Skip to main content

ब्रम्हकमळ

लेखक रश्मी यांनी गुरुवार, 12/02/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते. पण आमच्याकडे मागच्यावर्षी पावसाळ्यात ५ ते ६ वेळा ब्रम्हकमळ फुलले. एकूण २७ फुले आली.

गुलाबी अंडरविअर..

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 12/02/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
मला माहिती आहे की ह्या टॉपिक चं शिर्शक वाचुन तुम्हाला जरा दचकल्या सारखं झालं असेल. पण मला हा विषय जरा विशेष महत्वाचा वाटला. मॉरल पोलिसिंग हा प्रकार हल्ली जरा जास्तच वाढलाय. तुम्ही पण ही बातमी वाचली असेलच, आणि वाचुन हॅः काय फालतु पणा आहे म्हणुन दुर्लक्ष केलं असेलं. इथे ह्या विषयावर लिहिलंय.. माझा मुद्दा एकच.. मॉरल पोलिसिंग कुठल्याही राजकिय पक्षाने करणे कितपत योग्य आहे? महेंद्र.. इथे पण वाचू शकता

जरा खरड वही बोंबलली तात्या?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 12/02/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या जरा खरड वही बघा सगळिकडे n/a असे येत आहे काय प्रॉबलेम आहे ? कारण तुम्हाला खरड केलि तरी तसेच येत आहे ख व पण तसेच

व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 12/02/2009 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलंटाईन डे आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रेयसी/ प्रियकरासाठी भेटवस्तू घेतल्या असतील (इथे नवरा/ बायको या नात्यालाही प्रेयसी/ प्रियकर या असंभव नात्याने गौरविले आहे!!!). ज्यांनी भेटवस्तू अगोदरच घेतल्या असतील त्यांच्या आत्म्याला तो आकाशातला प्रभू (विप्र नव्हे!!) क्षमा करो......... पण ज्यांनी अजून भेटवस्तू घेतल्या नसतील (यात बहुतेक पुरूषमंडळी येतात!!!!!) त्यांच्या उपयोगासाठी हे मार्गदर्शन आम्ही देत आहोत......... आपापल्या प्रेयसीसाठी या व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट घ्यावी? (प्रियकरासाठी काय गिफ्ट घ्यावी याचं मार्गदर्शन मिपावरल्या अनेक समर्थ भगिनी करतीलच!!!

-गणेश स्तवन-

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 12/02/2009 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश -स्तवन गणेश माझा आहे सुन्दर कटी तयाच्या शुभ्र पीतांबर प्रभा तयाची दशदिशांवरी नभी उगवला वाटे दिनकर ! कटी मेखला नागांची ही डोक्यावर्ती जुडी दुर्वांची आहे गणेश मोहक माझा हाती मोदक त्याच्या शंभर! दुखे हरतो भक्ताची हा आहे गणेश माझा सुखकर पुजिती त्याला देवही सगळे आणी मराठी हा जनसागर ! -अनिरुद्ध-
Taxonomy upgrade extras

ठेवणीतले आवाज ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्‍याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही.

"कुठे काय" विषयी थोडेसे...

लेखक वाचक यांनी बुधवार, 11/02/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 11/02/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल. कशी येशील कोंदणी??... तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा? पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे? लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी तुझे हासणे ते 'मंद',

मनाच्या कुपितले-सिंदबाद कोल्हापुरात

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/02/2009 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदाबाद कोल्हापुरात
सातवेळा जगभ्रमण करून आलेला सिंदाबाद आता पुन्हा ताजातवाना झाला होता. बराच काळ लोटला होता. त्याच्या सफरीला जग पूर्ण बदललं होतं. जागा, संदर्भ, माणसं सगळंच ! सिंदाबाद पुन्हा निघाला नवं जग पहायला, अनुभवांचे गाठोडं वाढवायला आणि का कोणास ठाऊक पण येऊन पोहोचला कोल्हापुरात !त्याला कोल्हापुरी दणका बसला असता तो टोलनाक्यावरच पण घोडयावरून येत असल्याने सहीसलामत सुटला. कोल्हापुरात त्याचे आगमन तसे वेगळयाच प्रकारे झाले.