अगागागागाऽऽगाऽऽऽगा!!!!!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
(नाथांच्या "विंचू चावला" वरून सुचलेले हे आम्हां बिचार्या......)
अनाथांचे भारूड
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
अगगगगगाऽ................... सर्कू चावला!
द्येवा रं द्येवाऽऽ................ सर्कू चावला!!
आत्ता काय मी करू?....... सर्कू चावला!!!
आनि कुनाला सांगू?....... सर्कू चावला!!!!
अरं असा रं कसा!.......... सर्कू चावला!!!!!!
अग बया बया बया!!.......... सर्कू चावला!!!!!!!
अरे सर्कू चावला, रं सर्कू चावला, रं सर्कू चावला.......हो!!!!
फ्रिस्कोवासी सर्कू चावला,
इतिहासाचा नक्षा उतरला,
जालस्थळांचा कोथळाच काढला.....
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
अगगगगगाऽ................... सर्कू चावला! (धृपद!!)
ग्यासुद्दिन रेखिला सर्कूनं,
महाराज, सर्कू म्हंजे?
सर्कू म्हंजे मोठाऽऽ मेंबर!
मोठा म्हंजे?
खूप मोठा!
खूप मोठा म्हंजे?
लई मोठा!!
लई मोठा म्हंजे?
मायंदाळ मोठा!!!
आनि मायंदाळ मोठा म्हंजे?
आरे म्हंजे खेचराचीसुद्धा खेचणारा, या मिपावरचा संस्थापक मेंबर!!!!
आसं? आग्ग, बाबौ!!!
तर, ग्यासुद्दिन रेखिला सर्कूनं,
व्यक्तिचित्रप्रेमीअंगी कणकण,
प्रतिक्रिया बोलते झण्णकन,
त्या जनोबाची!
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
अगगगगगाऽ................... सर्कू चावला! (धृपद!!)
या दंशाला उतारा,
सिरियसली घ्यायचं टाळा,
नेमस्तपणा अंगिकारा,
मग सर्कू उतरे झरझरा.....
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
अगगगगगाऽ................... सर्कू चावला! (धृपद!!)
सामोरी धरूनी विडंबन,
सत्यरूप दाविले जाण,
किंचित राहिली फुणफुण,
फुंक घाली पिंडाकाका!:)
म्हणा, पुंडलिकवरदा....... हाऽऽरी विठ्ठल!
श्रीज्ञानदेव........तुकाऽऽराम!!
श्रीपंढरीनाथ महाराज की जय!!!
वाचने
9088
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
शाहीर पिवळे
In reply to शाहीर पिवळे by प्रियाली
या
In reply to शाहीर पिवळे by प्रियाली
हाण तिच्या
चांगली आहे..
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
तात्या ........विंचू !
In reply to तात्या ........विंचू ! by मुक्तसुनीत
भांडारी
मस्त !!!
आई शप्पत !!!
स्कॉर्पीयन बीट् मी ऽऽऽ
In reply to स्कॉर्पीयन बीट् मी ऽऽऽ by कोलबेर
खि खि खि
In reply to स्कॉर्पीयन बीट् मी ऽऽऽ by कोलबेर
हाहाहाहा
In reply to स्कॉर्पीयन बीट् मी ऽऽऽ by कोलबेर
अति झाले नि हसू आले
In reply to अति झाले नि हसू आले by बेसनलाडू
हा हा हा!!
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
झगे की धागे ?
In reply to झगे की धागे ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
पिडाकाका, ल
मिसळपाव
हम्म...
उतारा
भारी..
किंचित
++१
जबरदस्त
आग्गागागागा ...येलोनॉटी!!
In reply to आग्गागागागा ...येलोनॉटी!! by चतुरंग
शॉट्ट
ही हा हा
१+++