Skip to main content

कसला व्हॅलंटाईन डे...?

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 14/02/2009 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आहो... इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही. आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते. जे लोकं प्रेमात आहेत (म्हणजे ज्यांचे प्रेमप्रकरण चालू आहे) त्यांना तर आजचा दिवस म्हणजे "सोनियाचा दिन"" असेच वागत असतात. (आणि गंमत म्हणजे बरोबर ९ महिन्यांनी बाल दिन (children's day)). एवढ्याच उत्साहात आपण दसरा, संक्रात साजरा करतो का? हाच प्रश्न सात च्या आत घरात ह्या चित्रपटात विचारला होता. बाकी जाऊद्या हो.

तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/02/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..! काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती! ती..! जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात!

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

वाळणताई डे

लेखक त्रास यांनी शनिवार, 14/02/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
[एका चीनी प्रवाशाच्या डायरीतले संदर्भ- त्याने २० व्या शतकात भारतखंडाचा प्रवास केला होता- त्यातील एका प्रसंगाचे हे मराठी भाषांतर] दुनिया झुकती है, झुकानावाला पाहिजे असे संत लखोबा लोखंडे ह्यानी म्हंटले आहेच. मल्टीनॅशनल कंपन्यांनी वात्सायनाच्या भारतदेशाला प्रेम करायला शिकवले. आम्ही *सांस्कृतिक आक्रमण* वगैरे म्हणतात ते हेच असे बरेचदा लोकांना सांगुन पाहिले पण फुकटचे सल्ले लोकांना नको असतात असे सिद्ध झाल्यामुळे ते थांबवले. त्यांनी आम्हाला मोराल पोलिसींग करतोस असे म्हणून एक बेक्कार लूक दिला.

संकेतस्थळांचे मोबाईल व्हर्जन

लेखक माझी दुनिया यांनी शनिवार, 14/02/2009 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोन्सची स्मार्ट व्हर्जन्स उपलब्ध आहेत. शिवाय आजकाल जीपीआरएस ही सहजगत्या उपलब्ध होतयं. अशी स्थिती असताना मोबाईलवर आपले आवडते संकेतस्थळ पहायला मिळाले तर किती बरं होईल. एकतर सतत संगणक उघडून बसायला नको. शिवाय प्रवासात असतानाही आपला छोटासा मोबाईल उघडून आपण ही संकेतस्थळे पाहू शकतो. पण यात एक अडचण अशी आहे की , आपल्याला हव्या असलेले संकेतस्थळ मोबाईलमध्ये कसे काय दिसेल ? कारण सहाजिकच मोबाईलचा स्क्रिन आणि संगणकाचा स्क्रिन यांत बराच फरक असतो. त्यामुळे मोबाईलवर पहाण्याकरता संकेतस्थळाचे मोबाईल व्हर्जन उघडावे लागते.

युएफओ पाहीली आहे का कुणी, युएफओ?

लेखक त्रास यांनी शनिवार, 14/02/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज पर्यंत एकाही मराठी माणसाने युएफओ पाहीली असल्याचा क्लेम केल्याचे आठवत नाही. हे युएफओवाले मराठी लोकांना टाळतात असे वाटू लागले आहे. एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे व त्याच्या पृथ्वीवारीच्या खाणाखूणा इतरत्र पसरल्या आहेत. त्यातील एकही खूण भारतातील (पुण्याजवळची तर नव्ह्तीच) नव्ह्ती. त्यामुळे अशा ठिकाणांना भेटी देउन खात्री करावी तर ते लाखो कवड्या मोजल्याशिवाय करणे शक्यच नाही. का येत नाही युएफओ आपल्याकडे?

एक भावगीत

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 13/02/2009 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेमगीत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा मी होऊन खारोटी तुझ्या ओंजळीत घेईन विसावा. * * * * मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. * * * * माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. * * * *
Taxonomy upgrade extras

लालूंचे रेल्वे बजेट !

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 13/02/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे लालूंनी भारतीय रेल्वेला फायदा करुन दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मेल एक्स्प्रेसच्या प्रवास भाड्यात २ % कपात केली आहे . लोकलचे भाडे १ रु स्वस्त होणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट. लालूंचे त्यासाठी अभिनंदन !! सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे लालूंनी मुंबई- जबलपूर गरिबरथ अलाहाबाद पर्यंत एक्स्टेंड करण्याची घोषणा केली त्यावेळी लक्षत आले की मागच्या वर्षीच्या बजेट मध्ये घोषीत केलेली मुंबई- जबलपूर ही गाडी अजून सुरुच झालेली नाही !