डी जे
डीजे म्हणजे डिस्क जॉकी असे वाटत असेल तर तो फुल्ल गैरसमज आहे.
पी जे म्हणजे पुअर जोक्स असतील तर डीजे म्हणजे डबडे जोक्स असतात
तुम्हाला येणारे सुपर डुपर डबडे डी जे अर्थात डबडे जोक्स लिहा. यात कोडी जोक्स चारोळी काही वर्ज्य नाही.विनोदी किस्सा सांगुनही ऐकणार्या माणसाला हसु येउ नये याची १०००% खबरादारी घ्यायची इतकेच पथ्य पाळायचे .
उदाहारण म्हणून एक डीजे
१) तीन गुडघे असणार्या माणसाचे नाव
नीतीन ( नी = knee =गुडघा)
सहा गुडघे असलेल्या माणसाचे नाव
सहानी
नऊ गुडघे असलेल्या माणसाचे नाव
नितीन सहानी
२) एक हत्ती झाडाखाली कोक पीत बसला होता
त्यात एक मुंगी पडली.
मिसळपाव