Skip to main content

आठवण (देवद्वार छंद)

लेखक चेतन यांनी सोमवार, 10/11/2008 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडुन एक प्रयत्न मन हे कातरं होई संधिकाली प्रेमाची सावली हरवली || भुक ना तहान होइ जीव वेडा विरहाची पिडा ह्रुदयात || तुझी आठवण भान हरपते मन ना लागते कशातच || नित्याचि चाहुल कानात साठते गळा दाटवते नित्यनेमे || लागे हुरहुर आता नाही भेट दाखव तु वाट अंधारात || थांबले स्पंदन उर हा फुटला विरह दाटला सर्वदुर || तेवतो प्रकाश मंद गाभार्‍यात पेटवुन ज्योत समईची || सुंदर ते ध्यान डोळे साठवती मिळे मनःशांती काही वेळ || पुन्हा दिनक्रम पुन्हा संध्याकाळ मिळे पाठबळ नामासंगे || अवांतर : धोडोंपंताकडुन बरचं काही शिकायला मिळणार तरं :)
Taxonomy upgrade extras

स्वाती ताई- मांसाहारी पाककृती हवी आहे

लेखक वेताळ यांनी सोमवार, 10/11/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला जरा कोकणी जेवणा बद्दल सविस्तर माहिती हवी आहे. घरी सुरमई फ्राय,बांगडा फ्राय करायला जमते. पंरतु कोकणी माशाचे कालवन.बांगडा कालवन व इतर माश्याचे प्रकार जमत नाहीत्.वेळ मिळेल तसे तुम्ही कोकणी जेवणाच्या पाककृती पण इथे द्यायला सुरुवात करा.मला बांगड्याचा रस्सा व सोलकडी ह्या बद्दल सविस्तर माहिती द्या. वेताळ

आय बी एन वरील वेगळा ब्लॉग -- राज ठाकरे आंदोलनासंबधित

लेखक मैत्र यांनी सोमवार, 10/11/2008 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
http://ibnlive.in.com/blogs/sanjayjha/652/52782/why-raj-thackeray-blew-… राज ठाकरे यांच्या आंदोलनाशी संबंधित एक लेख. इंग्रजी आहे क्षमस्व. मी या लेखातील अनेक गोष्टींशी सहमत आहे. मिपाकरांनी आपली मते मांडावीत असं मला वाटतं. आय बी एन तसा बराच उत्तर धार्जिणा आहे पण लेख चांगला आहे. जर हे मिपाच्या धोरणात बसत नसेल तर कृपया काढून टाका. फक्त कुठल्या धोरणात बसत नाही हे सांगावं त्याप्रमाणे पुढे काळजी घेता येइल.

धिरडं (बालकथा)

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 10/11/2008 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
धिरडं
मिसळपावचे पाहुणे संपादक ऋषिकेश यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही बालकथा लिहित आहे. ही बालकथा माझी आजी मला लहानपणी सांगत असे. कोण्या एका काळी एका गावात एक भटजीबुवा राहत होते. घरोघरी पूजा सांगून ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत. एकदा त्यांना शेजारच्या गावात पूजा सांगण्यासाठी बोलावणे आले. शेजारचे गाव थोडे दूर होते.

माझीही फोटोग्राफी

लेखक लंबूटांग यांनी रविवार, 09/11/2008 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत. Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.

माझा फिरून- डोकं- वर काढणार्‍यांवर विश्वास होता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 09/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या समोर एक वाडा होता.त्याला अम्ही चांभारवाडा म्हणायचो.प्राथमीक शाळेत शिकण्याची त्यावेळी पण सक्ति असल्याने ह्या वाड्यातली बरीच मुलं आम्ही ज्या शाळेत जात असू त्या शाळेत शिकायला यायची.मी जवळ जवळ सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलो.आणि नंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आलो.माझ्या शाळेत त्यावेळेला ह्या चांभारवाड्यातल्या मुलां पैकी पांडूरंग मोची नावाचा मुलगा होता.तो खेळायला हुषार असल्याने शाळेत तसा प्रसिद्ध होता.त्याची माझी शाळेतली ही ओळख त्यादिवशी खूप वर्षानी परत उजळणीला आली. मी चर्चगेट स्टेशनवर पाचपस्तिसच्या विरार डबलफास्ट गाडीची वाट पहात उभा होतो.

दिलिप चित्रे साहेबान्शि असहमत - पहा आजचा मटा - रविवार दिनान्क ९ नोवेम्बर २००८

लेखक चिन्कु यांनी रविवार, 09/11/2008 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे साहेब, आपल्या सारख्या थोर माणसाकडून इतकी मोठि चुक अपेक्षित नव्हती. हा देश "हिंदुस्थान" नसून "भारत" आहे. आपण "हिंदुस्थानी" शब्दाएवजी "भारतीय" शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरले असते. असो. आपल्या सारखी माणसे अधिक आहेत महाराष्ट्रात आणि ती मराठीच आहेत याची आम्हाला देखील लाज वाटते. राज्यघटना वगैरे बोलायला ठीक आहेत हो पण नुसत्या बाता मारुन पोट भरत नाही. जर राज ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत ना. तर आपण योग्य मार्ग सुचवा. आपले हात तोंड कोणी धरले आहे. लोक आपले आभारच मानतील. आपल्या माहिती साठी सांगतो जो माणूस आपले घरदार सोडून दुसर्‍या ठिकाणी जातो तो पैसे कमवायला.

आय पील भाग -२

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 09/11/2008 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
The problem with I -pill is the way it is presented to population through ad blitz. It is an implement with its own complications few known today and few not known for now. The biggest of them is its extensive use as contraceptive than remedy to contraceptive failure once in a while. It is used by married/ unmarred couples like an aspirin tablet for headache. माझा मिपा वरचा वावर सूक्ष्मपणे न्याहाळणार्‍या माझ्या एका डॉक्टर सहकार्‍याचे हे मत. . ....... ह्या औषधाचा उपयोग खालीलप्रमाणे. १.