Skip to main content

नमस्कार मन्ड्ळी,

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 06/11/2008 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला सान्गा, मार्केट ७५०० पर्यत खाली गेलेल, आणी त्यानन्तर १०५०० पर्यत वरही गेल........... हे नेमक कोणामुळे झाल? डोमेस्टिक बायर मुळे कि फ़ोरेन सन्स्थामुळे?? आणि आता परत खाली का येतय??? पुन्हा विक्रि सुरु झाली का???? बहुतेक हे अल्प सन्तुषट आपले भारतियच असावेत. आपला लाडका, उम्मि.

प्रिय पंडितराज

लेखक व्यंकु यांनी गुरुवार, 06/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रिय पंडितराज जगन्नाथ', सप्रेम नमस्कार 'वेगळं व्हायचंय मला' हे तुझ्या तोंडून ऐकताच मी 'झोपी गेलेला जागा झालो' आणि 'जणू काही कट्यार काळजात घुसली' 'माझी बायको माझी मेव्हणी' यांनी मला सावरलं पण मला प्रश्न पडला कि 'या चांगल्या घरात असं झालंच कसं' एवढं मोठं घर श्रीमंताचं असं व्हायला नको होतं असो. 'सिमेवरुन परत जा' असं तु मत्स्यंगंधेला का म्हणालास? उलट तु तिला प्रेमाने म्हणायला हवं होतं 'प्रेमा तुझा रंग कसा?' त्या दिवसापासून ती 'घराबाहेर' पडली आणि सगळीकडे 'बायको पळाली माहेरी' अशी बोंब झाली.

एका प्रेतयात्रेचा सोहळा आणि आमच्या वारशाची जपणूक

लेखक सुनील यांनी गुरुवार, 06/11/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका संपन्न आणि आधुनिक विचारांच्या देशातील सुसंस्कृत समजला जाणारा समाज, हा आपल्याच धर्मातील पण वेगळ्या पंथातील लोकांना कितपत हिणवू शकतो? त्यांची कितपत निर्भत्सना करू शकतो? ५ नोव्हेंबर हा दिवस उभ्या इंग्लंडमध्ये गाय फॉक्स डे (Guy Fawkes day) म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होते. परंतु, दक्षिण इंग्लंडमधील लूइस (Lewes) ह्या छोट्याश्या गावात मात्र हा दिवस एका आगळ्यावेगळ्या पद्ध्तीने साजरा होतो.

हा स्पंद फुलण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 06/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

लेखक शिंगाड्या यांनी गुरुवार, 06/11/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)

तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 06/11/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI दिग्दर्शक :- जगदिश शर्मा प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८ -------------------------------------------------------------------------------- कलाकार :- क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी. तुफान विनोदि आहे हा विचित्रपट.

अमेरिकावासी मिपाकरांसाठी...

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 06/11/2008 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील एका नव्या आणि कौतुकास्पद उपक्रमाची अमेरिकेतील मिपाकरांना माहिती व्हावी म्हणून लिहितोय. मटा मधील बातमी वाचल्यानंतर मी पहिल्या दृक्-श्राव्य दिवाळी अंकाच्या डिव्हीडी सेट्स च्या खरेदीसाठी आवर्तन ची चौकशी केली असता, मी अमेरिकेत सध्या वास्तव्यास असलेल्या (South Eastern US) भागात त्यांचे डिस्ट्रिब्युटर्स नसल्याचे त्यांनी कळवले, व मी मदत करू इच्छित असल्यास येथील महाराष्ट्रीय लोकांसाठी काही डिव्हीडी सेट्स पुण्याहून पाठवण्याची तयारी दर्शवली.

खपली

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/11/2008 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
रुतलेल्या सहस्त्र जखमा मी सांभाळतो उराशी रुदनाचे सोयर तुटले मज खंत ना जराशी आक्रोश ना कदापी ना द्रोह जीवनाशी अजुनी सजीव आहे ना राग हा तुझ्याशी गाऊ नको वॄथा तू माझी मलाच गाणी वांझोट्या स्वप्नांनीही मानले रिक्त हे पाणी जा सोड इथेच आता चल मोह पाश तोडू झेपेना स्पर्ष हताचा खपली नकोस काढू