आज जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर निचांकाच्या पातळीवर पोहोचले आहे असे मी वाचले. ( ५६ डॉलर्स प्रति पिंप). काही महिन्यापूर्वी पिंपाचे दर १२६ डॉलर्स झाले तेंव्हा केंद्र शासनाने तडकाफडकी ५५ रुपये प्रति लिटर अशी दर वाढ करुन महागाई वाढवली होती आणि आज इतके दर कमी होऊनही प्रंतप्रधान आणि मंत्री ( देवरा) हे मात्र प्रशासकिय उत्तरे देत आहे. तेल कंपन्याचा तोटा पाहु इत्यादी इत्यादी.
केंद्र शासनाने जर इंधनाची दरवाढ कमी केली ( जी तार्किक आणि सुसंगत आहे) तर गरिब लोकांना महागाईचा विळख्या पासून थोडा आराम मिळेल, त्यांचे जीवन सुसह्य होईल.
सध्या केंद्र शासनावर कोणाचा धाक राहिला नाही. मला सर्वात आश्चर्य वाटते ते विरोधीपक्षही गप्प बसले आहेत. समाजसेवी संस्थाही गप्प आहेत. अश्या परिस्थितीत सामान्य माणसाचा कैवार कोणी घ्यायचा?
एकीकडे औद्योगिक मंदीच्या विळखा घट्ट होत चालला आहे, औद्योगिक उत्पादन कमी होत आहे, बाजारात पैसे नाहीत आणि सरकार मात्र आपली तिजोरी भरत आहे.
अश्या वेळेस सर्वसामान्यांनी कोणाच्या कडे पहायचे? ही राजकिय पक्षाची दिवाळखोरी समजायची की यामागे काही कारण आहे काय? जाणकार वाचकांनी कृपया खुलासा करावा.
वाचने
4126
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना नाही!
भारत सरकारची तिजोरी
अर्थशास्त्र.
जेव्हा वाढले होते तेव्हा
नीचांक.
कूल मारा
सहमत
In reply to कूल मारा by कपिल काळे
काही उपाय...
असं आहे होय ?
In reply to काही उपाय... by मनिष
या विषयावर
सरकारच्या हलगर्जी कारभाराचा सर्वसामान्यांना ताप
मुरली
रिक्षा आणि बस वाहतुकीचे भाडे.