लेखकसरपंचयांनी सोमवार, 03/11/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी,
मिपाचे आजपर्यंतचे मंत्री..
चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी.
मिपाचा रोजचा वाढता पसारा लक्षात घेता आम्ही मिपाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करायचे ठरवले आहे...
लेखकआजानुकर्णयांनी रविवार, 02/11/2008 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवडत्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि त्यातली ही कविता वाचून आम्हाला आमचे गेलेले तें दिन याद आले. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला...
हाय :)
दिवाळी अंकाला, गझलकारांना आणि विडंबनकारांना शुभेच्छा
झाले होते जरि माझे मुंडण तेंव्हाही
उगाच नव्हते केले मी भांडण तेंव्हाही!
मला ठोकण्यासाठी जरि तू फिरून थकलिस
मिटले नव्हते डोळे... तू कारण तेंव्हाही...
कशास वाटे काळ थांबला कालच्यापरी
असह्य झाले होते... सारे.. क्षण तेंव्हाही...
तुझे नि माझे हिशेब होते चुकते झाले
(तुझेच भरले पाकिट...
लेखकनिमीत्त मात्रयांनी रविवार, 02/11/2008 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला
प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे.
लेखकमूखदूर्बळयांनी रविवार, 02/11/2008 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल खूप सारे भयपट घाबरत घाबरत का होईना पाहील्यामूळे म्हणा किंवा भूताच्या गोष्टी वाचल्याने म्हणा ही भय-कल्पना सुचली.
.
मुंबईतल्या कुठल्याश्या एका चाळीत काही भूत रहातात. चाळ तशी एक मजलीच. अजून सुदैवाने कुण्या बील्डरची नजर ह्या चाळीवर गेली नाही. त्यामूळे चाळ अजून टीकून आहे. चाळीच्या तळमजल्यावरच्या जीन्याजवळची खोली ही चाळ सेक्रेटरीची हे वाचकांनी ओळखले असेलच. किंबहुना ह्या मोक्याच्या खोलीमुळेच सेक्रेटरी-पणाची माळ (लिंबू-मिरच्यांची अर्थात ) ह्यांच्या गळ्यात पडली आहे. आजचा दिन विशेष आहे. आज दिवाळी निमीत्त काही सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्यासाठी मुद्दाम चाळीची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे.
लेखकसर्वसाक्षीयांनी रविवार, 02/11/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म. टा. मधील संवाद पुरवणीतल्या 'माझेही मत' मध्ये प्रसिद्ध झालेले हे पत्र
म. टा. च्या संकेतस्थळावर मी नोंदविलेली ही प्रतिक्रिया
मा. संपादक,
आजच्या म. टा. संवादमधील ’माझेही मत’ या सदरात श्री. विजय दांडेकर यांनी लिहिलेल्या पत्रातून एकुण असा सूर असल्याचे जाणवले की स्वा. सावरकर यांनी बोटीतुन समुद्रात उडी मारलीच नव्हती. या साठी श्री. दांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक व स्व्तातंत्र्यसंग्रामाचे अभ्यासक कै. डॉ. य. दि. फडके यांचा दाखला दिला आहे. या संबंधी मला असलेल्या दोन शंका
१) दांडेकरसाहेबांनी ह प्रश्न डॉ.
लेखकसातारकरयांनी रविवार, 02/11/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
Wikipedia वरील स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची वानवा
Wikipedia वरच Bombay च Mumbai करताना माझ्या लक्षात अजून एक गोष्ट आली की तिकडे स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची अगदीच वानवा आहे. सावरकर, टिळक अशी माणसं सोडली तर बाकी आनंदच आहे.
चाफेकर बंधू, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती एक पानदेखील अस्तित्वात नाही. जिथे आहे त्याची अवस्था अशी आहे..
लेखकनिमीत्त मात्रयांनी रविवार, 02/11/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गामधल्या "बाल-कवी' मार्गावरील "मुक्तांगण' प्रासादातील "फुलराणी' दालनात पु. ल. देशपांडे बसले होते. त्यांच्यासमोर वाजवायची पेटी होती. शेजारी तबलजी बनून वसंतराव देशपांडे बसले होते. पु. ल. तल्लीन होऊन गात होते.. "उगीच का कांताऽऽ' आणि पेटीवरून विविध प्रकारची स्वरांची नक्षी काढत आपल्याच गाण्याला साथ करीत होते... एक कडवे झाले की तबला वाजवता वाजवता वसंतराव पुढचे दुसरे कडवे गात होते. दोन देशपांड्यांची मैफल आता अगदी ऐन रंगात आली होती.
.. दारात कुणाची तरी पावले वाजली.
"कोण आहे?' पु. ल.
"मी आहे.' ती
"पण "मी' कोण? नाव, गाव, काही आहे की नाही?'
"नाही ना!'
"असं कसं होईल?