2011 - 20:04 नवीन
सुंदर लेख. धन्यवाद धोंडोपंत. प्रा. बिरुटे सरांनी लिंक दिल्यामुळे देवद्वार या छंदाची आज ओळख झाली. यापुर्वीही या छंदात काही रचना केल्या आहेत, छंदाचे मात्र नाव आणि नियम माहित नव्हते. उदा. बळीराजाचे ध्यान ....!! या कवितेत नियम माहित नसल्यामुळे ६....६.....६.....४ हा नियम गडबडला आहे. सुंदर ते ध्यान उभे बांधावरी नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥ कासे पितांबर ते फ़ाटके धोतर टायरचे खेटर पायामधी..॥२॥ तुळशीहार जणू घामाचीच धार उन्हाला आधार पगडीचा..॥३॥ कवच-कुंडले छातीच्या बरगड्या पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥ नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥ आरतीला नाही त्याची रखुमाई चारतसे गाई माळरानी..॥६॥ राजा शेतकरी बळीराज यावे संघटित व्हावे अभयाने..॥७॥ गंगाधर मुटे .............................................. त्याच प्रमाणे या खालील कवितेचे कोणत्या छंदाची साम्य आहे, याविषयी कुणाला माहिती असेल तर अवश्य माहिती द्यावी. सजणीचे रूप ...!! रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥ म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥ शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥ ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥ अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥ गंगाधर मुटे ............**........... **............ मात्र खालील कविता/अभंग देवद्वार छंदामध्ये निर्दोष असावा असे वाटते. १) शुभहस्ते पुजा : अभंग प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥ सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥ त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥ हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥ लबाड लंपट । तयांची जमात ॥ माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥ पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥ मन किटाळले । कैसे नाही ॥४॥ म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥ अभयास वाटे । शंका तशी ॥५॥ गंगाधर मुटे ………… **………….. **………… २) पंढरीचा राया : अभंग पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥ अभयाने देवा । करा नियोजन ॥ जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥ गंगाधर मुटे ………… **………….. **………….
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा