Skip to main content

निर्ल्लज्जपणा, हलकटपणा, मयताच्या टाळूवरचं लोणी खातील भडवे!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 12/02/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही खाजगी कंपन्यांना म्हणे बाबा आमट्यांच्या आनंदवनाखाली कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध लागला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य सरकारशी संधान साधून आता तिथे कोळश्याच्या खाणी खणण्याचा पाताळयंत्री बेत आखला आहे..! कालच ई-मराठी, की स्टार माझा यापैकी कुठल्याश्या वाहिनीवर ही संतापजनक बातमी पाहण्यात आली! आमटे परिवाराचा या योजनेला अर्थातच ठाम विरोध आहे हेही दाखवण्यात आले! ६०-७० वर्षांपूर्वी एका ओसाड माळरानावर एक महामानव पोहोचला आणि त्याने तिथे नंदनवन उभं केलं, तेव्हा हे शोध लावणारे लोक कुठे गेले होते भोसडीचे?? पण आमच्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही! कोण बाबा आमटे?

प्रेमदिनाची पूर्वसंध्या

लेखक जयवी यांनी गुरुवार, 12/02/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उगवला हळुवार अलार्म पण किणकिणला नाजुक कूस वळवून बघते तर नवरा उभा हसतमु़ख हातातलं गुलाबाचं फुल लाल गालावरुन फिरलं पिसासारखं "How Romantic Jaanu !" मन नाचलं थुईथुई मोरासाऱखं लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन मूडात होती भलतीच स्वारी म्हटलं घ्यावा भाव खाऊन जे जे वाटतंय करवून घ्यावं ते ते घ्यावं करवून "कैसे मिजाज है आपके जानम ?" जेव्हा सवाल आला म्हटलं "जायचंय आज मला... "रब ने बना दी" बघायला " एरव्ही ह्याला शाहरुखची त्या कायम असते ऍलर्जी आज मात्र चक्क बोलला, "जैसी आपकी मर्जी " हॉलवरची झुंबड बघताच जीव मा
Taxonomy upgrade extras

व्हॅलेंटाईनच्या निमीत्ताने

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 12/02/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने तूला काही सांगाव म्हणतोय जून्या आठवणीतले जूनेच डाव तूझ्याशी मांडावे म्हणतोय आइनस्टाइनचे सिद्धांत आणि ऍरीस्टोटल ची गणित मला जमलीच नाहीत तशी ऐन वसंतात साद घालणारी 'तू' मला कधी कळलीच नाहीस आता तूझ्यातल्या ' तू' ला आणि माझ्यातला ' मी' ला जरा पावसात न्याव म्हणतोय द्वैताची भावना विरे पर्यंत चिंब चंब भिजवाव म्हणतोय. तन भिजेल पण मन मात्र कोरडच राहील कारण माझ्यातल्या 'मी' ला तुझ्यातली 'तू' कधी जाणवलीच नाहीस. आता व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने आकाशातल्या बापाकडे एक गार्‍हाण घालाव म्हणतोय पूढल्या व्हॅलेंटाइन पर्यंत, न जमलच तर निदान पूढल्या पावसापर्यंत तरी ... माझ्यातल्या 'तू
Taxonomy upgrade extras

माय व्हॅलंटाईन

लेखक दशानन यांनी गुरुवार, 12/02/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
माय लास्ट व्हॅलंटाईन ! कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... ! कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं..

मराठी शब्द

लेखक मराठी शब्द यांनी गुरुवार, 12/02/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो नमस्कार, मिपा वरील लेख व इतर विचार वाचतांना नेहमीच चांगला अनुभव येतो. तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे. www.marathishabda.com कृपया Firefox, Safari, Google Chrome browser वापरा. IE CSS चा घोटाळा अजुन निस्तरायचा आहे. हे संकेतस्थळ मिपाला स्पर्धा नाही. मिपाकरांना हे एक थोडेसे गंभीर संकेतस्थळ वाटेल पण त्याचा उद्देशच जरा वेगळा असल्याने तसे ते असावे असे वाटते.

पाकिस्तानचा "बुरखा' फाटला

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 12/02/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला नाही, या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंधच नाही, असे तुणतणे वाजविणाऱ्या पाकिस्तानने अखेर या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजल्याचे मान्य केले. वारंवार खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानचा खरा (काळा) चेहरा तेथील सरकारने आज स्वत:च जगासमोर उघड केला आहे. मात्र, देशविहीन शक्तींचे (नॉन स्टेट ऍक्‍टर) हे कारस्थान असून, त्यांनी स्वत:चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याची सारवासारव पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी केली आहे. तसेच रशिया, इटली, स्पेन आणि अमेरिका हे देशही मुंबई हल्ल्याशी संबंधित असून, या देशांतही कटाचा काही भाग शिजला आहे.

कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 12/02/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/5614 आंजर्ले - केळशी च्या या धागावर दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. त्याचाच पुढचा भाग आज इथे देत आहे. दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी लौकरच डॉल्फिन बघायला जाणार होतो.... हर्णे, कर्दे आणि आजुबाजुच्या परिसरात भरपुर डॉल्फिनस बघायला मिळतात. पण त्यासाठी सकाळी लौकर जावं लागतं...आम्ही जिथे थांबलो होतो मुक्कामासाठी त्याच गृहस्थांना आम्ही डॉल्फिन सफारीसाठी बोट ठरवायला सांगितली.

बेंबट्या आणि बेंबटी

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 12/02/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
बेंबटे राव कोचवर हातात विडिओ गेम चा रीमोट घेउन मग्न आहेत. इतक्यात सौ. बेंबटी हातात झारा, लाटणे , मोठा डाव किंवा तत्सम प्राणघातक वस्तु घेउन अचानक बेंबटेरावासमोर उभ्या राहतात. सौ.बेंबटी: बोल माझ्याकडे ..... श्री. बेंबट्या: आता नाही हां...... सौ. बेंबटी: कसल गाणे गुणगुणत होतास काल? श्री बेंबट्या: कसले गाणे? सौ. बेंबटी: काल नाही का संध्याकाळी शेजारणी कडे बघुन म्हणत होतास ते गाणे. श्री. बेंबट्या: "प्यार हुवा" सौ. बेंबटी : हां तेच. आत्ताच्या आता मला बघुन ते गाणे म्हण. नाहीतर तुझा 'गेम ओवर'. (प्राणघातक वस्तुला दाखवत) श्री. बेंबट्या: ठीक आहे. म्हणतो.