मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट घावन

ऋचा · · पाककृती
साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ. कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे. तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते. टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

वाचने 5129 वाचनखूण प्रतिक्रिया 5

विसोबा खेचर 08/08/2008 - 13:39
अरे वा! टेल्कोची मालकीण ब्यॅक टू मिपा! :) असो, झटपट घावन अंमळ बरे वाटत आहेंत! :) आपला, (मुगाच्या घावनांचा प्रेमी) तात्या.

ऋचा 08/08/2008 - 13:48
ह्यात तुम्ही मोड आलेले धान्य (भिजाणं) घालु शकता. अजुन पौष्टीक होईल. :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

३_१४ विक्षिप्त अदिती 08/08/2008 - 13:54
माझे बाबा त्यात थालिपीठाची भाजणी आणि चिंच घालायचे. ते पण मस्त लागतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विसोबा खेचर 08/08/2008 - 13:56
तुझ्या बाबांच्या हातचा एकदा उपमा खाल्ला आहे! खूप छान करायचे! :) असो, विषयांतराबद्दल क्षमस्व!